✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी जुलै २०२५

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Tue, 07/01/2025 - 10:51  ·  लेख
लेख
वीसेक वर्षांपूर्वी कांटा लगा या गाण्यामुळे प्रसिध्द झालेल्या शेफाली जरीवालाचे मागच्या आठवड्यात वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. ४२ हे काही जायचे वय नाही. तिला आदरांजली. jariwala
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19097 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

ऐकावे ते नवलच

चंद्रसूर्यकुमार
Sat, 07/26/2025 - 11:02 नवीन
४६ वर्षांपूर्वी केलेल्या खुनाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ६७ वर्षांच्या एका व्यक्तीला दोषी ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषी वृद्धाला जन्मठेप किंवा सात वर्षांच्या तुरुंगवासाचा पर्याय दिला आहे. हा नक्की काय प्रकार आहे? एक तर ४६ वर्षे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये तारीख पे तारीख चालू होते हा मुद्दा एकदम किरकोळ म्हणून त्याविषयी भाष्य करायलाच नको. दोषी व्यक्तीला आपली शिक्षा निवडायचा अधिकार असतो? मटामधील बातमीतील एक वाक्य रोचक आहे- मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, "जर तुम्ही सहमत असाल, तर आम्ही कलम 302 अंतर्गत असलेली शिक्षा कलम 304-I (सदोष मनुष्यवध) मध्ये बदलू, ज्यामध्ये सात वर्षांची कैद होईल." म्हणजे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरविल्यानंतर त्याच्यावर मुळात घातलेल्या गुन्ह्याचे कलम आणि स्वरूपच बदलायचे? इतकी वर्षे मला वाटत होते की पोलिस एखाद्या घटनेबद्दल गुन्हा दाखल करतात आणि संबंधित व्यक्ती दोषी आहे याविषयीचे पुरावे न्यायालयात सादर करतात. मग त्यावर सुनावणी होते आणि त्या पुराव्यांमध्ये दम असेल तर मग न्यायालय त्या व्यक्तीला दोषी ठरवून शिक्षा सुनावते. म्हणजे एखादी व्यक्ती अमुक एक प्रकारचा गुन्हा केला म्हणून दोषी असते. मग दोषी ठरविल्यानंतर मुळातल्या गुन्ह्याचे स्वरूपच कसे बदलता येईल? वेगळाच गुन्हा दाखल केला तर मग त्याही सुनावणी परत करायला नको का? जुन्या आय.पी.सी मधील कलम ३०२ हे खुनाचे होते ते आता ३०४-१ म्हणजे सदोष मनुष्यवधात बदलणार? म्हणजे त्या व्यक्तीने खून केला आहे म्हणून पोलिसांनी पुरावे गोळा केले, ते खालच्या न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही टिकले आणि आता न्यायाधीशच म्हणत आहेत की चला गुन्ह्याचे स्वरूपच बदलून टाकू- म्हणजे जाणूनबुजून खून केला नसून सदोष मनुष्यवध म्हणजे त्या व्यक्तीकडून चुकून दुसर्‍या कोणाचीतरी हत्या झाली- त्याचा हत्या करायचा उद्देश नव्हता. मग जुन्या पुराव्यांना आणि सुनावणीला काय अर्थ राहिला? https://marathi.indiatimes.com/india-news/supreme-court-gives-choice-to-67-years-old-man-who-killed-friend-in-1979-college-clash-verdict-life-term-or-7-years-jail/articleshow/122916886.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines
  • Log in or register to post comments

आजकाल न्यायालये जास्तच

सुक्या
Sat, 07/26/2025 - 11:47 नवीन
आजकाल न्यायालये जास्तच फालतुपणा करायला लागली आहेत. चोचले जास्त झाले / किंवा प्रश्न विचारणारा कुणी नसला की असली थेरे येतात. वरुन कुणी काही प्रश्न विचारला की न्यायालयाचा अपमान झाला म्हणुन त्यावर कारवाई करायला मोकळे. कितीतरी ठिकाणी परस्पर विरोधी निकाल लागलेले आहेत. जघन्य गुन्ह्यामधे गुन्ह्याच्या तिव्रतेपेक्षा त्याची वारंवारीता त्या गुण्ह्याच्या शिक्षेचे स्वरुप ठरवते .. हा काय प्रकार आहे तो मला अजुन समजलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

<कितीतरी ठिकाणी परस्पर विरोधी

युयुत्सु
Sat, 07/26/2025 - 11:55 नवीन
<कितीतरी ठिकाणी परस्पर विरोधी निकाल लागलेले आहेत.> व्यवस्थित व्याख्या तसेच स्पष्टता नसलेले (उदा० जनसुरक्षा कायदा) सैल कायदे केले की फटी राहतात मग हवे तसे अर्थ काढता येतात.
  • Log in or register to post comments

तुम्ही जगातील वाटेल तो

सुबोध खरे
Mon, 07/28/2025 - 10:40 नवीन
तुम्ही जगातील वाटेल तो सर्वोत्कृष्ट कायदा दाखवा मी त्यातील फटी दाखवून देईन आपल्या मनातील गरळ बाहेर काढण्यासाठी (उदा० जनसुरक्षा कायदा) जिथे तिथे पचकण्यात काय हशील आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरून

आग्या१९९०
Mon, 07/28/2025 - 15:26 नवीन
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरून सरकारची पिसे काढणे चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पहलगाम हल्यात प्रत्यक्ष सहभाग

सुक्या
Mon, 07/28/2025 - 21:50 नवीन
पहलगाम हल्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या ३ अतिरेक्यांची यमसदनी रवानगी केली गेली आहे अशी बातमी आहे. बरे झाले ऐन अधिवेषणाच्या दरम्यान ही घटना घडली. हे अतिरेकी कुठे आहेत ? कसे पळुन गेले वगेरे प्रश्न विचारणारे आता मिठाची गुळणी धरुन बसतील. भारतिय सैन्य दलाचा विजय असो.
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/29/2025 - 09:03 नवीन
पहलगाम हल्ल्यातील 'सूत्रधारांना' काल भारतीय सैनिकांनी यमसदनी पाठवले. प्रत्यक्ष हल्लेखोर अजुनही सापडलेले नाहीत. भारतीय सैन्याचा कायमच अभिमान आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

शब्दिक गिचमिड मला आवडत नाही.

सुक्या
Tue, 07/29/2025 - 09:39 नवीन
शब्दिक गिचमिड मला आवडत नाही. सुत्रधार / प्रत्यक्ष हल्लेखोर वगेरे वगेरे चालु द्या. काय आहे ना. जर प्रत्यक्ष हल्लेखोर मारले गेले असते तर "सुत्रधार अजुन जिवंत आहे" आता सुत्रधार मारले गेले तर "प्रत्यक्ष हल्लेखोर अजुन जिवंत आहेत". असो. बाल की खाल ... टाईप काहीतरी वाक्प्रचार आहे हिंदीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धड़धाकट खोटं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/29/2025 - 10:57 नवीन
>>>> पहलगाम हल्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या ३ अतिरेक्यांची यमसदनी रवानगी केली गेली आहे इतकी धड़धाकट फेकाफेकी वाचली म्हणून लिहावे लागले. बाकी चालू द्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आर्मीच्या जनरल ला मारले तरी

सुबोध खरे
Tue, 07/29/2025 - 11:27 नवीन
आर्मीच्या जनरल ला मारले तरी ज्याने गोळीबार केला तो सैनिक पळून गेला ना ? तुमच्या घरात तुम्हाला मुंगी चावली तर तुम्ही मुंग्यांचे वारूळ शोधून नष्ट केले पण जी मुंगी तुम्हाला चावली तिला मारले नाही मग एवढे कष्ट घेऊन काय उपयोग मग गोबर युगात यापेक्षा जास्त काय अपेक्षा आहेत? ऑपरेशन सिंदूर इतके निरूपयोगी ऑपरेशन दुसरे नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धड़धाकट फेकाफेकी ??

सुक्या
Wed, 07/30/2025 - 00:38 नवीन
हे वाचा: https://www.ndtv.com/india-news/operation-mahadev-amit-shah-shares-crucial-evidence-linking-recovered-guns-to-pahalgam-attack-8972522
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीनगरजवळील Dachigam

रात्रीचे चांदणे
Mon, 07/28/2025 - 21:58 नवीन
श्रीनगरजवळील Dachigam National Park परिसरात भारतीय सुरक्षादलांनी लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार केले. त्यात पाहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा उर्फ सुलेमान मारला गेला. त्याच्यावर ₹20 लाख बक्षीस होत. पाहलगम हल्ल्यातील अतिरेकी पकडले किंवा मारले जाण गरजेचं होत.
  • Log in or register to post comments

शासकीय कर्मचा-यांवर बंदी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/29/2025 - 09:09 नवीन
तर, अशा त-हेने जनसुरक्षा कायद्या नंतर व्यवस्थेविरुद्ध जे जे लिहितील त्यांचं त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. ज्या गोदी मिडियाने मिडियाचा वापर करून लोकांवर खोट्या काल्पनिक गोष्टींचा मारा करून सत्तेजवळ पोहोचण्यास मदत झाली त्याच मिडियाचं अस्त्र उलटत जात आहे असे लक्षात आल्यामुळे शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल मिडियावर लिहिण्या बोलण्यावर महाराष्ट्र शासनाने कालपासून निर्बंध आणले आहेत. धन्यवाद. लोकशाही जिंदाबाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल

सुबोध खरे
Tue, 07/29/2025 - 09:42 नवीन
शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल मिडियावर लिहिण्या बोलण्यावर महाराष्ट्र शासनाने कालपासून निर्बंध आणले आहेत. शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल मिडियावर लिहिण्या बोलण्यामुले अनेक तर्हेचे वाद निर्माण होऊ शकतात किंवा त्याचा अनेक लोकांना फायदा किंवा तोटा होऊ शकतो हे बरीच लोकांच्या लक्षात येत नाही. अशा तर्हेचे निर्बंध लष्करात स्वातंत्र्या पासूनच आहेत. सोशल मीडियामधील वक्तव्यांचा वापर समाज विघातक वृत्ती कशा तर्हेने करू शकतात याची आपल्याला साधी कल्पना पण नाही. लष्करात असताना विद्यमान सरकारशी एकनिष्ठ राहीन अशी शपथ घेतली जाते मग त्या सरकारचे धोरण देशाविरुद्ध किंवा लष्करी हिताच्या विरुद्ध असलं तरीही. उद्या एखाद्या लढाऊ वैमानिकाने सुखोई विमानातील त्रुटी जर सामाजिक न्यासावर टाकल्या ( नेशन वॉण्टस तो नो म्हणून) तर त्यातून काय निष्पन्न होईल. सरकारी नोकरी करत असताना सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळेस अधोरेखित केलेले आहे. याला घटनेमध्ये मूलभूत अधिकारावर असलेले वाजवी निर्बंध म्हणतात (reasonable restriction). उदा. लग्न आकारणे हा आपला मूलभूत अधिकार असला तरी दोन लग्ने करणे हा गुन्हा आहे हा आपल्या मूलभूत अधिकारावर असलेला वाजवी निर्बंध आहे. सरकारी नोकरीत असणाऱ्या मुसलमानांना दोन लग्ने करता येत नाहीत. त्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागते. लष्करात आपल्याला परदेशी नागरिकाशी विवाह करता येत नाही. त्यासाठी लष्करातून राजीनामा द्यावा लागतो. हे सर्व मूलभूत अधिकारावर असलेले वाजवी निर्बंध आहेत असे असताना केवळ सरकारवर टीका करण्यासाठी टीका करणे हा करंटेपणा आहे
  • Log in or register to post comments

पाकिस्तान

कपिलमुनी
Tue, 07/29/2025 - 10:19 नवीन
ओवेसी यांनी आपण पकीस्तान सोबत क्रि़केट का खेळत आहे हे विचारले .. यूट्यूब चॅनेल ब्लोक केले होते ते पण चालू केलेत . त्यतून पाकिस्स्तनी रग्गड पैसे मिळवतात . त्याचीही गरज नव्हती.
  • Log in or register to post comments

लोकसभा चर्चा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/29/2025 - 11:05 नवीन
ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेतील चर्चा भारी होती. सरकार पहिल्यांदा विरोधकांना उत्तरे देतांना भांबावून गेलं. अरविंद सावंत शिवसेना ( उबाठा ) यांचं भाषण जबरा होतं. आवड़लं. ( दुवा ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

" आताचे पाकव्याप्त काश्मीर

आग्या१९९०
Tue, 07/29/2025 - 11:47 नवीन
" आताचे पाकव्याप्त काश्मीर काँग्रेसने पाकिस्तानला दिलेच का ? म्हणून आम्ही ते ताब्यात घेतले नाही ". सरकारकडून काँग्रेसला गप्प करणारे मला सर्वात जास्त आवडलेले उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम चर्चा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/30/2025 - 13:31 नवीन
जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती केली नाही, अशा धमाकेदार भाषणात नेहमीप्रमाणे पहलगामपासून, ऑपरेशन सिंदूर, प.नेहरु, काँग्रेस, यांच्यावर बोलून भाषण संपलं. इकडे भाषण संपलं. आणि तिकडे. ट्रंम्प यांनी भारत पाक मध्यस्थीचा दावा तिसाव्या वेळी केला. '' भारत आमचा मित्र देश आहे, माझ्या विनंतीवरुन भारतानं युद्ध थांबवलं . पाकिस्तानने ही तसंच केलं. ते खूपच चांगलं झालं. मी अशा प्रकारच्या युद्धासंदर्भात पाच वेगवेगळ्या युद्धा संदर्भात चांगलं काम केलं पण मला त्याचं श्रेय मला मिळणार नाही'' असं ते म्हणाले. 'ट्रंपने वॉर रुकवा दी पापा' म्हणना-या सयानी घोष, अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियंका गांधी , राजनाथ सिंह, गृहमंत्री, तिकडे संजयसिंह, भाषणं ऐकता आली. लोकशाहीत उत्तम चर्चा. लोकसभा अध्यक्षांचा पक्षपातीपणा वारंवार दिसत होता पण आता हे असं चालायचंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

जनतेला यातलं काय पटलं आणि काय

कंजूस
Wed, 07/30/2025 - 14:59 नवीन
जनतेला यातलं काय पटलं आणि काय नाही माहीत नाही. पण चर्चा झाली आणि लोकनेत्यांची मते कळली. -------------- हल्लेखोरांना पकडून न्यायनिवाडा करत बसले असते तर आणखी दहा वर्षे आणि पाचशे कोटी खर्च झाले असते( कसाबचं उदाहरण आहेत.) -------- युद्ध कुणी थांबवलं? एक आडवाटेचा अंदाज म्हणजे वल्ड बँकेचं लोन पाकला पाहिजे तर ओघाने आलंच. मग मिळालेल्या पैशांनी अमेरिकन महागडी विमाने विकत घ्यायची?
  • Log in or register to post comments

डोनाल्ड ट्रंप भारतीय

सुक्या
गुरुवार, 07/31/2025 - 13:18 नवीन
डोनाल्ड ट्रंप भारतीय अर्थव्यवस्थेला "डेस ईकॉनॉमी" असे म्हणाला त्यावर भारताचे लोकप्रिय नेता राहुल गांधी यांनी त्याच्या हो मधे हो मिळवत "सगळ्यांना माहीत आहे भारतीय ईकॉनॉमी डेड ईकॉनॉमी आहे" असे म्हणाला. माणसाने मुर्ख तरी किती असावे? म्हणजे किमान आहे तेव्हडे डोके वापरावे तरी. कुणी बाहेरचा माणुस वाट्टेल ते बोलतो त्यावर हे होयबा करत नाचत सुटतात.
  • Log in or register to post comments

किमान आहे तेव्हडे डोके

सुबोध खरे
Sat, 08/02/2025 - 10:18 नवीन
किमान आहे तेव्हडे डोके वापरावे तरी. ३५ मिमी चा मेंदू असल्यावर विचार तरी किती करणार. पेंटियम २ प्रोसेसर, अँड्रॉइड ४ -आईस क्रीम सेंडवीच ऑपरेटिंग सिस्टीम, १२८ एम बी रॅम आणि ०. ५ GB हार्ड डिस्क असल्यावर आपल्या किती अपेक्षा आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

१७ वर्षांपासून भगव्या

अथांग आकाश
गुरुवार, 07/31/2025 - 15:02 नवीन
१७ वर्षांपासून भगव्या दहशतवादाचे खोटे कथानक रचणारे तोंडावर आपटले! रडारड आणि बांगड्या फोडणे सुरु झाले आहे!! आज बरनॉलचा खप वाढणार!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा