✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुंदर तलम रेशीम.. (धागा -३)

प — प्राजु, Wed, 01/09/2008 - 01:19

प्रतिक्रिया द्या
20369 वाचन

💬 प्रतिसाद (51)
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 01:21 नवीन

पाऊस

पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन

सरींवर सरी

पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ
ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन

धरेशी

धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 01:35 नवीन

पाण्यात

पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:38 नवीन

धरेला गूज

धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन

आई.... शपथ्थ!

ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन

धरणी.....

बरसणार्‍या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 01:44 नवीन

लाजलाजली

लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:50 नवीन

मन वढाय वढाय

आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:52 नवीन

आज 'मी' झालो

आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 01:56 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद.. विनोबा, उद्या या पुन्हा..असेच. -प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 02:01 नवीन

हो!

हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:00 नवीन

मन.....

न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 02:13 नवीन

मन माझे

मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 02:04 नवीन

हो..

अमेरिकेत आहे मी. - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 02:22 नवीन

माझ्या

माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:29 नवीन

परत एकदा माझ्या मनाचा थांग......

माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :((
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/11/2008 - 00:08 नवीन

खूप खोल

खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 01/11/2008 - 00:45 नवीन

भावना.......

तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/11/2008 - 01:25 नवीन

भवनेला

भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 01:50 नवीन

माझं मन

पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Fri, 01/11/2008 - 01:53 नवीन

अबोल अबोली

अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 02:07 नवीन

आभास

तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:15 नवीन

तसं पाहीलं

तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/11/2008 - 23:25 नवीन

तुझं हसणं

तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु..
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:40 नवीन

शिंपलेस

शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सनिल पांगे Sun, 01/13/2008 - 21:07 नवीन

प्रेम' .....

प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/13/2008 - 22:39 नवीन

मनांत

मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:16 नवीन

अशृ...

मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 01:28 नवीन

समुद्राने

समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:34 नवीन

सागराच्या

सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 01:38 नवीन

जीवनाच्या

जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:49 नवीन

कुंकु

तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:58 नवीन

तूझ्या

तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:04 नवीन

स्वप्न

स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन

सुख म्हणजे काय?

सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:09 नवीन

ढग दाटून

ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन

पाऊसही

पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:17 नवीन

वेडा आहे

वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:18 नवीन

रात्र अशी

रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:20 नवीन

वेडा आहेसच

वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:31 नवीन

मी आहे जरा

मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:34 नवीन

शब्द मुके

शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:39 नवीन

मूक प्रेम

सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:43 नवीन

पानगळ

शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:45 नवीन

खूप काही

खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:52 नवीन

तू हवीस फक्त

तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:48 नवीन

गळताना

गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:59 नवीन

प्रेमाचा

प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Tue, 01/15/2008 - 02:58 नवीन

वेड्यासार

वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा