✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य

व
विवेकपटाईत यांनी
Tue, 02/03/2026 - 16:53  ·  लेख
लेख
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.” तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.” ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला. धूम्राक्ष पुन्हा आदेशाच्या प्रतीक्षेत उभा राहिला. काळ पुढे सरकतो.अर्जुन धूम्राक्षला खांडववन जाळण्याचा आदेश देतो. धूम्राक्ष अग्नीच्या साहाय्याने वनातील जीव जंतु आणि वनस्पतींना गिळतो. जीव कासावीस झाल्यावर काही वनवासी जंगलातून बाहेर येऊन अर्जुनाला शरण येतात. ते जगातील पहिले विस्थापित झाले. खांडववनाच्या राखेवर इंद्रप्रस्थ उभं राहतं. धूम्राक्षच्या मदतीने आज मुंबई, नोयडा सारखी शेकडों महानगरे उभी राहिली आहे. माणसाची प्रत्येक इच्छा हा पूर्ण करता-करता, धूम्राक्ष धूर गिळत-गिळत एवढा मोठा झाला आहे, कि आज संपूर्ण पृथ्वी त्याच्या अशरीरी शरीराने झाकल्या गेली आहे. काल संध्याकाळी मी गच्चीवर उभा होतो. धूम्राक्ष दिसला. मी म्हणालो, “तुझ्यामुळे मला अस्थमा झाला आहे.” तो शांतपणे म्हणाला, “मालक, मी तुमच्या इच्छांमुळे वाढलो आहे. बिना धुराच्या मदती शिवाय गाड्या, इमारती आणि एसी निर्मित होऊ शकत नाही." वातावरणात धूर पसरणार, त्याची फळे ही तुलाच चाखावी लागणार. मी गप्प झालो. खोलीत आलो. AC सुरू केला. पण झोप आली नाही. शेवटी एक विचार मनात आला. आपण यज्ञात आहुति देताना "इदं न मम" म्हणतो पण प्रत्यक्षात प्रत्येक वस्तु स्वत साठी मागतो. यातूनच धूम्राक्ष जन्म घेतो. कदाचित मानवाच्या अपरिमित इच्छांची पूर्ती करता करता, एक दिवस धूम्राक्ष मानवालाच गिळून टाकेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
816 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ही कथा त्यातल्या त्यात बरी

युयुत्सु
Tue, 02/03/2026 - 17:02 नवीन
ही कथा त्यातल्या त्यात बरी आहे.
  • Log in or register to post comments

अहो भाग्य! अस्मादिक कृतार्थ

विवेकपटाईत
Sun, 02/08/2026 - 08:50 नवीन
अहो भाग्य! अस्मादिक कृतार्थ झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

युयुत्स्तु साहेब, तुम्ही कथा

विवेकपटाईत
Sun, 02/08/2026 - 08:52 नवीन
युयुत्स्तु साहेब, तुम्ही कथा बरी म्हटली, अस्मादिकांचा आनंद गगनात मावेसा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

छानच.

कॉमी
Tue, 02/03/2026 - 19:53 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments

मुक्तक आवडले

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 02/05/2026 - 12:36 नवीन
"इटींग युवर ओन फ्लेश" आशी एक म्हण आहे तसे काहीसे
  • Log in or register to post comments

टोल्किन साहेब

कॉमी
Sat, 02/07/2026 - 13:11 नवीन
टॉल्किन साहेबांचे एक पुस्तक नुकतेच (मृत्यूपश्चात) प्रकाशित झाले - The Bovadium Fragments ह्यात गाड्या व्हीलन आहेत.
As scholars pour over fragments unearthed from the archeological site at Bovadium, a handful of documents written in two languages reveal the secrets of this ancient place, which have lain buried for centuries. Evidently once upon a time a Daemon arose in nearby Vaccipratum, who by his cunning devised abominable machines, which he called Motores. The people of Bovadium first became enamoured of these machines, but soon became their slaves; and as the roads were gridlocked and the city polluted by their fumes, the end of Bovadium was nigh.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा