Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप चित्रे on Mon, 12/29/2008 - 09:26

Submitted by प्राजु on Mon, 12/29/2008 - 09:31

Permalink

सह्ही..

रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५ सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या? बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६ हे अतिशय अर्थपूर्ण. प्राक्तन नाव एकदम समर्पक. मस्त.. एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 12/29/2008 - 14:38

In reply to सह्ही.. by प्राजु

Permalink

सु रे ख

सु रे ख रचना. प्राजू यांच्याशी सहमत. त्या दोन द्विपदी तर कहर जमून आल्या आहेत. पण संपूर्ण रचनांतील प्रतिमांचा विचार करता, नायटा खटकला. (साला नायटाच तो. खटकणारच किंवा टोचणारच!!!)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 12/30/2008 - 11:07

In reply to सह्ही.. by प्राजु

Permalink

सहीच

गावदासी द्विपदी (पहिली ओळ खासच) आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/29/2008 - 09:40

Permalink

आवडले. मस्त

आवडले. मस्त -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 12/29/2008 - 09:42

Permalink

मस्तच...

अरे काय लिहिलंयस!!!!!!! मस्तच. तुझी शब्दांवर हुकुमत आहे हे जाणवतंय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 12/29/2008 - 09:50

Permalink

सुरेख

सुरेख लिहलय !!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/29/2008 - 09:57

Permalink

लै भारी

लै भारी गझल रे! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Mon, 12/29/2008 - 10:22

Permalink

धन्यवाद...

प्राजु, अवलिया, बिपिन, आनंदयात्री, तात्या -- लगेच गझल वाचूल अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद :) आता जरा झोप घेतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Mon, 12/29/2008 - 11:32

Permalink

छान!!!

छान!!!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 12/29/2008 - 11:53

Permalink

आकाकाकनाहेजआ(आम्हाला काव्यातलं काही कळत नाही हे जगजाहीर आहेच)

मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला तू दिलेल्या यातनांचा नायटा अंगात होता....२
हाऽऽय!!!
पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना तू मला वैर्‍यांत मोजावे ग हा आघात होता.... ३
ओहोहो...मार डाला!!!!! आपण साला खलास झालो ही गज़ल वाचूनच! जियो मिर्झा संदीप जियो :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Mon, 12/29/2008 - 13:44

Permalink

एकदम मस्त..

“मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता.... ७ स्सहीच......कसलं मस्त जीवघेणं आहे ... खुप खुप छान... -स्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 12/29/2008 - 17:38

Permalink

बैठकीच्या

बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता.... ४ रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५ “मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता.... ७
मस्त... फार छान. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 12/30/2008 - 04:27

Permalink

छान गजल!

बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता.... ४ सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या? बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६ हे एकदम मस्तच. पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना तू मला वैर्‍यांत मोजावे ग हा आघात होता.... ३ रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५ वरील द्विपदींमधल्या अधोरेखित ओळींचा अर्थ लागला नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/30/2008 - 08:05

In reply to छान गजल! by चतुरंग

Permalink

बरं झाल रे रंगा बोललास !

गझल मस्तच आहे ! पण- रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५ मलाही याचा अर्थ डोक्याला तान देऊन लागेना !
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 12/30/2008 - 23:08

In reply to बरं झाल रे रंगा बोललास ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

रंगवूनी ओठ घेताना...

नवरा-बायको हे नातं संपूर्ण होण्यासाठी भावनिक आणि शारीरिक ह्या दोन्हींचे महत्व आहे. 'गावदासी'ची ('वेश्या' ह्या शब्दाला समानार्थी असा सुचलेला शब्द !) खंत ही आहे की कुठल्याही शारीरिक जवळकीचे रूपांतर 'नवरा - बायको' ह्या समाजमान्य पवित्र नात्यामधे झालेच नाही !!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 12/30/2008 - 22:55

In reply to छान गजल! by चतुरंग

Permalink

पाहताना तू मला...

म्हणजे असं की माझं तुझ्यावर अव्यक्त प्रेम आहे ते तुला दिसत नाहीये हे ठीक आहे पण, कुठल्याही गैरसमजामुळे, निदान मला शत्रू तरी समजू नकोस !!
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Tue, 12/30/2008 - 11:19

Permalink

भट्टी फारच

भट्टी फारच छान जमून आलीये... अप्रतिम कविता...! वाहवा! -झेल्या
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 12/30/2008 - 22:49

Permalink

आभार मित्रांनो..

भटानु, धमु, स्मिता, लिखाळ, बिरूटे सर, चतुरंग, झेल्या: अभिप्रायासाठी सगळ्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 12/31/2008 - 01:01

Permalink

सुंदर.

संदिप, गझल छान केली आहेस . मी पहिला वाचली होती, पण जरा झेपली जरा नाही.:( आता प्रतिक्रीया वाचुन ती जास्त उमगली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 12/31/2008 - 23:50

Permalink

बदल मस्तच..

मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला आठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता.... २ एकदम छान. आठवणींच्या वेदनेत, उदास मन:स्थितीत मारव्या सारखा रागच रंग घेऊ शकतो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 01/01/2009 - 00:03

Permalink

केलेले बदल

चांगले असावेत, आधी खटकणारे काहीतरी आता तितके जाणवत नाहीत. (मला पूर्वीची आवृत्ती आठवत नाही - त्यामुळे नेमके काय बदल केलेत ते सांगता येत नाहीत. "मारवा" - धन्यवाद प्राजु) तू मला वैर्‍यांत मोजावे ग हा आघात होता आणि कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता? येथे "ग" लघु-अक्षर मानले आहे, ते मला तरी ऐकायला बरे वाटत नाही. "रे" "गं" वगैरे हाका मारायचे ध्वनी ह्रस्व म्हटलेले समाधानकारक वाटत नाहीत. पुनश्च - छानच गझल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 01/01/2009 - 00:45

Permalink

शितल, प्राजु, धनंजय

आभारी आहे. धनंजय -- 'ग'च्या जागी एखादे योग्य र्‍हस्व अक्षर वापरता आले तर नक्की पाहीन.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4287 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com