भूज पर्यटन
भूज लेख

कच्छ रणोत्सव जाहिराती आणि विडिओ पाहून ठरवलं की त्या टेंटसिटीमध्ये नाही राहिलो तरी तो भाग पाहून येऊ. यासाठी कच्छमधले मुख्य शहर भूज येथे जाण्यायेण्याची रेल्वे तिकिटे काढली डिसेंबर २०२५ मधली. रेल्वे शिवाय विमानाचा पर्याय आहेच. विमानतळ चार किमिटरवर आहे.भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तान हद्दीजवळ असल्याने भूजचे महत्त्व आहे.
भूजच्या आसपास पाहाण्यासारखी ठिकाणे...

शहरामध्ये - हमिरसर लेक, म्युझियम, रामकुंड, प्रागमहल, ऐनामहल, छत्तरडी, स्वामिनारायण मंदिर ( जुने आणि नवे),भुजियो डुंगर ही सर्व रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड पासून चार किमि परिसरात आहेत. ओटोने सहज जाता येते. स्पेशल ओटो/टॅक्सी वगैरे करण्याची जरूरी नाही.

भूज शहरापासून दूरची ठिकाणे - सफेद रण आणि टेंट सिटी. (८०किमि). धोलाविरा (८०किमी) , काळो डुंगर तिन्ही उत्तरेला आहेत. काडो धोर्यो (४०किमी) . स्पेशल टॅक्सी करावी लागते. वाहन लागेल. भूजजवळ असलेल्या जैन आणि हिंदू मंदिरांना भेटी देणारे भाविक सकाळीच भूजमध्ये उतरतात. त्यात 'माता नो मढ' हे मुख्य आहे. तिकडचे कोल्हापूर असावे. इथली देवी आहे आशापूरा माँ.

मांडवी किनारा आणि विजय विलास पॅलेस. (८०किमि)दक्षिणेस आहे.
भूज पासून जवळच असलेल्या चोभारी गावात केंद्र असलेल्या ठिकाणी जो भूकंप झाला २६ जानेवारी २००१मध्ये त्यांच्या धक्क्याने भूजमधील बरीच स्थळे नष्ट झाली होती. इथे पाहा https://en.wikipedia.org/wiki/2001_Gujarat_earthquake

हॉटेल्स राहाणे

बस स्टँड ते स्टेशन रोडवर बरीच हॉटेल्स आहेत. १. सहारा २.आभा ३. अंजली ४. शिव रेसिडेन्सी. या सर्वांमध्ये गर्दी दिसली पण रुम अंजली मध्ये मिळाली . साधारणपणे१६०० नॉन एसी, २४०० एसी रेट आहे.

खाणे रेस्टॉरंट्स

आमच्या हॉटेल अंजलीच्या जवळ संकल्प आणि नीलम होते. महागडे. संकल्प मध्ये फक्त एक चहा एक कॉफी साठी १८० रुपये घेतले. ग्रीन पार्क जुनाट आहे. बस स्टँड मध्येच जलाराम भवनमध्ये १२० रु अमर्यादित शाकाहारी थाळी उत्तम होती. तर रामकुंडजवळ एक खानावळ आहे त्यात वीस रुपयांत अमर्यादित थाळी होती. चांगलं जेवण. मेन रोडवर सकाळी टपऱ्या लागतात तिथे पोहे, चहा, कॉफी स्वस्तात चांगली मिळते पण आठच्या नंतर पोहे मिळत नाहीत. धार्मिक पर्यटन वाले सकाळीच येतात ते टपऱ्यांवर नाश्ता करतात.

स्वच्छता
बस स्टँड आतमध्ये अतिशय स्वच्छ आहे. मात्र बाहेरचा परिसर फार अस्वच्छ आहे.

दोन दिवसांत काही जागा फिरलो त्यांची क्षणचित्रे देत आहे.

( नवीन मिसळपाव साईटवर फोटो थेट देता येत आहेत. बाहेरील photo sharing sites चा आधार घ्यावा लागत नाही आणि त्या लिंक्स चालतही नाहीत. अगदी 5MB चा फोटोही थेट अपलोड होतो हे तपासले. परंतू असे फोटो बरेच दिल्यास लेख लवकर उघडणार नाही म्हणून इथे देण्याचे फोटो प्रथम 800kB -1200kB करून घेतले.)

फोटो १. नकाशा १.भूजच्या जवळची ठिकाणं
फोटो २.नकाशा २.भूजच्या जवळची ठिकाणं
फोटो ३.हॉटेल अंजली मधली रुम
फोटो ४.हमिरसर लेकच्या किनाऱ्यावरचे पक्षी
फोटो ५.नवे स्वामिनारायण मंदिर प्रवेशद्वार
फोटो ६.नवे स्वामिनारायण मंदिर प्रवेशद्वार
आपण कच्छ रणोत्सव टेंटसिटीचे ऑनलाईन बुकिंग केले असेल( दोघांसाठी एक तंबू १८०००रुपयांपासून पुढे) तर भूज स्टेशनला लागूनच त्यांचे स्वागत कक्ष आहे तिथे गेल्यावर सर्वांना थांबवण्यात येते. मग त्यांच्या बसने टेंट सिटीला नेतात. त्यांचा चेकइन टाईम दुपारी बारा असतो. तिथे राहिल्यावर तिथून चार किमि अंतरावर सफेद रण आहे. हे रण म्हणजे दीडशे किमी पसरलेले मिठागर आहे. मीठ पसरलेले असते. हा सर्व भाग पाकिस्तान हद्दीजवळ असल्याने आर्मीची परमिशन लागते. भूजमधून एकच एसटी बस सकाळी आठला स्टँडवरून निघते ती दोन तासात परमिट गेटला सोडते. तिकडे परमिट काढून स्पेशल बसने पुढे जाता येते. परतीसाठी बस नाही. वाटेत मेन रोड सोडून डावीकडे वळतो त्या भिरंडियारा गावाजवळ चहा नाश्तासाठी बस थांबते. गोड कुंदा मिळतो तो फारच गोड असतो. भूज ते भिरंडीयारा पन्नास किमि आणि पुढे तीस किमि असे ऐंशी किमी अंतर आहे. परतताना टेंटसिटी ते भिरंडीयारा(३०) प्रवासासाठी खाजगी टेंपो प्रत्येकी दिडशे रुपये घेतात. ड्रायवर बोलला की या सफेद रणोत्सवमुळे इकडच्या गाववाल्यांना रोजगार मिळाला.
बाकी टेंटसिटी मिठागरावरच आहे.टेंटसिटीच्या अगोदरही खाजगी वसतीस्थान झाली आहेत. इथे नोव्हेंबरला आलेलं समुद्राचे पाणी वाटतं आणि जिकडे तिकडे मीठच मीठ दिसतं. वाळूऐवजी मीठ. पण या वर्षी पावसाळा लांबल्याने मीठ ओलंच होतं. जेव्हा वाळतं तेव्हा इकडच्या राहण्याच्या जागा भरून जातात. मे महिन्यात संपूर्ण टेंटसिटी उतरवतात आणि ऑक्टोबरला पुन्हा बांधतात. तंबूबाहेर बघण्यासारखं काही नाही. रात्री सांस्कृतीक नाच गाणी असतात. जेवणात पारंपरिक बाजरीची भाकरी, गूळ, टोमॅटो शेव भाजी, भोपळ्याची, दुधीची भाजी आणि कढी असते. केवळ मार्केटिंग आहे. येणाऱ्या पर्यटकांची गुजरातचेच रहिवासी जे आता प्रदेशांत आहेत ते असतात अमेरिकन गुजराती जास्तीच. त्यामुळे इथले दर आपल्याला महाग वाटतात. राजस्थानच्या जैसलमेर पेंट सिटीला पर्याय म्हणून काढले आहे पण वाळू ती वाळूच आणि मीठ ते मीठ. मजा नाही.

फोटो . सफेद रण
सफेद रणाकडे जाताना मीठ घेऊन जाणारे मोठे ट्रक दर पाच मिनिटाला दिसतात. हे मीठ कांडला किंवा मुंद्रा बंदरात नेतात. प्रवासात भूज आणि आसपासच्या प्रदेशांत असं चित्र दिसत राहातं.

फोटो ७.
फोटो ८.
फोटो ९.
फोटो १०.
फोटो ११.
इथे बांधणी ( बंधेज)साड्यांचं मोठं मार्केट आहे.
प्राग महाल आणि ऐना महल हमिरसर लेकच्या उत्तरेला आहेत. भुकंपाने तडे गेले आहेत. ऐना महाल लवकर बंद होतो. तो पाहता आला नाही.

फोटो १२ .प्राग महाल
फोटो १३.प्राग महाल
फोटो १४.प्राग महाल
फोटो १५.प्राग महाल
फोटो १६.प्राग महाल
फोटो १७.प्राग महाल
हमिरसर लेकच्या दक्षिणेला आहे छत्तरडी. आता दुर्लक्षित ठिकाण. मुसलमान राजांच्या कबरी पाहून हिंदू राजेही समाध्या बांधू लागले होते. या आहेत महत्त्वाच्या लोकांच्या समाध्या म्हणजे छत्र्या. भुकंपात बऱ्याच ढासळल्या आहेत. तीन प्रकारच्या आहेत. जे वीर युद्धात मेले आहेत त्यांची स्मारके अशी आहेत.चंद्र सूर्य प्रतिकासह.

फोटो १८
ज्या राण्या/ स्त्रिया सती गेल्या त्यांचे असे हातशिल्प आहेत.
फोटो १९.
त्यांचे निधन झाले त्यांची पावले आहेत.

फोटो २०.
एखाद्या लढाइतील / युद्धातील मेलेल्या वीरांसाठी असे मोठे दालन असावे. छप्पर पडले आहे तरी कलेची कल्पना येते.

फोटो २१.
ही थडगी मात्र मुसलमान वीरांची असावीत.

फोटो २२ .
पटृटराणीसाठी अशी समाधी असेल.

फोटो २३.
सकाळी दहा वाजल्यानंतर अचानक मोठा आवाज झाला आणि आकाशात फायटर जेट उडताना दिसले. पाच दहा मिनिटांनी आणखी एक उडाले. असं बरेच तास चालू होते. भूज एअरपोर्ट आर्मी आणि नागरी वाहतुकीचा एकच आहे. तर हा विमानांचा सराव सतत चालू असतो दिवसा.

बरीच ठिकाणं पाहिली नाहीत. भूज कसं काय आहे हे थोडक्यात समजलं. भूजच्या अगोदर गांधिधाम जंक्शन हे नवीन स्टेशन केलं आहे. इथे गाडीची एंजिनं फिरवतात. इथून मुंद्रा आणि कांडला बंदरांकडे जाणारे रेल्वेमार्ग आहेत.

नवीन मिपावर फोटोंसह लेख लिहिण्याची ही चाचणी आहे.
प्रतिक्रिया
संपादन. html tags break line…
संपादन.
html tags break line चे
संपादनमधून आता काढता येत नाहीत.
फोटो छान दिसताहेत, धागा…
फोटो छान दिसताहेत, धागा सवडीने वाचतो!
१. संपादन बटण आहे पण संपादन…
१. संपादन बटण आहे पण संपादन होत नाही.
२. माझ्या अकाउंटला किती स्टोरेज दिलं आहे? (64MB?)

फोटो क्रमांक ८ मध्ये हिरवी झाडे दिसताहेत त्याबद्दल रेल्वेने परत येताना तिकडच्या प्रवाशांना विचारलं की ही बाभळीची झाडं आहेत का? तर ते म्हणाले की नाही. दातणसाठी ज्या बाभळीच्या काड्या गुजराती लोक वापरतात ती बाभळ नाही. किंवा ज्यातून गोंद काढतात तीही नाहीत. यांचा काहीच उपयोग नाही. इकडे सर्व उजाड खारी जमीन आहे त्यात कोणती झाडे जगतील हे त्या वेळच्या सरकारने शतकी खात्याला विचारल्यावर या बाभळी बद्दल सांगितले. मग सरकारने या बाभळीचे बी हेलिकॉप्टरमधून शिंपडले. आता ही झाडे घट्ट रुजली आहेत काढता ही येत नाहीत. फक्त सावली आणि हिरवे रान आहे.
मिपावर अजून बऱ्याच सुधारणा…
मिपावर अजून बऱ्याच सुधारणा बाकी आहेत असे दिसते.
बाकी लेखन नेहमीप्रमाणेच मस्त