✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आर्थिक खिचडी

च
चिखलू यांनी
Tue, 08/26/2025 - 01:57  ·  लेख
लेख
अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई कामगारांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे मी लवकरच नोकरीवरून बाहेर पडणार आहे. वय ४८. २ मुले, बायको खाजगी शालेत शिक्षिका, पगार जास्त नाही. मोठा मुलगा PICT मध्ये Open Category मध्ये CS ला दुसर्या Year ला. जबाबदाऱ्या (Liabilities) 1. होम लोन १ (कोविड नंतर भावनेतून बांधलेलं मनासारखे घर नासिक मध्ये. मी नासिक चा आणि गेले २ तप बाहेर राहिलो आहे.) 2. होम लोन २ (हैदराबाद आऊटस्कर्ट्समधील premium एरिआ मध्ये ३बीएचके फ्लॅट – जिथे मुलं वाढली, प्रगती झाली) → एकूण उर्वरित लोन = ₹१.५० कोटी • मालमत्ता (Assets – एकूण ५) o हैदराबाद आऊटस्कर्ट्समधील ३बीएचके फ्लॅट → किंमत ~₹१.२५ कोटी म्हणजेच हा फ्लॅट विकलात तरी सर्व लोन पूर्ण होणार नाही. आता याव्यतिरिक्त माझ्याकडे १.४ लाख म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पीएफमध्ये आणि एफडीमध्ये आहेत. बाकी काही राहिले तर आइ वडिल, भाऊ मदत करतीलच. पर्याय १: हैदराबादचा फ्लॅट आणि थोडे शेअर्स विकून कर्जमुक्त व्हावं आणि उपलब्ध निधी अशा पद्धतीने लावावा की ज्यातून मासिक उत्पन्न मिळेल. त्यात पत्नीच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगाराची जोड झाली तर माझ्या वार्षिक गरजा – मुलांच्या शिक्षणासह, विमा पॉलिसी, दैनंदिन खर्च – सहज भागतील. पर्याय २: सर्व म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि एफडी मधलं पैसे काढून कर्जमुक्त व्हावं आणि हैदराबादच्या प्रॉपर्टीतून भाडे मिळवावं. यामुळे कुटुंबातील सदस्यांना – विशेषतः पत्नी आणि आईवडिलांना – भावनिक आधार मिळतो, कारण त्यांना इतर गुंतवणुकींची जास्त माहीती नाही. तुम्हाला काय वाटते, तुमचा काय सल्ला असेल
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11524 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

फ्लट हैदरबाद चे घर, मोठे आहे,

शानबा५१२
Wed, 08/27/2025 - 14:26 नवीन
फ्लट हैदरबाद चे घर, मोठे आहे, पीजी ठेउन दर महीना जास्त भाडे काढता येईल का ह्याचा ही विचार करा भविष्यासाठी...........
  • Log in or register to post comments

१. आजकाल नोकरी गेली कि ३

विअर्ड विक्स
गुरुवार, 08/28/2025 - 21:28 नवीन
१. आजकाल नोकरी गेली कि ३ महिने EMI माफी मिळते घासाघीस केल्यावर . ३ महिने दुसरी नोकरी च्या प्रयत्नासाठी पुरेसे आहेत २. लोन चा कालावधी स्पेसिफाय केलेला नाही तरी वय वर्षे ४८ पकडून १२ वर्षांचा कालावधी आहे . लोन कालावधी वाढवून emi अमाऊंट कमी करून थोड्या कालावधीकरिता ओझे कमी करू शकता. ३. सोन्याचा भाव सध्या चांगला आहे सोने तारण वा partly विकण्याचा विचार करा जर सोन्याला इन्व्हेस्टमेंट क्लास मानत असाल तर ४. MF वा शेअर विकण्यापेक्षा घर विकून कर्ज उतरवणे केव्हाही चांगले , पण तुम्हाला त्या घराने भरभराटी दाखवली आहे त्यामुळे विकण्याचा निर्णय कठीण होऊ शकतो म्हणून वरील ३ पर्याय सुचवले आहेत . ५. दोन्ही मुले हाताशी येण्याच्या वयाची आहेत त्यामुळे आर्थिक परिस्थितीची त्यांना जाणीव करून द्या त्यामुळे परिवाराची पण मदत मिळेल
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चिखलू
Sat, 08/30/2025 - 23:30 नवीन
सगळ्यांनी दिलेले सल्ले प्रतिसाद या बद्दल आभारी आहे. 1-2 महिन्यात काय होते ते बघतो, आणि इथे नंतर update करेनच.
  • Log in or register to post comments

निराळा पर्यायही

निनाद
Sun, 08/31/2025 - 18:15 नवीन
पर्याय २: म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि एफडी मधलं पैसे काढून कर्जमुक्त व्हावं आणि हैदराबादच्या प्रॉपर्टीतून भाडे मिळवावं. नाशिक पेक्षा हैदराबाद फ्लॅटचा भाव जास्त वेगाने वाढत राहणार असल्यास हा पर्याय चांगला आहे. (नाशिकचा फ्लॅट चा भाव वेगाने वाढेल असे वाटत नाही, पण परिस्थिती तुम्हाला माहीत.) वैचारिक पर्याय आता तुम्ही ५३ चे आहात आणि पाच वर्षांनी मागे वळून पाहिले असता हैदराबाद फ्लॅट ठेवला असता तर आज काय किंमत असती किंवा किती भाडे मिळाले असते - असा विचार करत असाल तर? पाच वर्षांनी मागे वळून मुले काय म्हणतील पत्नी काय म्हणेल असा विचार करून पहा. पाच वर्षांपुर्वी किती किंमत होती, किती भाडे होते ते पहा साधारण त्या प्रमाणात पुढील पाच वर्षांचा अंदाज लावता येईल पाच वर्षात वाढलेली किंमत तुम्हाला पुढील आर्थिक स्थीरता देऊ शकेल. आणि महत्त्वाचे म्हणजे हा एव्हिडन्स बेस्ड निर्णय असेल त्यामुळे भावना विरहीत निर्णय घ्यायला मदत होईल. कर्जमुक्त व्हावं ही कल्पना आकर्षक वाटते पण ती तशी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगली असेलच असे नाही. कर्जमुक्त पेक्षा काही काळ परिस्थिती आहे तशी ठेवता येते का ते पहावे. तुमच्या फ्लॅटस ची किंमत वाढतच राहणार आहे आणि कर्ज आणि कर्जाची किंमत (म्हणजे रुपयाची व्हॅल्यु म्हणून) कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे दोन्ही फ्लॅट राखता आल्यास उत्तम राहील - यात अजून पाच वर्षांनी चांगला फायदाच होईल असे वाटते. पर्याय: कर्जाचे हफ्ते अंगावर आल्यास सगळे शेयर्स एकदम न विकता तुकड्या-तुकड्यात विकत रहायचे. आणि हफ्ते भरत रहायचे. कदाचित तोवर नवी नोकरी मिळून जाईल. पर्याय: आहे त्याच फ्लॅट चे री-व्हॅल्युएशन करून एक वर्ष हफ्ते भरण्या एव्हढे पैसे त्यात कर्जाची वाढ करून अजून कर्जाऊ घेता येतील. त्यातून एक वर्षाचा अवधी हाताशी मिळू शकेल. म्हणजे ही विकण्याची वेळ टळेल. तोवर विचार बदलतील, परिस्थिती बदलेल. कधी कधी अनेपेक्षित घडामोडी होऊन या पेक्षा निराळा पर्यायही हाती लागू शकतो. फ्लॅट विकून टाकणे सोपे आहे पण परत घ्यायला गेल्यास प्रॉपर्टी चटकन मिळत नाही - सहज घेणे होत नाही - एका वया नंतर बँक लोन देत नाही - हा मुद्दा पण ध्यानी असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक खिचडी नाहीयेच! तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगल्या ठिकाणी आहात असे माझे मत आहे. नोकरीच्या घटनेमुळे ताण वाटत असेल पण घटना बदलू शकते. कदाचित यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्या आधी किंवा ऐवजी निर्णय पुढे ढकलणे हा पर्याय पण चांगला असतो. निर्णय घेण्यास किमान एक दिवस उशीर तर जरूर करा! अनेकदा रात्रीतून विचार बदलतात... प्रत्येक नवा दिवस नवी आशा आणि संधी घेऊन येत असतो... आजची संकटे उद्या संकटे म्हणून रहात नाहीत!
  • Log in or register to post comments

माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक,

चिखलू
Sun, 08/31/2025 - 22:59 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक,

चिखलू
Sun, 08/31/2025 - 23:00 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक,

चिखलू
Sun, 08/31/2025 - 23:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक

चिखलू
Sun, 08/31/2025 - 23:07 नवीन
माझ्या डोक्यातले विचार तुम्ही जवळ जवळ सारखेच मांडले आहेत. माझा घरच्यांबरोबर झालेल्या चर्चेचा सारांश. गुंतवणुक १ - Shares, MF, FD etc.त्यातले Shares, MF यांनी बर्यापैकी परतावा दिलेला असेल तर त्या आर्थिक गुंतवणुकीन अजुन भावनिक गुंतवणुक करण्यापेक्क्षा त्यातुन कर्जाचे ओझे कमी करावे. यातली माझी भावनिक गुंतवणुक म्हणजे खूप कमी किंमतीत घेतलेले Shares आज खूप वाढले हे बघत राहणे वगैरे. गुंतवणुक २ - ना॑शिकचे घर राहण्यासाठी स्वत: वेळ आणी लक्ष देउन बांधले असल्याने त्याची किंमत करता येणार नाही. आमच्या दोघांच्या नंतर मुलेच ठरवतील काय करायचे ते. हैद्रबादचा फ्लॅट, तो जर कर्जमुक्त असेन तर तो एक मोठा दिलासा असेन. पुढे मागे अगदिच गरज पडली तर Reverse Mortgage करता येइन का याची सध्या फक्त चौकशी करुन ठेवणार आहे. तो पर्याय आपल्याकडे जास्त ऐकण्यात नाही पण SBI देते एक Co owner जर Sr. Citizen असेल तर, असे ऐकले आहे. आणि ते घर असेल तर आई वडिल, बायको आणि मुले सगळे खुश असणार आहेन. त्या बद्ल्यात पहिजे ती काटकसर त्यांच्याकडुन करुण घेता येण्याची शक्यता आहे. वर निनाद यांनी लिहिल्याप्रमाणे "फ्लॅट विकून टाकणे सोपे आहे पण परत घ्यायला गेल्यास प्रॉपर्टी चटकन मिळत नाही - सहज घेणे होत नाही - एका वया नंतर बँक लोन देत नाही", घरच्यांनीही हेच मत दिले. कारण प्रोपर्टी साठी एक रकमी पैसा अवघड होतो, ह्या उलट Shares, MF घर बसल्या थोडे थोडे करुन पुन्हा जमवता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

@निनाद यांच्याशी पुर्ण सहमत.

कर्नलतपस्वी
Sun, 08/31/2025 - 19:38 नवीन
काही बाबतीत, आज करेसो कल कर, कल करेसो परसो... फायदेशीर असते.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देतांना The website encountered an unexpected error.

चिखलू
Sun, 08/31/2025 - 23:03 नवीन
असा मेसेज येउन फक्त विषय प्रकाशित होतो आहे
  • Log in or register to post comments

एक स्माईली टाकलेली, copy करुन

चिखलू
Sun, 08/31/2025 - 23:10 नवीन
त्यामुळे होत असावी असे वाटुन ती काढल्यावर व्यवस्थीत प्रकाशित झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिखलू

उद्भोदक धागा आणि चर्चा.

चित्रगुप्त
Mon, 09/01/2025 - 03:27 नवीन
उद्भोदक धागा आणि चर्चा. माझ्या आयुष्यात बरेच चढ-उतार येऊन गेलेत, पण त्या काळची एकंदरित परिस्थिती हल्लीपेक्षा पुष्कळ वेगळी होती, त्यामुळे माझे अनुभव आता उपयोगी ठरण्यासारखे नसावेत असे वाटून प्रतिसाद देणार नव्हतो. -- तरीही असे म्हणावेसे वाटते की 'हेही दिवस बदलतील' हे लक्षात घेऊन टेन्शनमुक्त रहावे. "मनुष्य व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनि जाते"
  • Log in or register to post comments

पहिली गोष्ट म्हणजे distress

सुबोध खरे
Mon, 09/01/2025 - 10:05 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे distress sell केल्यास भांडवली तोटा खूप जास्त होतो. यास्तव घर विकण्या अगोदर थोडी कळ काढा. हे ट्रम्पचं नाटक संपलं कि बाजार वर जाईल तशी घराची किंमत पण वर जाईल. तुमचा घर कर्जाचा हप्ता १.५ लाख आहे हे गृहीत धरतो. म्हणजे पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला ९.० लाख रुपये भरायचे आहेत. नोकरी गेल्यावर severance package म्हणू थोडे फार पैसे मिळतील, शिवाय आपल्याला न घेतलेल्या सुटीचे संतोष फंडाचे (gratuity) , भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळतील. या पैशातून असलेली बचत/ गुंतवणूक मोडीत काढण्यापासून काही काळ थांबू शकाल. जर आपलयाला १. कोटी गृहकर्ज मिळू शकते याचा अर्थ आपली नोकरी टिनपाट नक्कीच नाही आणि आपले कौशल्य निम्न स्तराचे नक्कीच नाही. तेंव्हा सहा महिने कळ काढा. सहा महिन्यात आपल्याला दुसरी नोकरी/ उत्पन्नाचा स्रोत नक्कीच मिळेल. एकदा घेतलेले घर नुकसानीत विकले तर मिळालेल्या संधीचे सोने ( opportunity कॉस्ट) करण्याचाही आपली शक्यता शून्यावर येते. आणि जसे वय वाढते तसे भविष्यात मोठे कर्ज मिळण्याची शक्यता कमी होत जाते. तांबडतोबी साठी पैसे लागले तर ते आपल्या मुदत ठेवीतून काढा कारण त्यावर ३० % कर जाऊन हि बचत ६ % च्या वर परतावा देत नाही आणि मुदत ठेव हि "अशाच प्रसंगासाठी" असते. हे पैसे संपले कि असे शेअर्स विका जे मधल्या काळात जोरदार वाढलेले आहेत आणि आता थकले आहेत. एक उदाहरण देतो . फायझर या कंपनीचे समभाग मी साधारण २०११-१२ च्या आसपास ८०० रुपयाला घेतले होते ते चढत गेले तसे २०२१-२२ मध्ये थोडे थोडे करत ४८००-५५०० या भावाला मी विकून टाकले. आज गेली चार वर्षे हा थकलेला शेअर ४१०० ते ६१०० या टप्प्यात फिरतो आहे. आपल्याकडे असे अनेक उत्तम/ ब्लु चिप समभाग असतील जे असे टप्प्यात( range bound) फिरत असतील. ते आपण स्वतः अभ्यास करून त्याबद्दल मोह न बाळगता काढून टाका. याने आपल्याला अधिक काही महिन्याची मुदत मिळेल. असे काही दिवस गेले कि आपोआप आपला प्रश्न सुटलेला असेल याची मला खात्री आहे. घर ताबडतोबीने अजिबात विकू नका. कारण तुम्हाला गरज आहे म्हटल्यावर भाव पाडूनच मागितला जातो. तुमची कठीण परिस्थिती हि इतरांची संधी असते. थोडे थोडे करूनन विकलेले शेअर आपल्याला पुढच्या काही वर्षात थोडे थोडे करून परत घेता येतील पण एकदा विकलेले घर परत घेणे तितके दुरापास्त होते शिवाय त्यावर लागणारे मुद्रांक शुल्क आणि इतर कर हे अक्षरशः पाण्यात जातात. आपण जो काही निर्णय घ्याल तो पूर्ण विचाराअंती आणि शांत डोक्याने घ्या. नोकरी जायची पाळी आली कि माणसान्च्या मनात भीती ठाण मांडून बसते आणि त्यामुळे तारतम्य गमावण्याची शक्यता असते. पण जसे काही दिवस जातात तशी या स्थितीची सुद्धा माणसांना सवय होते आणि मग माणसे सारासार विचार जास्त चांगला करू शकतात. म्हंणून कोणताही निर्णय घाईने अजिबात घेऊ नका. मी दिलेला सल्लाच सर्वोत्तम आहे असे कोणीही म्हणू नये. कारण तुमच्या समस्येचे पूर्ण आकलन मला झालेले असेलच असे नाही ( जरी मला तसे वाटले तरी ). यासाठी अगदी गुंतवणूक सल्लागाराची सल्ला घेतला तरी तो एकांगी असण्याची शक्यता असतेच. हे दिवस नक्की जातील आणि काही दिवसात तुम्हाला उत्पन्नाचा दुसरा स्रोत नक्की मिळेल याची मला खात्री आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. धन्यवाद

चिखलू
Tue, 09/02/2025 - 13:13 नवीन
अशी परिस्थिती आली की panic न होता थोडा cooling period जाऊ दिला की मग योग्य निर्णय घेता येतात. आणि ईथे तुम्हा सगळ्या अनुभवी लोकांच्या प्रतिसादांमुळे जरा अजुन विचार करुन पाउले टाकता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा