✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इराण इस्राईल युद्ध आणि अमेरीका

व
विजुभाऊ यांनी
Tue, 06/17/2025 - 09:47  ·  लेख
लेख
आत्ताच एक बातमी हाती लागली. https://www.msn.com/en-xl/news/other/trump-leaves-g7-summit-early-as-iran-israel-conflict-intensifies/ar-AA1GQLIi?ocid=BingNewsSerp ट्रम्प तात्यानी जी७ समीट मधे त्यांचे भाषण सुरू असतानाच मधेच एक निरोप आल्यामुळे भाषण बंद केले आणे तेथून थेट अमेरीकेला प्रयाण केले. त्याचबरोबर त्यानी सर्वानी तेहेरान लवकरात लवकर सोडावे असे आदेशही दिले आहेत. यावरून काहितरी भयंकर घटना घडली आहे / घडणार आहे असे वाटते. ऑलरेडी इराणवर इस्राईलने इतकी अस्त्रे डागली आहेत की इराणकडे पर्तिकारक्षमता किती उरली आहे याबद्दल साशंकताच आहे. इतके होऊनही पाकिस्तान अजूनही दोन डगरींवर पाय ठेवून आहे. एकीकडे इराण हा आमचा इस्लामी भाउबंद आहे असे म्हणतो त्याचबरोबर दुसरीकडे असीम मुनीर हे अमेरीकन आर्मी डे च्या परेडसाठी (न बोलावताही ) उपस्थित रहातात. पण ट्रंप नी जी ७ परिषद मधेच सोडून जाणे तज्ञानाही बुचकळ्यात पाडणारे ठरणार आहे. पुढचे तीच दिवस जगासाठी खूप नाट्यमय असणार आहेत हे नक्की.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9777 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

अमेरेकेचा इराणवरचा हल्ला (

विजुभाऊ
Tue, 06/24/2025 - 16:21 नवीन
अमेरेकेचा इराणवरचा हल्ला ( इराणचे न सापडलेले अणूबाँब ) त्या नंतरची युद्धबंदी आणि इराणचा कतर वरचा हल्ला हे एका मोठ्या खेळीचा भाग होता असे ऐकतोय. ( इराणचे न सापडलेले अणूबाँब ) या मधे इस्राईलला मात्र नुकसान सोसावे लागले.
  • Log in or register to post comments

कोणत्याही घटनेचे विडिओ गेम

कंजूस
Tue, 06/24/2025 - 16:28 नवीन
कोणत्याही घटनेचे विडिओ गेम अमेरिकेत बनतात ९-११ सोडून?
  • Log in or register to post comments

मग काय शेवटी युद्धविराम झाला

कंजूस
Tue, 06/24/2025 - 16:38 नवीन
मग काय शेवटी युद्धविराम झाला का नाही? सर्वांचेच हात पोळले आहेत. -------------- आठवीत असताना बीएड/ डीएड करणारे शिक्षक 'पाठ' घ्यायला वर्गावर येत असत. एका धड्यात 'पदराला खार लावून घेणे' हा वाक्प्रचार आला. त्या पाठ घेणाऱ्या बाइंनाही ती म्हण कशी आली माहीत नव्हते. मग प्रपाठक बाईंनी उत्तर दिल़. एक बाई शेजारणी कडे गेली तेव्हा ती लोणचं करत होती. तर ती शेजारणीला शिकवायला म्हणाली "हे बघ असं कालवतात मसाला आणि फोडी." जेव्हा घरी आली तेव्हा लक्षात आलं की साडीच्या पदराला खार ( मसाला) लागून डाग पडला होता. (=फुकटच्या ढवळाढवळीत नुकसान करून घेणे).
  • Log in or register to post comments

तात्यांनी केलेले युद्ध विराम

सुबोध खरे
Tue, 06/24/2025 - 18:41 नवीन
तात्यांनी केलेले युद्ध विराम (भारत पाकिस्तान असो कि इराण इस्रायल असो) हे म्हणजे वधू वरांना न सांगता जुळवलेल्या (अरेन्जड मॅरेज) लग्नासारखा आहे. ))=((
  • Log in or register to post comments

किंवा कार्यालयाबाहेर

रामचंद्र
Tue, 06/24/2025 - 20:57 नवीन
किंवा कार्यालयाबाहेर बॅन्डच्या बाजूला "माझ्यामुळेच हे लग्न जुळलं" असं म्हणत नाचणारा स्वयंघोषित 'मध्यस्थ'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा