Skip to main content

लैराईदेवी जत्रा चेंगराचेंगरी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 04/05/2025 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट माणसाचा जीव. रोज मरताहेत अकाली कशी करावी कीव? गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा जमले होते 40 हजार नऊ शे सतरा. गेले होते आशीर्वाद घेण्या, मिरवणुकीत सहभाग देण्या. करण्या कुटुंबाची हौस आणि मुलांची थोडी मौज. मिरवणुकीदरम्यान, एका ठिकाणी उतार, लोकांना नाही कळले ना रांग, नाही कतार गोंधळात लोक पडले, काही जोरात ओरडले एकमेकांवर लागले पडू बायका,मुले लागले रडू झाली भयानक चेंगराचेंगरी, 7 जण जागीच मेले, जशी मेंढरी 80 जण जखमी झाले त्यांना हॉस्पिटल नेले. संयोजकांचा आहेच दोष, तसेच भक्तांचा उन्माद जोश. मागे मांढरादेवी च्या जत्रेत मेले अनेक, कोर्ट शोधू शकले नाही कारण एक. आता काय बोलायचे 'हे असेच चालायचे....'
लेखनविषय:

वाचने 1168
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आत्ता कवितेच्या माध्यमातून लैरादेवीच्या दुर्घटनेची बातमी पाहिली. दुर्दैवी सगळं. अनेकदा अशा गर्दींची चर्चा होते. लोक विसरुन जातात आणि अशा दुर्घटना घडतात. -दिलीप बिरुटे