Skip to main content

El Niño

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 20/06/2026 16:03 या दिवशी प्रकाशित केले.

यक्ष विरहार्त झाले
मेघ संपावर गेले
"संप बेमुदत त्यांचा"
El Niño ने म्हटले

"ज्यांचा टँकरचा धंदा
त्यांचे भाग्य उजळले
दुवा देतील ते मला"
El Niño ने म्हटले

पाणी नभीचे आटले
पाणी डोळ्यात दाटले
"पाणी तोंडचे पळेल"
El Niño ने म्हटले

"पावसाळी कवितांचे
बाण तुझ्या भात्यातले
यंदा गंजणार नक्की"
El Niño ने म्हटले

लेखनविषय:

वाचने 99
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्तच कल्पना.आवडली.

 

पण हे सर्व भयंकर आहे.

 

निसर्गाचे खेळ का कर्माचे फळ