साथ देण्याचा इरादा पाहिला स्वप्नात होता
प्राक्तनाचा वार तेव्हा हाय रे अज्ञात होता....१
मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला
आठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता.... २
पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना
तू मला वैर्यांत मोजावे ग हा आघात होता.... ३
बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी
स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता.... ४
रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी
कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५
सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या?
बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६
“मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे
सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता.... ७
वृत्त: व्योमगंगा
वृत्त नियम: गालगागा * ४
मात्रा: १६
---------------------------
www.atakmatak.blogspot.com
---------------------------
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4305
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सह्ही..
सु रे ख
In reply to सह्ही.. by प्राजु
सहीच
In reply to सह्ही.. by प्राजु
आवडले. मस्त
मस्तच...
सुरेख
लै भारी
धन्यवाद...
छान!!!
आकाकाकनाहेजआ(आम्हाला काव्यातलं काही कळत नाही हे जगजाहीर आहेच)
एकदम मस्त..
बैठकीच्या
छान गजल!
बरं झाल रे रंगा बोललास !
In reply to छान गजल! by चतुरंग
रंगवूनी ओठ घेताना...
In reply to बरं झाल रे रंगा बोललास ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाहताना तू मला...
In reply to छान गजल! by चतुरंग
भट्टी फारच
आभार मित्रांनो..
सुंदर.
बदल मस्तच..
केलेले बदल
शितल, प्राजु, धनंजय