जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
10 Jan 2008 - 12:06 am

WorldPersonalities

वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?

मी ओळखलेले:

महात्मा गांधी
चार्ली चॅपलीन
बीथोवन
हिटलर
सद्दाम हुसैन
बिल क्लिंटन
ब्रुसली
अल्बर्ट आईन्स्टाईन
अब्राहम लिंकन
यासर अराफात
मेरीलीन मॉन्ऱो
जॉर्ज बुश

आणखी जमल्यास लिहीन पुढे...
(चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

कलाइतिहाससमाजविज्ञानक्रीडाराजकारणमौजमजासंदर्भचौकशीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

10 Jan 2008 - 12:33 am | प्राजु

१. आईनस्टाईन
२. ब्रुसलि..
३. अब्राहम लिंकन..

आपण ओळखलेल्या शिवाय मल इतके आले ओळखता...पह्ते अजून दिसतात का ते..

- प्राजु

सुनील's picture

10 Jan 2008 - 12:40 am | सुनील

पहिल्याच रांगेत खाली बसलेला तो मल्ल कोण? महंमद अली तर नव्हे?

तशीच ती आईनस्टाईनच्या मागची छोटी मुलगी कोण?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती राजेश's picture

10 Jan 2008 - 1:39 am | स्वाती राजेश

लेनिन
पेले
स्टॅलिन
चेंगिझ खान

स्वाती राजेश's picture

10 Jan 2008 - 1:43 am | स्वाती राजेश

पावारोट्टी
जॉर्डन (बास्केटबॉल )

स्वाती राजेश's picture

10 Jan 2008 - 1:49 am | स्वाती राजेश

प्रिंन्स चार्ल्स
कर्नल गद्दाफी
मेरी क्युरी

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 2:04 am | इनोबा म्हणे

देवा फारच सुंदर विषय दिला आहेस तु...धन्यवाद!

तू लिहीलेल्या नावाशिवाय...
१)मायकेल जॉर्डन(स्पोर्ट शु़ज घातलेला-जगविख्यात धावपटू...हा आपल्या आयुष्यातली शेवटची शर्यत 'नायके' कंपनीने बनवलेले सोन्याचे बुट घालून धावला)
२)नेल्सन मंडेला(गॅलरी खाली-दक्षीण आफ्रीकेचा 'गांधी,गांधी यांच्या बरोबर कारावास भोगल्यामुळे त्यांचा याच्या जिवनावर फार मोठा प्रभाव, त्यांनाच आपला आदर्श मानणारा)
३)मदर तेरेसा (गॅलरी खाली)
४)गुरुदेव रविंन्द्रनाथ ठाकूर्(गॅलरी खाली,मदर तेरेसा यांच्या पुढे)
५)सॉक्रेटीस(विख्यात तत्वज्ञ-गुरूदेव यांच्या पुढे,गुडघ्यावर हात ठेवलेला...प्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू यांनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नाटकात याची व्यक्तीरेखा साकारली होती)
६)ओसामा बिन लादेन(मागे स्त्रियांच्या रांगेत-याचा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला माहितच आहे.)
७)पेले (डाव्या बाजूला-एक पाय खाली सोडून बसलेला-ब्राझीलचा व जगप्रसिद्ध फुटबॉलपटू...'पेले' या शब्दाचा अर्थ आहे 'अनवाणी'...पायात बूट न घालता खेळत असल्यामुळे याला हे नाव मिळाले.)
८)शेक्सपियर(गिटारवादकाच्या मागे)
९)नेपोलियन बोनापार्ट (पांढर्‍या घोड्यावर स्वार,मूळचा फ्रान्सचा व भारतीय लष्कराने गौरविलेल्या जगातील तीन अव्वल लढवय्यांपैकी प्रथम(दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज व आसामचा राजा लासित बरफुकन उर्फ चिलाराय... मृत्यू इंग्रजी सैनिकांच्या नजरकैदेत झाला होता,मृत्यूचे गूढ दोनशे वर्षांनी उकलले,फ्रान्सच्या एका संग्रहालयातील याच्या केसाच्या बटेवर आधारीत संशोधनानंतर विषप्रयोग झाल्याचा दावा)
१०)शेरलॉक होम्स (शेक्सपियर यांच्या बाजूला...हॅटव तोंडात सिगार असलेला-हेरकथांमधील जगप्रसिद्ध पात्र-जगातील सर्वप्रथम पात्र ज्याचा (इंग्लंडमधे) पुतळा बनवला गेला)
११)माईक टायसन (अमेरीकेचा जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा...बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली,आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना चालू असताना कान चावून तोडला...अमिरेकेतील एका चॉकलेट उत्पादकाने या घटनेनंतर कानाच्या आकाराचे चॉकलेट बनवले)
१२)माओ (अब्राहम लिंकन यांच्या शेजारी,चिनमधील माजी राज्यकर्ते व विचारवंत... नेपाळमधील माओवादी संघटना यांच्याच विचारांतून प्रेरीत)
१३)मार्टीन ल्युथर किंग (पेले यांच्यामागे...एक हात हवेत...सूट घातलेले-जगप्रसिद्ध विचारवंत)

आणखी बरेचसे चेहरे असे आहेत ज्यांची नावे व्यवस्थीत लक्षात नाहीत्...जसजसे आठवेन तसतसे लिहीन
(इतिहासप्रेमी) -इनोबा

विजय.पाटील's picture

10 Jan 2008 - 12:27 pm | विजय.पाटील

अनिवसेजी, मायकल जॉर्डन हा धावपटू नसुन अतिशय सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आह. तुमची तपशीलात (सोन्याचा बुट वगैरे) काहीतरी चूक झालेली दिसते.

भाग्यश्री's picture

10 Jan 2008 - 3:04 am | भाग्यश्री

हिटलर, गांधीजी, ऐश्वर्या राय(सगळ्यात डावीकडे टीव्हीच्या मागे कोण आहे ती??)

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 3:17 am | इनोबा म्हणे

मलाही ती ऐश्वर्या असल्यासारखीच वाटते,पण नक्की सांगू शकत नाही.चित्र झूम करून पाहिल्यानंतर खुपच धूसर होत आहे त्यामूळे व्यवस्थीत पाहता आले नाही.

-इनोबा

देवदत्त's picture

10 Jan 2008 - 7:42 am | देवदत्त

माझ्याकडे चित्र थोडे मोठे आहे. त्यात पाहून वाटते की ती ऐश्वर्या राय नाही.
मोठे चित्र अपलोड कुठे करावे कळत नाही. फ्लिकर आणि गूगल दोन्ही १२००x४०० च्या वर चित्र दाखवत नाही आहेत. :(

विकेड बनी's picture

10 Jan 2008 - 3:42 am | विकेड बनी

ऑड्री हेपबर्न आहे. ऐश्वर्या राय म्हणे!!!! अमिताभ, इंदिरा, शाहरूख खान, मल्लिका शेरावत, कोयना मित्रा, सेलिना जेटली नाही का दिसले?

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 3:48 am | इनोबा म्हणे

तुला तिच बरी दिसली? बाकीचे नाही का दिसले? मोठा आला हॉलीवूडचा शहाणा...

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jan 2008 - 7:52 am | llपुण्याचे पेशवेll

घोड्यावर बसलेला टोपीवाला नेपोलियन असल्यासारखा वाटत आहे..
ध.अ.मिराशी

चतुरंग's picture

10 Jan 2008 - 11:19 am | चतुरंग

मला सापडलेले -
१ - मायकेल जॉर्डन (अमेरिकन बास्केटबॉल लेजंड - स्पोर्ट शूज घालून उजवीकडे बसलेला)
२ - रवींद्रनाथ टागोर
३ - मदर टेरेसा (दोघेही गॅलरी खाली)
४ - सॉक्रेटीस (बसलेला)
५ - प्रिंन्स चार्ल्स
६ - (त्याच्या उजवीकडे) लुसियानो पावारोत्ती (इटालियन ऑपेरा सिंगर नुकताच गेला)
७ -(लुसियानोच्या मागे) जॉर्ज बुश
८ - (बुश च्या मागे) ओसामा
९ -यासर अराफात
१० - (त्याच्या पायाशी) मेरिलिन मन्रोचा फक्त चेहरा आहे.
११- (त्याच्या वर -गॉडफादर मधला) मार्लन ब्रांडो
१२ - (त्याच्या उजवीकडे) फिडेल कास्ट्रो
१३ - (कास्ट्रोच्या समोर बहुदा चिनी तत्ववेत्ता ) - कन्फ्यूशस (असावा)
१४ - (पांढर्‍या घोड्यावर स्वार) नेपोलियन
१५ - (त्याच्या पाठच्या घोड्यावर) चेंगीझखान (मंगोल सम्राट)
१६ - (काळी टोपी खुर्चीवर) चर्चिल
१७ - (त्याच्या मागे) ब्रूस ली
१८ - (खालच्याबाजूला) क्वीन एलिझाबेथ
१९ - बिल क्लिंटन
२० - लेनिन
२१ - (बसलेला) पेले
२२ - (खाली) हिटलर
२३ - (त्याच्या डावीकडे) मुहम्मद अली जीना
२४ - सद्दाम हुसेन
२५ - (त्याच्या डवीकडे) मार्क ट्वेन
२६ - पीयानोवर - बीथोवेन
२७ - ऐश्वर्या राय
२८ -चार्ली चॅपलीन
२९ - (शेजारी) हेन्री फोर्ड
३० - (जमिनीवर) टायसन
३१ - (शेजारी) व्लादिमीर पुतिन
३२ - आइनस्टाईन
३३ - (मागे) टॉलस्टॉय
३४ - (छोटी मुलगी) -ऍन फ्रँक ? (असावी)
३५ - (टेबलामागे) स्टॅलिन
३६ - (त्याच्या मागे) गिटार वर - एल्वीस प्रिस्ले
३७ - शेक्सपियर
३८ - (टेबलापाशी बोलणारा दाढीवाला) कार्ल मार्क्स
३९ - (लाल शर्ट, हाताची घडी) पाब्लो पिकासो
४० - लिंकन
४१ - माओ
४२ -महात्मा गांधी
४३ - (कॅस्ट्रोच्या शेजारी बंदूकधारी ) चे गवेरा?
४४ - (शेक्स्पियरच्या उजवीकडे) - बर्ट्रांड रसेल ? असावा - (शेरलॉक होम्स नाही, हे काल्पनिक पात्र आहे आणी त्याची हॅट वेगळी होती)
चतुरंग

स्वाती राजेश's picture

12 Jun 2008 - 6:10 pm | स्वाती राजेश

ह्या फोटोतील सर्व व्यक्ती ओळखल्याच नाहीत...
परत करायची का सुरवात?
नविन सदस्यांना पण कदाचित माहीती असतील....:)