✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

B
Bhakti यांनी
Mon, 12/29/2025 - 15:36  ·  लेख
लेख
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे. व्यासरचित महाभारत वाचायची इच्छा असणाऱ्यांना, परंतु इतका मोठा ग्रंथ आतापर्यंत शक्य नसल्याची जाणीव असते. अशा वेळी 'पर्व' वाचून त्याची छोटी, प्रभावी आणि वास्तववादी वाचण्याची तहान काहीशी शमली जाते. आताच्या पिढीतील वाचकांसाठी खास सुंदरता म्हणजे अमानवी संकल्पना ,चमत्कार दूर करून महाभारतातील पात्रांच्या मनोव्यापाराचे वास्तववादी चित्रण करणारी ही कादंबरी आहे.भैरप्पा यांनी कादंबरी लिहिताना अनेक वर्षे संशोधन केले. त्यांनी महाभारतात वर्णन केलेल्या स्थळांना – द्वारका, राजगृह, लोथल, कुरुक्षेत्र इ. ठिकाणांना भेट दिली होती. असं वाचनात आलं की हिमालयातील गढवाल प्रदेशात बहुपतित्व प्रथा आजही आहे, ती द्रौपदीच्या काळापासून चालू असल्याचे संशोधन त्यांना प्रेरणा देऊन गेले. कादंबरीत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय विश्वसनीय वास्तववादी वाटते. सुरुवात मद्रदेशातील राजघराण्यांतीळ पात्रांच्या युद्धासंबंधी संवादातून होते.हळूहळू कथा पांडवांच्या जन्माकडे कथा सरकते. इथला भाग पर्यंतचा 'देवसाहाय्याने पांडव जन्म' हे मिथक याचा उलगडा ,त्यांच्या नियोग जन्मरहस्याने होतो. उत्तरेकडील भारतात राहणाऱ्या हिमालयातील तत्कालीन लोकांना 'देव' संबोधले गेले आहे .तसेच राक्षस, नागयांनादेखील कादंबरीत लोकगण म्हणून वर्णन केले आहे. आपल्याला टीव्हीवरच्या महाभारताने खूप काळ भ्रमात ठेवले असं समजते :) :) 2 आतापर्यंत द्रौपदी, कर्ण, अर्जुन हे विविध लेखकांनी स्वतंत्रपणे मांडले आहेत. पण 'पर्व' कादंबरीत अनेक नावीन्यपूर्व तत्वचिंतनाने पात्रांची ओळख होते. भीम बलवान नायक तर दिसलाच, पण तो एक संवेदनशील, द्रौपदीसाठी जीव ओवाळणारा, प्रेम आणि कर्तव्य यात अडकलेला, हिडिंबा व घटोत्कचाबद्दल अपराधी भावनेने ग्रासलेला 'माणूस' म्हणून दिसला. "मी हिडिंबेला वनात सोडून आलो, तिच्या मुलाला युद्धात बलिदान दिले. मी पांडवांचा भाऊ म्हणून जगलो, पण पती आणि वडील म्हणून अपयशी ठरलो." 'पर्व' मधील सर्वात व्यावहारिक आणि राजकीय-बुद्धिमान पात्र मला 'कुंती' वाटली. पण ती दृष्ट्या गांधारीपेक्षा वेगळी. आधी आपल्याला मूल हवं, ज्येष्ठत्व हवं यासाठी ती पांडूच्या नियोगाचा वापर करायचे ठरवते. याआधीच तिने कर्णाचा जन्म, त्याग गुप्त ठेवीत सामाजिक स्थितीचे रक्षण केले असते. नंतरही पांडवांना नेहमी वास्तवाची जाणीव करून देते आणि त्यांना नैतिक अधःपतनापासून वाचवते. ती पांडवांना कधीही दासींबरोबर संबंधांना नकार द्यायला सांगते. भीम हिडिंबा व मुलात अडकलेला दिसताच ती लवकरच भीमासह ते स्थान सोडते. तिचा द्रौपदीला बहुपतित्व मानायला भाग पाडून भावांभाषांचे एकत्रित करणे? कर्णाकडे आपल्या पाच मुलांना जीवनदान मागते. इतकेच नाही तर शेवटी युद्धात कुरुवंशाचा महाविनाशानंतरही ती पुन्हा वंशासाठी गर्भधारणेचा द्रौपदीला सल्ला देते. यामधील कायम भव्यदिव्य दिसणाऱ्या राजमहालांचे वातावरण युद्धकाळात चणचण भासणाऱ्या काळ्या सावटाखाली होते, हे वाचणे अगदी वेगळा अनुभव देते. जसे – दिवा लावायला तेल नाही म्हणून धृतराष्ट्र दासीला ऋण घेऊन तेल आणण्यास सांगतो.द्रोण दुधावर वा पाण्यात सातूवर भूक भागवतात. युद्धात सर्व मनुष्य, प्राणी शक्ती पूर्णपणे वापरली जाते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचे, सेनापतींचे दैनंदिन जीवन, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि युद्धपटांचे वर्णन इतके तपशीलवार आहे की वाचताना पोटात खळबळ वाटते. --युद्धात इतकी जीवितहानी होते की सर्वत्र मांस, रक्त यांचा खच पडतो, प क्षी प्राणी प्रेतांवर झुंबड उडवतात. --माणसांच्या मलाचा सर्वत्र दुर्गंध पसरतो. या अशा कारणांमुळे युद्धभूमी-युद्धाचे ठिकाण बदलून ठराविक काळाने वा दररोज पुढे पुढे स्थान सरकवले जात असे. --युद्धात मेलेल्या घोड्याच्या मांसाचे भक्षण अन्नटंचाईमुळे करावे लागते. --संजयाला कुरुक्षेत्राकडे मोठमोठाले यानंतर कापत जाई आणि तितक्याच वेगाला पुन्हा परत महाली येऊन सर्व युध्द खबरबात धृतराष्ट्राला सान्गत असे ,दूरदृष्टीचा प्रश्नच मिटला. --शेवटी कृष्ण गांधारीला आपल्या डोळ्यावरची पट्टी काढायला सांगतो ,असा अकल्पनीय शेवट मी पाहिल्याचं वाचला . महाभारत --- "कुरुक्षेत्र हे युद्धाचे मैदान नव्हे, ते एक प्रचंड कत्तलखाना होते. मनुष्य, प्राणी, रक्त, मांस आणि हाडांचा ढिगारा. जे जिंकले त्यांनाही काही मिळत नाही. फक्त रिकामे हात आणि रक्ताने माखलेले मन." -भक्ती तुनळीवरचा परिचय https://youtu.be/Er_aInmde8c?si=_xjWNyREWw9bpAgw
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
1983 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

परिचयाबद्द्ल धन्यवाद

सौन्दर्य
Mon, 12/29/2025 - 23:15 नवीन
भक्तीजी , मी अमेरिकेत राहतो, हे पुस्तक मला कसे व कोठून विकत घेता येईल हे कळविल्यास आभार.
  • Log in or register to post comments

माहिती शोधावी लागेल.मेहता

Bhakti
Tue, 12/30/2025 - 14:31 नवीन
माहिती शोधावी लागेल.मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित कादंबरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

उत्तम परिचय.

प्रचेतस
Tue, 12/30/2025 - 12:11 नवीन
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.
  • Log in or register to post comments

मूळ संहिता अनेकदा वाचल्याने

Bhakti
Tue, 12/30/2025 - 14:27 नवीन
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सहमत

धर्मराजमुटके
Tue, 12/30/2025 - 17:38 नवीन
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आवरण

कांदा लिंबू
Wed, 12/31/2025 - 16:25 नवीन
परिचय आवडला. भैरप्पांची आवरण ही कादंबरीही वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments

आवरण वाचली आहे.खुपच

Bhakti
Wed, 12/31/2025 - 21:19 नवीन
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

मिपावरीलच आवारण कादंबरीचा हा

Bhakti
Wed, 12/31/2025 - 21:41 नवीन
मिपावरीलच आवारण कादंबरीचा हा एक धागा आहे. https://www.misalpav.com/node/43313
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

वा ! उत्तम

हेमंतकुमार
Mon, 01/05/2026 - 11:50 नवीन
परिचय आवडला. भैरप्पा यांची वंशवृक्ष वाचली आहे आणि युट्युबवर तो चित्रपटही पाहिला आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा