Skip to main content

दिवाळी अंक २०२५ - AI चा घो(र) - कविता

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
AIचा घो(र) ~~~~~~~~~~~ चौदा विद्यांच्या वाचस्पतींनो चौसष्ट कलांच्या कलानिधींनो गानगंधर्वांनो, भसाड्यांनो चित्रकारांनो, रंगाऱ्यांनो सिद्धहस्त लेखकांनो, कळफलकबडव्यांनो कवींनो, कवड्यांनो वैद्यराजांनो, वैदूंनो नटवर्यांनो, साजिंद्यानो विचारवंतांनो, प्रचारवंतांनो कोतवालांनो, ठकसेनांनो वलयांकितांनो, ट्रोलभैरवांनो बेलकर्व्हवरील डाव्या-उजव्यांनो बेलकर्व्हच्या मध्यावरील बेसुमार सुमारांनो शुभ्रधवलांनो, काळ्याकुट्टांनो, अधल्यामधल्या कृष्णधवलांनो सावध! AIका AIच्या हाका जुनी चंगळ संपली बर्का! Plan B तय्यार ठेवा पक्का नैतर वर्मी बसेल धक्का :)

वाचने 730
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हा हा हा .. एआय चा धसका सगळ्यांनी घेतला आहे हे मात्र खरे !!

खरंय .... एआय ने घोर लावलाय खरं .... आण़़खीन काय काय कोसळेल सांगता येत नाही ! भारी सावधकविता... आवडली ! शब्द रचना त र विशेष आवडली !