Skip to main content

ज़िंदगी एक सफ़र है ...

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 24/09/2026 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
"आयडे, परवा आपण दोघी रस्ता क्रॉस करताना ते गाणं म्हणत होतीस ना " ज़िंदगी  एक सफ़र है सुहाना".. त्याची दुसरी ओळ सारखी सारखी विसरतेय मी. ए सांग ना मला. "
 
"आणि बाबाला विचारलं तर इतक्या भसाड्या आवाजात म्हणून दाखवेल की मी हसेन आणि तो चिडून माझा गालगुच्चा घेईल, मग मी चिडेन अन् तो हसेल. नकोच ते"
 
" ए आई सांग ना ती ओळ"
 
" आणि आई, ही दिवाळीची पणती दुपारीच का लावून ठेवलीय? गणपतीत कोणी दिवाळी करतं का?"
 
" ए आयडे, काही बोलतच का नायैस तू? .तू आपली सारखी त्या पणती मागच्या फोटोकडेच बघतीयेस."
 
"एवढं कायै त्यात...?"
 
" अगं ...हा फोटो.. तर..
  मा..
..झा?"
लेखनविषय:

वाचने 62
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया