क्लीन बोल्ड

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
4 Feb 2026 - 12:58 pm

क्लीन बोल्ड

महाराष्ट्र क्रिकेट संघटना,
सर्वोच्च कोर्टात ली घटना ||

MCA निवडणूक प्रकरण,
सदस्यवाढ हे कारण ||

सरन्यायाधीश संतापले,
MCA प्रमुख असावा
माजी खेळाडू,
इथे घराणेशाही
नका काढू.

MCA चे सदस्य १६४,
काकांच्या नातू नं ,
गुपचुप पक्ष धार्जिणे
४०० सदस्य वाढविले आतून ||

ही कृती बेकायदेशीर,
मी डीसमिस करू का,
का करताय उशीर??

जर सदस्यसंख्या
वाढवायची,
तर माजी खेळाडूंसाठी
राखीव काढवायची ||

ज्यांना धरता येत
नाही बॅट ,
त्यांची का सदस्य म्हणून
करतात बात?!

न्यायाधीशांचा यॉर्कर
होता अफलातून,
क्लीन बोल्ड झाले
काका,नातू मनातून ||

काकांचा चाललाय
बॅड पॅच ,
सारखे विरोधक
घेतायत कॅच ||

कविता