कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच
घरात कॉक्रोच दारात कॉक्रोच
ऑफीसात कॉक्रोच ट्रेन मध्ये कॉक्रोच
सगळीकडे कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच
आम्ही नाही आळशी करतो काम काम
डिग्री असूनही मिळत नाही दाम
पेपर लीक होवूनही सगळे बसले स्वस्थ
नेत्यांनाही टेंन्शन नाही परदेशी जातात मस्त
बेरोजगारी महागाई कमी पगार आणि कॉन्ट्रॅकची नोकरी
लायकी असूनही मिळत नाही छोकरी
ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे जातो पैसा
ज्याच्याकडे नाही पैसा त्याच्याकडे राहील कैसा?
न्याय तर मागूनही मिळत नाही
मिळालातरी अंमलात आणला जात नाही
आता भावांनो करा सुट्टी या सगळ्यांची
एकत्र या अन लढा द्या भामट्यांशी
बदलून टाका लढण्याचा अॅप्रोच
कारण सगळीकडे कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
168
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया