Skip to main content
लेखक उपयोजक यांनी बुधवार, 21/10/2026 17:29 या दिवशी प्रकाशित केले.

"निलेश अरे शेवटी काय ठरवलंयस तू ? हे बघ माझं तरी मत प्रीती , उषा किंवा अंजली या तिन्हीपैकीच कोणीतरी एक हवं."  

"अग! एकदा बघ तरी! त्या प्रीती आणि अंजली किती नाजूक आहेत. अगं आपल्या व्यवसायाचा व्याप मोठा आहे. तो झेपला पाहिजे. या प्रीती किंवा अंजलीचं ते काम नव्हे. उषा तर नावच जुनाट वाटतंय. ती प्रीती तर साऊथची दिसते."

"अरे! आता फक्त नावावरून आणि दिसण्यावरून ठरवणार आहेस का तू? फक्त तेवढंच महत्त्वाचं असतं का? आणि काम न झेपायला काय झालं ? अरे हा हा म्हणता कोणीही नेईल त्यांना."

"ज्यांना घ्यायचंय त्यांना घेऊ दे. माझ्या गळ्यात त्या नकोत."

"अरे असं प्रत्येकीला नको म्हणालास तर मग शेवटी काय उरेल?"

"आहे एक डोक्यात!"

"कोण?"

"तुला सुजाता नाव आठवतंय का आई ?"

"सुजाता? हो आठवलं. एक मिनिट! तुझं मत सुजाताला आहे?"

"हो! आई! दिसायलाही सुंदर आणि आपल्या व्यवसायाचा व्याप तिला झेपेल असं मला वाटतं. आय विल गो विथ सुजाता."

"हम्म! सुजाता कामाला वाघ आहे हे खरं आहे. मी देखील माहिती काढली होती. पण मला तिचा लुक काही एवढा आवडला नव्हता."

"आई! अगं सौंदर्य अल्पकाळ टिकतं. खरं सौंदर्य हे सामर्थ्य असतं सामर्थ्य!"

"ठीक आहे! तुझ्या मनात सुजाता आहे तर तसं करू!"

अशा तऱ्हेने 'निलेश इडली आणि डोसा सेंटरवर' सुजाता मिक्सरचे आगमन झाले. आपणही निलेश इडली आणि डोसा सेंटरला नक्की भेट द्या. 😀
 

(काल्पनिक)

लेखनविषय:

वाचने 159
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

45-50  वर्षांपूर्वीची आठवण. आमच्या बहिणीच्या मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीचे लग्न एका मोठ कचोरी विकणार्‍या प्रसिद्ध  दुकानदाराशी झाले. ती एमए शिकलेली होती.  लग्नाच्या एका आठवडयानंतर सासूने तिला कचोरी (मोठ कचोरीतील कचोरी वेगळी असते) आणि मसाले बनविण्याची ट्रेनिंग देणे सुरू केले. महिन्यातून एखाद्या दिवशी स्वैपाकघरात काम करणार्‍या तिला  मसाला बनविणे , तो कचोरीत भारणे आणि एका शेगडी जवळ बसून शेकडो कचोरी तळणे-  कष्टाचे काम आवडणे शक्य नव्हते. घरात नौकर ही होते पण हे काम सासू स्वत करायची. ती न सांगता माहेरी आली. त्यावेळच्या पद्धतिनुसार दुसर्‍या दिवशी तिला पुन्हा सासरी पोहचविले. सासरचे लोक चांगले होते.   लेबरला सीक्रेट कळले नाही पाहिजे म्हणून स्वत कष्ट करणे गरजेचे असते हे तिला समजविले.  ती निमूटपणे  काम शिकू लागली. दहा वर्षांत तिने सासूची जागा घेतली.