नवटाक टाकून रावल्याचा रडंवा बाप मुडद्यागत पडायचा. कधीमधी मोकाट सुटलेल्या सांडागत माळरानी तोंड मारायचा पण तरणाबांड रावल्या मात्र तापल्या तव्यावर उताणा पाताणा..
चुलीवर आगीची आन बाजेवर शेजेची वाण होती.
तालुक्याला एष्टी सुरू झाली अन बैलांच नशीब फळफळलं, बाजारी हेलपाटे बंद झाले.
रावल्याच घोडं कुठ पेंड खात होतं कुणास ठाऊक?
कवळ्या काकडीगत काळीसावळी तरतरीत कंडाक्टर पोर बघून रावल्या हरखला. नदरेला नदर भिडली,बाचक्याला उचलताना ओझरता हातभार लागू लागला.दर बाजारी असच घडू लागलं. ढाराढूर ,गपगुमान मेल्यागत पडून राणारा रावल्या येरवाळीच उठू लागला.तोंडाला फेस अन केसाला तेल चोपडू लागला. गळ्यात रुमाल अन डोईवर गाॅगल सजला....
रातदिस घुमान घुमाया लागलं........
आज तुकडा पाडायचाच,रावल्या फुसफूसला,
"पीक सुगीवर आलयं,मळणीला येतीस का?"
काळजाचा ठोका चुकला.....
.
.
.
.
.
.
.
.
"भावजी सुगीचं नंतर बघू, आदुगर तिकीट काढा नाहीतर दंड भरावा लागल!"
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिशोबाचे बोला भावजी.
मस्त
मस्त
याला म्हंतात केयलपीडी.
झकास. याला म्हंतात केयलपीडी.
झकास शशक
आदुगर तिकीट काढा नाहीतर दंड…
कर्नल सायेबानी झ्याक सुरवात…
हा हा.. जबर्दस्त ..
हा हा.. जबर्दस्त ..
KLPD / ULPD
हा हा! जमलिय!
हा हा! जमलिय!
खाली उतरून द्यायचं नाय तर…
खाली उतरून द्यायचं नाय तर सरळ पोलीस स्टेशनला न्यायची गाडी.