Skip to main content

मोजमाप

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 04/08/2026 18:17 या दिवशी प्रकाशित केले.

भाभीने चुकून पकडला , दुधवाल्याचा हात
"सॉरी" म्हणूनही भैय्या पडला भाभीच्या प्रेमात
"ठीक है" म्हणून त्याने जरा दुध जास्त टाकले
भाभी झाली खुश, तिलाही बरे वाटले

भल्या पहाटे सुरु झाला, हातशिवनीचा खेळ
दुधाची साय जाड झाली, कारण दूध होते निर्भेळ
अंगकाठीने जाडजूड तरी भाभी होती तबाही
दिसेल तिथं घुसत सुटला किटलीपण सुटली नाही

भाभी रोज हात पकडून, टोप देई त्याला
स्पर्शानेही अर्धा होऊनि, दूध भरून देई तिला
भाव दुधाचा वाढलाच नाही , भाभीचा होता हात
स्पर्शासाठी आसुसलेला , म्हैस वाढली गोठ्यात

म्हैस निघाली खादाड तरीही वैरण टाके तिला
दोन थेम्ब तरी जास्त मिळावे म्हणून आचळे चोळत बसला
दूध नव्हे हे तर पाणी आहे इतर बोंबलू लागले
हातशिवणीचे प्रकरण एकदा शेजारणीने बघितले

हवेत फैरी झाडल्या गेल्या , कानोकानी पसरल्या
महिला साऱ्या टोमणे मारुनी भाभीवरती घसरल्या
उगा नको कुठे वाच्यता म्हणुनी भाभी पडली आजारी
नवरा पहाटे उठुनी आता कामे करतो सारी

भैय्या वैतागून तिच्या हातास बेचैन झाला
आठवणीने व्याकुळ होऊनि भलतीचा हात पकडला
थेट किंचाळी आसमंती अशी काही दुमदुमली
भैय्याने मग धंद्यासंगे म्हैसपण विकून टाकली

भाभी आता बरी आहे , वाट पाही भैयाची
दुसरा आता दुध टाकतो पण सर नाही त्या सायेची
गोठा त्याने तोडून टाकला, टेलर बनला चुपचाप
हक्काने तो प्रत्येकीचे आता घेत राहतो मोजमाप  

 

सिद्धेश्वर विलास पाटणकर 

लेखनविषय:

वाचने 43
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया