Skip to main content

धुके असे पडले की

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 05/11/2025 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
धुके असे पडले की धुके असे पडले की धुक्याचा महाल आकाशी सोपान त्याचा असा की त्यावरी उभी तू टोकाशी तू परी अस्मानीची मी फकीर धरतीचा वाट अशी भयंकर मार्ग नसे परतीचा विचार तरी काय करावा ? तोही थांबला तर्कापाशी सोपानावरून खुणवू नको जीवाची होईल तडफड तुजसवे वर जायाचे तर प्राणपाखरू करेल धडपड इथे जगुनी काय करावे ? आता जावे स्वर्गलोकाशी
लेखनविषय:

वाचने 865
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

राऊतजी खूप आभार आणि सर्व वाचकांचे खूप आभार

कविता कशी पहावी ? ... असो ज्याची प्रेयसी देवाघरी गेली आहे अशा एका प्रियकराची ही वेदना आहे . त्यामुळे अर्थ लागेल