✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

किडकी प्रजा!

य
युयुत्सु यांनी
Sat, 06/21/2025 - 07:34  ·  लेख
लेख
मंडळी, साधारण ७ वर्षांपूर्वी माझा अधिजनुक शास्त्राशी परिचय झाला. अधिजनुकशास्त्राचे मला जे आकलन झाले त्यावर आधारित एक लेख समाजमाध्यमावर लिहीला होता (https://www.misalpav.com/node/42260) या लेखात मी माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त मांडला होता. ज्यांना अधिजनुकशास्त्राचे महत्त्व कळते त्या सर्वाना "किडकी प्रजा" ही संकल्पना पटली आणि तसे कबूल ही अनेक जण करतात. त्यानंतर संकल्पनेला पुष्टी देणारे संशोधन वाढतच गेले. अलिकडेच मी "मेंदूचे आरोग्य आणि विवेक" या विषयावर एक लेख इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता (https://www.misalpav.com/node/52557). अलिकडेच काही दिवसापूर्वी लॅन्सेट या अत्यंत प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये प्रदूषणाने मेंदूच्या जडणघडणीवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. याचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध असल्याचे सदर स्पष्ट लिहीले आहे. https://www.thelancet.com/journals/lanplh/article/PIIS2542-5196(25)00093-2/fulltext या अभ्यासातील पुढील मजकूर फार महत्त्वाचा आहे - "Air pollution has various adverse effects on human health, including impairing fetal growth and development. The placenta, serving as the interface between maternal and fetal circulation, plays a vital role in supporting and regulating fetal development. Air pollutants might either directly penetrate the placenta into fetal circulation and the brain,4 or indirectly disrupt the placental function and overactivate the maternal immune system.5,6 " प्रदूषण हे मस्तिष्कदाहाचे मुख्य कारण आहे, आणि या दाहामुळे मेंदूच्या आरोग्यावर, कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो, हा त्याचा मथितार्थ आहे. सदर अभ्यासाठी वापरलेले संदर्भ या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत. सध्याच्या परिस्थितीत याचा रेलेव्हन्स काय? असा प्रश्न बर्‍याच जणाना पडेल. माझे उत्तर अनेकांना आवडणार नाही, पण अशा कीडक्या प्रजेवर ३ भाषांच्या सक्तीचा भार टाकून मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात. टीप - कर्नल तपस्वी, सुबोध खरे आणि तत्सम लोकांच्या प्रतिसादांना अजिबात उत्तरे दिली जाणार नाहीत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13040 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

हायला म्हंजे शेपटी सारखा....

कर्नलतपस्वी
Wed, 06/25/2025 - 14:52 नवीन
मेंदू पण गळणार वाटते. कृप्या हलकेच घ्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

:))

माहितगार
Wed, 06/25/2025 - 19:23 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

गुगल किंवा असंच कुठेतरी

शाम भागवत
Wed, 06/25/2025 - 20:32 नवीन
गुगल किंवा असंच कुठेतरी कनेक्ट होण्यासाठी मेंदू गळून तिथे एखादी ॲटेना उगवेल असं वाटायला लागलंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

दुवा

स्वधर्म
गुरुवार, 06/26/2025 - 15:04 नवीन
सदर माहितीचा थेट दुवा दिल्यास खूप बरे होईल. मूळ अभ्यास वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

https://www.misalpav.com/node/53042

कर्नलतपस्वी
Wed, 06/25/2025 - 21:32 नवीन
प्रज्ञावंतानो उगाच घाबरवू नका. खुप स्थितंतरे बघीतली आहेत. कुठल्याच बदलाचा या अविनाशी जगावर काहीच फरक पडत नाही या ठाम मताचा आहे.
  • Log in or register to post comments

श्रीमान कर्नल तपस्वींचा धागा जाहीरात दुवा

माहितगार
गुरुवार, 06/26/2025 - 12:21 नवीन
तुमची धागा जाहिरातीची लिंक प्रतिसादाच्या शीर्षकात दिल्यामुळे असेल तिथल्या तिथेच पडते आहे तुमच्या धाग्यावर नेत नाहीए. श्रीमान कर्नल तपस्वींचा धागा जाहीरात दुवा : https://www.misalpav.com/node/53042
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

माहितगार भौ...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/26/2025 - 13:51 नवीन
धन्यवाद. तकनिकी मागासवर्गीय असल्याने असे काही तरी घडते पण काहीतरी नवीन शिकायला मिळते.अर्थात, काही प्रज्ञावंतांना वाटते की मी काहीही नवीन शीकण्या पलीकडे गेलेला म्हातारा आहे पण तो त्यांचा प्रश्न आहे माझा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

__/\__

माहितगार
गुरुवार, 06/26/2025 - 15:04 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

महानगरे आणि किडकी प्रजा!

युयुत्सु
गुरुवार, 07/03/2025 - 06:49 नवीन
राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगो येथील त्यांच्या सहकाऱ्यांनी शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, वाहने आणि उद्योगांमधून निर्माण होणारे सूक्ष्म-कणांचे वायू प्रदूषणाचा, ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही अशा लोकांमधील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये जनुकीय बदल वाढण्याशी संबंध असू शकतो. ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही अशा व्यक्तींमधील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सर्वात मोठ्या संपूर्ण-जीनोम विश्लेषणाचे संकलन करून, संशोधकांनी वायू प्रदूषणाच्या संपर्काला कर्करोगाला चालना देणाऱ्या आणि कर्करोगाला प्रोत्साहन देणाऱ्या अनुवांशिक उत्परिवर्तनांशी (म्युटेशन) जोडले. https://www.nih.gov/news-events/news-releases/nih-study-links-particulate-air-pollution-increased-mutations-lung-cancers-among-nonsmokers?fbclid=IwY2xjawLSt_BleHRuA2FlbQIxMABicmlkETFpaG02Z3N0WTdHSUVyaHZVAR5Bv3Q8HIyANhjp4iP0sMgoIWshrcQ7QkTFUlSYu_KINvNkP3xab_J3G3kF2A_aem_po6Q9alRxj8vW4qQr_hf8w
  • Log in or register to post comments

अशा अनेक गोष्टींमुळे शरीरातील

सुबोध खरे
गुरुवार, 07/03/2025 - 18:59 नवीन
अशा अनेक गोष्टींमुळे शरीरातील पेशींमध्ये बदल/ उत्परिवर्तन घडत असते त्यातील काही उत्परिवर्तनामुळे त्या त्या अवयवाच्या कर्करोगाची सुरवात होऊ शकते. उदा. स्मोकड मीट ( धुरावर शिजवलेले मटण) यात तयार झालेल्या पदार्थांमुळे अन्नमार्गाचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. smoked meat can increase cancer risk due to the formation of harmful chemicals during the smoking and cooking process. These chemicals, like polycyclic aromatic hydrocarbons (PAHs) and heterocyclic amines (HCAs), are linked to increased risk of colorectal, gastric, esophageal, and pancreatic cancers. Air pollution, both outdoor and indoor, is a significant risk factor for lung cancer, especially among non-smokers. Exposure to particulate matter (PM), including PM2.5, is strongly linked to an increased risk of developing lung cancer. Furthermore, air pollution can worsen lung cancer survival and contribute to the development of the disease. असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरीराच्या पेशीच्या जनुकात बदल होतो आणि त्यातील काही कर्करोग होण्यास कारणीभूत होतात. परंतु हे बदल किंवा हे कर्करोग पुढच्या पिढीत संक्रमित होत नाहीत किंवा यामुळे किडकी प्रजा निर्माण होत नाही. जाता जाता --एके काळी डिओडोरंट स्प्रे मुळे स्तनांचा कर्करोग होतो असा ठाम समज होता. (ब्लाउज घातल्यावर काखेत येणाऱ्या घामामुळे विचित्र दिसणाऱ्या खांद्यांपासून तसेच घामाच्या वासापासून सुटका म्हणून अनेक बायका असे डिओडोरंट स्प्रे वापरतात.) परंतु या समजाची पुष्टी करणारा कोणताही पुरावा आजतागायत मिळालेला नाही. There is no strong evidence that antiperspirants and deodorant raise breast cancer risk. For decades, claims on the internet and offline have suggested that antiperspirants cause breast cancer. But research doesn't show that using antiperspirants raises breast cancer risk. याबद्दल सविस्तर येथे वाचा https://www.cancer.org/cancer/risk-prevention/chemicals/antiperspirants-and-breast-cancer-risk.html
  • Log in or register to post comments

मद्यसेवन

युयुत्सु
गुरुवार, 07/10/2025 - 18:25 नवीन
Image removed. https://www.aan.com/PressRoom/Home/PressRelease/5251?fbclid=IwY2xjawLclrxleHRuA2FlbQIxMABicmlkETFYQWcxdFp5R05EaVQwZ2xVAR71CJRbnvjck8i8HwXMsjh1WIp1U191O7tQWpSJ16jrmlcwR51w_Xf_3A-b2g_aem_cdPkcKDd16Gt0cxJXuWR_gImage removed.
  • Log in or register to post comments

दारू पिऊन मेंदूचा ऱ्हास होतो

सुबोध खरे
गुरुवार, 07/10/2025 - 19:58 नवीन
दारू पिऊन मेंदूचा ऱ्हास होतो हे फार जुनं सत्य आहे Alcohol-related 'dementia किंवा alcohol-related brain damage, हे गुगलून पाहावं. याचा किडकी प्रजा किंवा पुढच्या पिढीत संक्रमण होण्याशी काय संबंध आहे. असंबद्ध लिहिण्याची आजकाल फॅशन होत चालली आहे बहुतेक
  • Log in or register to post comments

त्यांच्याच दुसर्‍या

माहितगार
Fri, 07/11/2025 - 09:50 नवीन
त्यांच्याच दुसर्‍या धाग्यावरील २९ जुनच्या प्रतिसादात युयुत्सु म्हणतात "... "किडकी प्रजा" ही मी योजलेली संज्ञा आहे. अशी कठोर संज्ञा वापरण्याचा उद्देश समाजाला गदागदा हलवून जागे करणे हा आहे. .... .... (पर्यावरण) हा भारतात एक चेष्टेचा विषय आहे. .... ..." "पर्यावरण"च्या जागी "दारू" हा शब्द 'रिकाम्या जागा भरा' साठी वापरण्यास बहुधा युयुत्सुंची हरकत असणार नाही असा अंदाज बांधतो. माझा अंदाज चुकल्यास चुभूदेघे. अर्थात युयुत्सुंना न पटणार्‍या आणखी कोण कोणत्या गोष्टी त्या रिकाम्या जागेत भरता येतील ते युयुत्सुंनी स्वतः सांगीतलेले अधिक बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

श्री० माहितगार,

युयुत्सु
Fri, 07/11/2025 - 10:35 नवीन
श्री० माहितगार, प्रथम मला उद्धृत करताना प्रामाणिकपणे जसेच्या तसे टंकल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन! अल्कोहोल हा एपिजिनेटीक मॉडीफायर (अधिजनुकीय बदलांचा कारक) आहे हे आता सिद्ध झाले आहे. 'रिकाम्या जागा' भरण्यासाठी ताण,कुपोषण आणि प्रदूषण हे गुळ्गुळित झालेले शब्द हव्या त्या प्रमाणात वापरता येतील. अल्कोहोलमुळे घडणारे अधिजनुकीय बदल पुढच्या पिढीत संक्रमित होऊन पुढच्या पिढीत व्यसनाधीनता निर्माण होऊ शकते, असे संशोधन नुकतेच वाचनात आले आहे. दूर्दैवाची गोष्ट अशी की आपले बरेचसे राजकारणी हे विज्ञान पच्वू शकत नाहीत. हे पुरेसे सिद्ध झाले नाहीये म्हणून त्याकडे डोळेझाक करायची, कुचेष्टा करायची किंवा व्हिसल ब्लोअरची गळचेपी करायची यापलिकडे त्यांची मजल जात नाही. त्यात अलिकडच्या काळात पश्चिमेकडून येणार्‍या ज्ञानाबद्दल विष पसरवले जात आहे. हे मला जास्त चिंताजनक वाटते. माझ्या एका हितचिंतकानी मला नुकताच सल्ला दिला तो बोलका आहे. "always keep searching for the truth, without publishing"...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अधिजनुकशास्त्र हा किती

युयुत्सु
Fri, 07/11/2025 - 10:47 नवीन
Image removed. अधिजनुकशास्त्र हा किती मह्त्त्वाचा विषय आहे हे समजण्यासाठी या शाखेत प्रसिद्ध होणार्‍या शोधनिबंधाची संख्या वरील आलेखात पहावी. ती उत्तरोत्तर वाढतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हायला

सुबोध खरे
Fri, 07/11/2025 - 19:37 नवीन
हायला दारू प्यायल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो हे सत्य आहे. त्याच बरोबर अतिमद्यपानामुळे शुक्राणू आणि स्त्रीबीजे यांच्या विकासात अडथळा येतो हेही सत्य आहे. या दोन्ही गोष्टी वैद्यकीय शास्त्राला फार अगोदरपासून माहिती आहेत. अल्कोहोल हा एपिजिनेटीक मॉडीफायर (अधिजनुकीय बदलांचा कारक) आहे हे आता सिद्ध झाले आहे. त्यात काय मोठं? अल्कोहोल हा एपिजेनेटिकच काय जेनेटिक मॉडीफायर पण आहे. Ethanol (the “alcohol” in alcoholic drinks) physically damages DNA molecules. गरोदर स्त्रियांनी एक पेग घेतला तरी त्याचा वाढत्या गर्भाच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच ज्या मुली गरोदर राहू इच्छितात त्यांनी गरोदर राहण्याच्या निदान तीन महिने अगोदर तरी दारू बंद केली पाहिजे असे मी मागेच मिपावर लिहिले होते साधा सरळ हिशेब आहे. तुमच्या पायाला जखम झाली असेल तर त्यावर दारू ओतली तर ते जळजळेलच. It is a basic protoplasmic poison पण मेंदूचा एम आर आय आणि किडकी प्रजा किंवा पुढच्या पिढीत संक्रमण यांचा काय संबंध आहे? काहीतरी/ काहीही करून गाडी एपिजेनेटिकस वर आणण्याचं कारण काही समजत नाही
  • Log in or register to post comments

युयुत्सुजी तुम्ही एखाद्या

माहितगार
Mon, 07/14/2025 - 12:21 नवीन
युयुत्सुजी तुम्ही एखाद्या मोठ्या आमेरीकन प्रायव्हेट विद्यापिठातून एमबीबीएस एमडी पिएचडीच्या समकक्ष पदव्या काढून घेण्या बद्दल विचार का करत नाही. तुमच्या सारख्या जिज्ञासू व्यक्तीने मानवी जगताला मोठा फायदा नक्की होऊ शकेल, आणि तुमच्या दाव्यांना अधिकृततेचा स्टॅंप मिळवण्यासाठीही उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

समकक्ष पदव्या काढून घेण्या

युयुत्सु
Mon, 07/14/2025 - 12:30 नवीन
समकक्ष पदव्या काढून घेण्या बद्दल विचार का करत नाही. ० माझ्या बर्कलेमधून १८ महिन्यात पीएचडी केलेल्या गुरुवर्यांच्या सल्ल्यानुसार जिथे पीएच्डी करायची त्या जागेचा आणि मार्गदर्शकाचा १ वर्षाचा अनुभव असल्याशिवाय पीएच्डी करणे धोकादायक आहे. ० या शिवाय पुर्वी जेव्हा हे सर्व जुळवून आणले होते तेव्हा नीच हितशत्रूनी त्यात विघ्ने आणली, त्यामुळे आता माझा त्यात रस संपला आहे. सध्या माझ्या कन्येचे आयुष्य घडवतो आहे, तेव्हढा आनंद मला पुरेसा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तसे असेल तर मग जमेल तेवढ्या

माहितगार
Mon, 07/14/2025 - 12:47 नवीन
तसे असेल तर मग जमेल तेवढ्या मेडीकल सायन्स मध्ये पिएचडी करणार्‍या अभ्यासकांना स्पॉन्सर करून तुमच्या दाव्यांच्या पुष्टीसाठी फंडींग पुरवण्य्चाचा विचार करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

पिएचडी करणार्‍या अभ्यासकांना स्पॉन्सर करून

युयुत्सु
Mon, 07/14/2025 - 12:52 नवीन
कल्पना भन्नाट आहे, योग्य वेळी नक्की विचार करेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

एमबीबीएस एमडी पिएचडीच्या

सुबोध खरे
Mon, 07/14/2025 - 18:24 नवीन
एमबीबीएस एमडी पिएचडीच्या समकक्ष पदव्या काढून घेण्या बद्दल विचार का करत नाही. हायला ज्यांच्या हाताखाली दोनचार होतकरू तरुण एम बी बी एस, एम डी, पी एच डी करतील त्यांना तुम्ही पीएच डी करायला सांगताय? कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

जनुक ब्रह्मज्ञान घेऊनही

माहितगार
Tue, 07/15/2025 - 14:33 नवीन
जनुक ब्रह्मज्ञान घेऊनही युयुत्सुंकडे संबंधीत विषयांमधल्या डिग्र्या नसत्या तर काही फरक पडला नसता, पण विरोधात डिग्री असलेले डॉ.खरे असल्यामुळे वाचकांना संभ्रम होतोना. युयुत्सुंनी मी सुचवल्या प्रमाणे डिग्र्या मिळवल्या तर त्यांच्या दाव्यांवर अधिकृत शिक्का मुर्तबही होऊ शकले असते आणि मिपा वाचकही संभ्रमात पडले नसते. पण वरच्या प्रतिसादातून युयुत्सुंनी होतकरू तरुण एम बी बी एस, एम डी, पी एच डी स्पाँन्सर करण्याच्या मधल्या मार्गाबद्दल विचार करण्याचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

श्री० माहितगार

युयुत्सु
Tue, 07/15/2025 - 15:23 नवीन
श्री० माहितगार डिग्री हा जर ज्ञानाचा निकष मानायचा ठरवला तर तोच निकष खर्‍याना पण लावावा लागेल. माझ्या माहितीप्रमाणे ते रेडीओलॉजिस्ट आहेत, जनुकशास्त्रज्ञ नाहीत. अन माझ्या माहितीप्रमाणे असंख्य डॉ०ना जनुकशास्त्र कळत नाही. जाता जाता- कुणी काय करायचं आणी काय करायच नाही याचे अभेद्य कप्पे पाडायचे दिवस आता संपले आहेत. नुकताच संजीव सन्याल (मोदींचे आर्थिक सल्लागार) यांची एक मुलाखत बघितली. त्यात ते म्हणाले की संशोधन/इनोव्हेशन करण्यासाठी पी०एच्०डी० पाहिजे हा हट्टाहास आता सोडायला हवा. जो क्षमता दाखवेल त्याला उत्तेजन मिळायला हवे. पण हे विचार अजून आपल्याकडे पुरेसे झिरपलेले नाहीत. डीग्री म्ह० पाठांतराची परिक्षा ज्ञानाची नाही. त्यामुळे पारंपारिक डीग्रीने मी कदाचित सडलोच असतो. वेगळा विचार करायची क्षमता पारंपरिक शिक्षणपद्धत मारते. ज्ञानाची परिक्षा वास्तवातील प्रश्न सोडविण्याच्या वेळी होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

खरय सर्व विषयात सामान्य ज्ञान

माहितगार
Tue, 07/15/2025 - 17:33 नवीन
खरय सर्व विषयात सामान्य ज्ञान कुणिही मिळवू शकतं. विशीष्ट औषधांची चर्चा तुम्हीही करु शकता औषध सल्ला देण्यासाठी शेवटी लायसन्स्ड डॉक्टर आणि दुकानातून काढून देण्यासाठी लायसन्स्ड फार्मसिस्ट ही लागतोच ना. इतर कुणि औषद सांगितल तर औषध डॉक्टर कडून तपासून घे हाच अधिकृत सल्ला असतो. जिथे डॉक्टर उपलब्ध नाही तिथे लायसन्स्ड फार्मसिस्टवर विश्वास आधी ठेवतात तोही उपलब्ध नसेल तर रसायनशास्त्र जीवशास्त्रातील बीएससी ला विचारून चालवले जाते. तेही नसतील तर घरातला दहावी ते आणि आय आय टीएन जो जास्त शिकलेला त्याला विचारतोच ना आपण. घरा जवळच्या चौकात ट्रॅफिक जाम झाल्यावर एक उच्च शिक्षीत म्हातारा चौकात शिट्टी आणि लाल दिवा घेऊन उभा टाकाला आणि ट्रॅफीक पोलीसचा अनुभव नाही पण पोलीस हवालदार होऊन रिटायर झालेला हवालदार त्या उच्च शिक्षीत म्हातार्‍याला थांब तुझ चुकतय अस म्हणतो तुम्ही सांगा ट्रॅफीकने कुणावर विश्वास ठेवायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हा हा हा हा!

युयुत्सु
Tue, 07/15/2025 - 17:48 नवीन
मला प्रश्न पडला आहे - मी हा म्हातारा की तो म्हातारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ता०क०

युयुत्सु
Tue, 07/15/2025 - 17:20 नवीन
डिग्रीचा अट्टाहास मला कळण्या पलिकडचा आहे. उद्या संगीत विशारद झाल्या शिवाय कुणी मैफली करायच्या नाहीत किंवा जे०जे० ची पदवी घेतल्याशिवाय चित्र-प्रदर्शने काढायची नाहीत, मराठीत बी०ए० असेल तरच कविता करता येतील, हॉटेल मॅनेजमेंट केल्याशिवाय खानावळ टाकायची नाही अशी बंधने टाकता येतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

उद्या संगीत विशारद झाल्या

सुबोध खरे
Tue, 07/15/2025 - 20:36 नवीन
उद्या संगीत विशारद झाल्या शिवाय कुणी मैफली करायच्या नाहीत किंवा जे०जे० ची पदवी घेतल्याशिवाय चित्र-प्रदर्शने काढायची नाहीत, मराठीत बी०ए० असेल तरच कविता करता येतील, हॉटेल मॅनेजमेंट केल्याशिवाय खानावळ टाकायची नाही अशी बंधने टाकता येतील का? काय भंपक युक्तिवाद आहे? यातल्या कोणत्याही व्यवसायात जीवाला धोका नसतो. बोगदा / पूल बांधायला प्रशिक्षित अभियंता का लागतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

प्रशिक्षित वैमानिक नसलेल्या

सुबोध खरे
Tue, 07/15/2025 - 20:38 नवीन
प्रशिक्षित वैमानिक नसलेल्या विमानात बसाल का तुम्ही? एल एल बी न झालेला पण भरपूर कायदा वाचलेल्या माणसाला न्यायाधीश म्हणून समाज स्वीकारेल का? आपलीच टिमकी वाजवायचा किती हा अट्टाहास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमची चर्चा म्हणजे राईट विंग

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/17/2025 - 19:10 नवीन
तुमची चर्चा म्हणजे राईट विंग ऑर्थोडॉक्स आणि लेफ्टी निओ लिबरल वॉक अशी काहीशी चालू आहे =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आता हि आली युयुत्सुरावांच्या

माहितगार
Fri, 07/18/2025 - 10:59 नवीन
आता हि आली युयुत्सुरावांच्या आनंदाची बातमी Babies made using three people's DNA are born free of hereditary disease
  • Log in or register to post comments

वकीलांसाठी पण आनंदाची बातमी

युयुत्सु
Fri, 07/18/2025 - 11:36 नवीन
वकीलांसाठी पण आनंदाची बातमी कारण गुंतागुंतीचे कायदे तयार होणार - उदा० एक व्यक्ती ३ जणांची वारस म्हणजे मज्जाच मज्जा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा