Skip to main content

भूतम् भयभीतम्

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 20/09/2026 10:03 या दिवशी प्रकाशित केले.

बोतल बोले तो बरबादी.....

...."सोमरसे" घराण्यातले आम्ही सहा सहोदर पिऊन चारचाकी चालवताना एकसमयावच्छेदे खपलो.

यथावकाश चिकित्सक चार्वाकवाद्यांना चकवून चक्क भुतं झालो. 

मग "भूतदयाभवन" या वडिलोपार्जित वाड्याला प्रवेशद्वारापासून पार परसबागेपावेतो पछाडून तिथेच  तळ ठोकला.

परवा सर्वपित्रीच्या मध्यरात्री  उपाशीपोटी लपाछपी खेळत तरंगत असताना वाड्याच्या दारावर थाप पडली.

मी भूतच ! न भिता दार उघडलं.

"तो" तडक आतच आला.

आम्ही भुकेनं भंजाळलो होतो.

मतकऱ्यांच्या "जेवणावळ" कथेतील ट्विस्ट आठवून आम्ही जिभल्या चाटू लागलो तोच "त्यानं" काहीतरी पुटपुटत भक्क उजेड केला. आम्ही भुतांनी दिपलेले डोळे मिटले.

डोळे उघडतो तो काय?

आम्ही एकसमयावच्छेदे त्याच्या हातातल्या बेढब, बळकट, बोरोसिलिकेट बाटलीत बूचबंद !

...... बोतल बहुतही बूरी बबुआ.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया