✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

क
कांदा लिंबू यांनी
गुरुवार, 01/01/2026 - 00:06  ·  लेख
लेख
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की. * कांदा लिंबू
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21215 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

१.खटले लढले जातील ते प्रथम

कंजूस
Tue, 01/27/2026 - 13:57 नवीन
१.खटले लढले जातील ते प्रथम विद्यापीठाच्या नियम अटी कायदे यांवर. मानसीक छळणूक फक्त. २. जिथे छळणूक झाली आहे आणि मृत्यूही झाला आहे तिथे पोलिस थेट हस्तक्षेप करतात भारतीय दंड विधान लागू होते. ३. वाच्यावरतीही भारतीय घटनेतील आल्यावरही आपला लंडनला जातो. व्यक्तिगत स्वातंत्र्य, जातपात धर्म यांची करणे. संबंधित विद्यार्थ्यांना कॉलेज सोडायला भाग पाडणे आणि त्यातून मुक्त होणे हाच सोपा मार्ग अवलंबला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुरुस्ती

कंजूस
Tue, 01/27/2026 - 14:00 नवीन
दुरुस्ती १.खटले लढले जातील ते प्रथम विद्यापीठाच्या नियम अटी कायदे यांवर. मानसीक छळणूक फक्त. २. जिथे छळणूक झाली आहे आणि मृत्यूही झाला आहे तिथे पोलिस थेट हस्तक्षेप करतात भारतीय दंड विधान लागू होते. ३. याच्यावरतीही भारतीय घटनेतील कलमांवरही खटला लढवला जातो. व्यक्तिगत स्वातंत्र्य, जातपात धर्म यांची कलमे. संबंधित विद्यार्थ्यांना कॉलेज सोडायला भाग पाडणे आणि त्यातून मुक्त होणे हाच सोपा मार्ग अवलंबला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

विद्यापीठात शिक्षण

हणमंतअण्णा शंक…
Wed, 01/21/2026 - 15:22 नवीन
>> तिचे तत्काल निलंबन होईल. अर्थात ती निर्दोष सिद्ध होईपर्यंत परत कॉलेज मध्ये जाऊ शकणार नाही. तिच्या शिक्षणाचे होणारे नुकसान कोण भरून देणार आहे ? << तिच्यावर अन्याय झाला आहे तिला सहानुभूती. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र तिचे निलंबन तिच्या पथ्यावरच पडणार आहे कारण विद्यापीठातले शिक्षण कुचकामी आहे. आणि येत्या १० १२ वर्षात त्या शिक्षणाला किती महत्त्व राहील हे देवालाच ठाऊक. ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्याही शिक्षण संस्थेची गरज आता राहिली नाही. समजा या शिक्षणात तिला प्रयोगशाळांची गरज लागणार असेल तर अशा प्रयोगशाळा कोणालाही भाडेतत्त्वावर मिळू शकतील अशी व्यवस्था झाल्यास या विद्यापीठ किंवा शाळा नामक तुरुंगांची गरज राहणार नाही.
  • Log in or register to post comments

१. अभ्यासक्रम स्वतः सोडून

कांदा लिंबू
गुरुवार, 01/22/2026 - 23:58 नवीन
१. अभ्यासक्रम स्वतः सोडून देणे वा तो अभ्यासक्रमाला मुळात प्रवेशच न घेणे आणि २. त्या अभ्यासक्रमातून स्वतःची काहीही चूक नसताना (खरंतर स्वतःवरच अन्याय झालेला असताना) निलंबन होणे या दोन बाबींत १८० अंशाचा फरक आहे. त्यामुळे
मात्र तिचे निलंबन तिच्या पथ्यावरच पडणार आहे कारण विद्यापीठातले शिक्षण कुचकामी आहे.
हे विधान त्या मुलीवर झालेल्या अन्यायाचे, त्या मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे, तसेच असे जिझिया कायदे करणाऱ्या शासन व्यवस्थेचे trivilization करते व गंभीर गुन्हा व अन्यायाच्या घटनेच्या चर्चेला अगदी अयोग्य वळण देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

१.नर्सिंग होम काढण्यासाठी

कंजूस
Tue, 01/27/2026 - 13:51 नवीन
१.नर्सिंग होम काढण्यासाठी एचडी डॉक्टर असावा लागतो हा एक नियम झाला. २.पण पैसेवाले किंवा एमडी नसलेले लोकही एक व्यवसाय म्हणून नर्सिंग होम काढतात आणि एका एमडी डॉक्टरास नोकरीवर ठेवतात. अधिकार / प्रमुखपद त्याच्या नावावर. ३. एक मोठी जागा घेऊन त्यात एमडी,एमएस भाडेतत्त्वावर ठेवतात. कुठेही कसलीही पाटी, सर्टिफिकेट लावलेले नाही, पैसे पूर्णपणे रोखीने घेऊन सेवा देतात अशीही हॉस्पिटले(!) आहेत. केवळ धंदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

मात्र तिचे निलंबन तिच्या

सुबोध खरे
Wed, 01/21/2026 - 20:00 नवीन
मात्र तिचे निलंबन तिच्या पथ्यावरच पडणार आहे कारण विद्यापीठातले शिक्षण कुचकामी आहे. अनाठायी प्रतिसाद
  • Log in or register to post comments

विद्यापीठातले शिक्षण

हणमंतअण्णा शंक…
गुरुवार, 01/22/2026 - 02:33 नवीन
सुबोधजी, तुम्च्या सारख्या मेडिकल डीग्रीचा किंवा काही मोजके अपवाद वगळता चारी बाजूला पाहा, काही ठराविक म्हणजे अगदी मोजक्याच स्टेम बेस्ड डिग्री वगळता सर्व शिक्षण निव्वळ बेकार आहे. त्यासाठी कुणालाही कॉलेजचा एकही रुपया भरायची गरज नाही. अगदी इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा कॉलेजची पायरी चढायची गरज नाही. काही वर्षांनी शिक्षण संस्था कालबाह्य होतील असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुबोधजी, तुम्च्या सारख्या

सुबोध खरे
गुरुवार, 01/22/2026 - 19:03 नवीन
सुबोधजी, तुम्च्या सारख्या मेडिकल डीग्रीचा किंवा काही मोजके अपवाद वगळता चारी बाजूला पाहा, काही ठराविक म्हणजे अगदी मोजक्याच स्टेम बेस्ड डिग्री वगळता सर्व शिक्षण निव्वळ बेकार आहे. त्यासाठी कुणालाही कॉलेजचा एकही रुपया भरायची गरज नाही. अगदी इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा कॉलेजची पायरी चढायची गरज नाही. काही वर्षांनी शिक्षण संस्था कालबाह्य होतील असे मला वाटते. हे आपले वैयक्तिक मत आहे. पदवीमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम कितीही निरुपयोगी असला तरी कोणत्याही नोकरीसाठी एक किमान पात्रता म्हणून पदवी आवश्यक असते. व्यवसाय करताना सुद्धा आपल्याला त्यात कितीही ज्ञान असले तरी कागदोपत्री पदवी आवश्यकच आहे. आपल्याकडे पदवी नसली तर लग्नाच्या बाजारात आपल्याला बारावी पास म्हणून बहुसंख्य स्थळे नकारच देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

श्रीगुरूजी मिपावर असते तर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/21/2026 - 21:23 नवीन
श्रीगुरूजी मिपावर असते तर मुंबई शिवसेनेच्या हातातून गेल्याबद्दल त्यांना अपार दुःख झाले असते.
  • Log in or register to post comments

जातियवादी भाजपाच्या विरोधात

मदनबाण
Sat, 01/24/2026 - 12:17 नवीन
जातियवादी भाजपाच्या विरोधात सोशल मिडियातील आवाज मोठा झाल्यावर आता मेनस्ट्रीम मिडिया [ न्यूज चॅनल्स ] ने UGC च्या बद्धल बोलण्यास सुरु केले आहे. या विषयावर अधिक जाणुन घेण्यासाठी द अभिषेक तिवारी शो या युट्युब चॅनलवर नेहा दास यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे, ती पाहण्या सारखी आहे. तसेच नेहा दास यांच्या एक्स हॅडलवर या विषयावर त्यांनी केलेल्या पोस्ट माहितीपूर्ण आहे. सवर्ण बच्चे क्यों जाएँगे जेल?Dharmendra Pradhan | Narendra Modi | Neha Das |The Abhishek Tiwary Show झी न्यूजः DNA: UGC के नए नियम से समानता या भेदभाव ज्यादा? University Grants Commission रिपब्लिक भारतः UGC Guidelines 2026: SC/ST और OBC पर UGC की नई गाइडलाइन से क्यों नाराज छात्र? जनरल कैटेगरी का अंत! जाता जाता: Odisha SDTE panel approves 11.25% SEBC quota, raising SC/ST seats in tech, med courses

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kya Miliye Aise Logon Se... Izzat (1968 )
  • Log in or register to post comments

कोश्यारी यांचं अभिनंदन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/26/2026 - 18:36 नवीन
महाराष्ट्रात विवास्पद कारकीर्द सांभाळलेले, महापुरुषांबद्दल काहीच्या काही बोलून चर्चेत राहिलेले आणि अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असतांना पहाटे शपथविधीस उपस्थित झालेले माजी राज्यपाल कोश्यारी यांना आज पद्मभूषण देऊन गौरवण्यात् आले. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

माझा ह्या पुरस्कारावरून

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/26/2026 - 19:54 नवीन
माझा ह्या पुरस्कारावरून विश्वास उडाला आहे! नीतिमत्ता वगैरे काही असते की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरस्काराचा अपमान

स्वधर्म
Tue, 01/27/2026 - 16:25 नवीन
कोश्यारी आणि धीरेंद्र या दोघांना पद्म पुरस्कार म्हणजे अवघड आहे. पण आताशा इतक्या नैतिक पडझडीचे आश्चर्यही वाटत नाही. तथापि इथे कोणी या दोघांचे समर्थन करणारे असतील तर त्यांचे मत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा अंधभक्त टैग लागला की

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/27/2026 - 18:54 नवीन
एकदा अंधभक्त टैग लागला की बलात्काऱ्यांचेही समर्थन करतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

माजी राज्यपाल कोश्यारीला (

आग्या१९९०
Tue, 01/27/2026 - 00:14 नवीन
माजी राज्यपाल कोश्यारीला ( महात्मा फुले आणि पत्नीस हिडीस पद्धतीने वक्तव्य फेम) - पद्मभूषण धीरेंद्र शास्त्री - भारतीय गणवेशधारी सैनिकांची सलामी बेशक मंदिर मस्जिद तोडो बुल्लेशाह ये कहता ... भारतात बुल्लेशाहची प्रतिकात्मक थडगे उखडले अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिन माफ़ करना भाईयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला गांxवर म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम, सलाम, सबको सलाम भाईयों और बेहेनों, सबको सलाम. कवी - मंगेश पाडगावकर
  • Log in or register to post comments

बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

सिद्धार्थ ४
Wed, 01/28/2026 - 11:04 नवीन
बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. अजित पवार हे आज सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळले. या अपघातात अजित पवारांसह इतर तीन जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह इतर जखमींना बारामतीतील रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु तत्पूर्वीच त्यांच्या प्राणज्योत मालवली होती
  • Log in or register to post comments

अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

धर्मराजमुटके
Wed, 01/28/2026 - 13:04 नवीन
अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

विमान नक्की कोसळलं की आजून काही ?

गामा पैलवान
Wed, 01/28/2026 - 14:06 नवीन
इथे असलेल्या प्रत्यक्षसाक्षी महिलेने विमान धावपट्टीवर चिकटल्या नंतर स्फोट झाल्याचं सांगितलं आहे : https://www.loksatta.com/maharashtra/ajit-pawar-death-plane-crash-timeline-what-happened-between-mumbai-to-baramati-journey-know-details-hrc-97-5673253/ वरील बातमीनुसार :
पहिल्यांदा विमान जेव्हा वरुन गेलं तेव्हा फिरून आलं, मग ते आणखी खाली आलं, त्यानंतर ते आणखी खाली आलं आणि धावपट्टीला चिकटलं. त्यानंतर अचानक मोठा आवाज होऊन विमानाचा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर अनेक तुकडे उडाले. विमानाचे अवशेष आमच्या घराजवळही पडले होते, असं एका प्रत्यक्षदर्शी शेतकरी महिलेने सांगितलं.
यावरनं विमानातच ध्वंस्फोटक ( बॉम्ब ) असावासं वाटतं. पोलिसांना माहिती असेलंच. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

आले

कपिलमुनी
Wed, 01/28/2026 - 15:10 नवीन
यांना प्रत्येक अपघात हा घातपात दिसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तसाच तो धरायचा असतो ....

गामा पैलवान
Wed, 01/28/2026 - 15:41 नवीन
प्रत्येक दुर्घटना ही सुरुवातीला घातपात म्हणूनंच धरायची असते. नंतर पुरावे मिळतील वा न मिळतील त्यानुसार धारणा बदलायची असते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

प्रत्येक दुर्घटना ही सुरुवातीला घातपात म्हणूनंच धरायची असते.

धर्मराजमुटके
Wed, 01/28/2026 - 16:23 नवीन
प्रत्येक दुर्घटना ही सुरुवातीला घातपात म्हणूनंच धरायची असते.
ते बरोबर असेल पण तुमचा एकंदर जालीय वावर पाहता तुम्हाला मुळ शंकेला चिकटून राहायचे आणि त्याभोवती नवनवीन थिअरीज मांडायचे आकर्षण जास्त आहे असे दिस्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

कुणी केला असेल बरं?

हणमंतअण्णा शंक…
Wed, 01/28/2026 - 16:53 नवीन
गामा, जर हा घातपात असेल तर कुणी केला असण्याची शक्यता आहे असे तुम्हाला वाटते? खरेतर सर्व महाराष्ट्राला हा घातपात आहे याची शंका आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

cui bono ?

गामा पैलवान
Wed, 01/28/2026 - 20:05 नवीन
cui bono ? हा प्रश्न विचारायचा. इंग्रजीत ह्यास 'who benefits ?' असं म्हणतात. तर दादांच्या जाण्याने कोणाचा फायदा होणार आहे, हा प्रश्न विचारला पाहिजे. निदान सुरुवातीस तरी या प्रश्नाच्या उत्तराकडे संशयसूची वळणार. पुढचं पुढे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

विमानांसाठी एकच इंधन न वापरता

कंजूस
Wed, 01/28/2026 - 19:20 नवीन
विमानांसाठी एकच इंधन न वापरता दोन वेगळी हवीत. इंधन अ आणि ब वेगवेगळे काहीच धोकादायक नसणारे पण दोन्ही एका जागी आणल्यावर जळणार असं काही स्पेस रॉकेटांत वापरतात तसं.
  • Log in or register to post comments

विमान अपघाताची मिमांसा

कांदा लिंबू
Wed, 01/28/2026 - 19:23 नवीन
आज दि. ‌२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ‌ त्यांच्यासहित एकूण पाच जणांनी या अपघातात प्राण गमावले. ‌ अपघातातील मृतांना श्रद्धांजली. ॐ शांती. --- या विमान अपघाताची चौकशी होईलच. पण इथे मिपावर श्री गवि यांनी त्यासंबंधी लेख लिहावा, चर्चा सुरू करावी अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

दुर्दैवी घटना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/28/2026 - 19:41 नवीन
आज सकाळी अचानक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची बातमी आली आणि धक्का बसला. विश्वास बसला नाही. नेमकं काय झालं हे कळण्यापूर्वीच धक्कादायक बातमीत दमदार नेत्याच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. प्रशसनावर जबर पकड, तळागाळातील कार्यकर्त्याचा कायम गोतावळा, आणि शरद पवारांच्या तालमीतून तयार होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी छाप निर्माण केली. जाती-मातीच्या गटा-तटात मात्र अलिप्त राहिले असे वाटते. सर्वसमावेशक गोतावळा ही अजिदादा पवारांची ओळख महाराष्ट्रात झाली होती. एका दुर्दैवी विमान अपघातात काळाने त्यांना आपल्यात ओढून नेले. महाराष्ट्राच्या राजकारण-समाजकारणात दादा आपली आठवण कायम राहील. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यास भावपूर्ण आदरांजली. 😌🙏 -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अजितदादाना भावपूर्ण

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/28/2026 - 20:29 नवीन
अजितदादाना भावपूर्ण श्रद्धांजली! महाराष्ट्राला न लाभेलेल सर्वोत्तम मुख्यमंत्री असे अजितदादांबद्दल म्हणता येईल, दादा मुख्यमंत्री बनावेत अशी सुप्त ईच्छा मनात होती! सभेतील हजरजजाबीपणामुळे ते अनेक विनोद करायचे, आताच झालेल्या pcmc महापालिकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी कुत्र्यांच्या नसबंदी वर झालेल्या भ्रष्टाचारावर, “ती कुत्री काय म्हणत असतील?” अशी भाषणात केलेली मिश्किलीची रील व्हायरल झाली होती त्यावर खळखळून हसू आले होते, प्रचंड फिरणारे अनेक सभा घेणारे म्हणून अजितदादा माहीत होते. सकाळीच एक सहकाऱ्याने अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी वाचून सांगितले, तेव्हा छोटामोठा अपघात झाला असावा असे वाटले पण नंतर अपघाताचा फोटो पाहून चर्र झाले, नी थोड्याच वेळात बातमी आली. काही नेते विचारांच्यापलीकडे जाऊन आपले झालेल असतात हे ते गेल्यावरच कळते! दादाना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दादांना श्रद्धांजली.

कंजूस
गुरुवार, 01/29/2026 - 13:00 नवीन
दादांना श्रद्धांजली. ( पूर्व मिपाकर कै• वरुण मोहीते यांच्याशी दादांची दोस्ती होती.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा