✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?

प
प्रसाद गोडबोले यांनी
Fri, 05/02/2025 - 10:50  ·  लेख
लेख
काल मराठी राजभाषा दिन होता. त्या निमित्ताने मनात एक मजेशीर आणि रोचक विचार आला . " तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?" म्हणजे फक्त एकच वाक्य असे नाही, 2 3 वाक्ये असतील तरी चालेल, एखादी कविता किंवा त्या कवितेतील ओळही चालेल. पण असं काहीतरी विशेष की जे ऐकून तुम्हाला वाटत " अहाहा काय लिहिलं आहे !!". प्रश्न वाटतो सोप्पा पण आहे अवघड. मी ज्या लोकांना विचारलं तर लोकांना मराठी पेक्षा संस्कृत मधील असे वाक्य सहज सुचले ... जसे की सत्यमेव जयते. ( अर्थात सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करून जे शिकले आहेत त्यांना ह्या उपनिषदातील वाक्याची घनता लक्षात येणार नाही.) मला स्वतःला " तत्त्वमसि " हे वाक्य प्रचंड सुंदर वाटते. आणि फक्त अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे वाक्य असले पाहिजे असे नाही. गीत गोविंदात जयदेव कवींनी जे लिहिले आहे हे कसले लोकोत्तर आहे - माराङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् । निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥ ६९ ॥ असे काहीसे मराठीतील सुंदर वाक्य , कविता , तुम्हाला काय सुचते ? म्हणजे एखाद्या पुस्तकाचे नाव सांगू नका, त्यातील तुम्हाला काय भावलं ते भारी वाक्य काय ते सांगा . एखाद्या पुस्तकातील परिच्छेद एखादी काव्यपंक्ती एखादा अभंग एखादे पत्रातील वाक्य एखादे नाटकातील प्रवेश एखाद्या शिलालेखातील वाक्य एखादे पत्रातील वाक्य. . काहीही जे तुमच्या लेखी अभिजात मराठी आहे ! बस वाक्य ! अवांतर : हा प्रश्न मी अनेक लोकांना विचारला , त्यानिमित्ताने " नाही सांगता येत " हे मराठीतील सर्वात सुंदर वाक्य आहे असे तूर्तास निदर्शनास येत आहे =))))
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17631 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

आपली उपस्थिती हाच खरा आहेर...

Bhakti
Tue, 05/06/2025 - 19:14 नवीन
आपली उपस्थिती हाच खरा आहेर... हम्म उलट कॉपी पेस्ट झालं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

कार्य सिध्दीस नेण्यास श्री

Bhakti
Tue, 05/06/2025 - 19:27 नवीन
कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

हे आमचे आवडते शिलावाक्य :)

प्रचेतस
Sun, 05/04/2025 - 12:45 नवीन
हे आमचे आवडते शिलावाक्य :) शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४) इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहा

कॉमी
Sun, 05/04/2025 - 20:34 नवीन
हाहाहाहाहा हे असले काही इतिहासाच्या पुस्तकात का देत नाहीत? मुलं आनंदाने वाचतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे देवा !

सस्नेह
गुरुवार, 05/15/2025 - 18:37 नवीन
याचं सुलभ मराठी भाषांतर कुठं मिळेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सामाजिक संकेतांमुळे ह्याचे

प्रचेतस
गुरुवार, 05/15/2025 - 19:25 नवीन
सामाजिक संकेतांमुळे ह्याचे सुलभ मराठी भाषांतर देऊ शकत नाही, मात्र लेख प्राचीन मराठीतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

समझ गये

सस्नेह
गुरुवार, 05/15/2025 - 21:00 नवीन
:) ,:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सदानंद रेगे च्या दोन अल्पाक्षरी

मारवा
Sun, 05/04/2025 - 13:33 नवीन
शेवगा फुलवून पंखा शुभ्र फुलांचा तुरा टपोरा तलम उन्हाचा टाकीत टाकीत सुने उसासे टिपे शेवगा धुंद कवडसे. शेवटी सर्व वस्तुमात्र पुसून टाकलं तरी शेवटी हात उरलेच नि हातातलं हे फडक
  • Log in or register to post comments

सर्वोतक्रूष्ट वाक्य असे

nutanm
Sun, 05/04/2025 - 22:47 नवीन
सर्वोतक्रूष्ट वाक्य असे नाही पण मला सर्वात आवडलेले वाक्य म्हणजे , १)"मला वाटले मला खूप पुस्तके लेख अभ्यासावे लागतेय या राजाचे मी काय देणे लाघतोय पण नाही हा राजाच माझे काही दैणे लागत होता, तयाचयावर पुस्तक लिहता लिहिता हया राजानेच मला इतके काही दिले की माझया पामराची झोळी काय ती पुरणार ( यातला सर्वात सुदर भाग शेवटचा म्हणजे राजाचेच देणे ते माझी पामराची झोळी काथ ती पुरणार? इति स्वामी कादमबरी ---रणजित देसाई यानचया पुस्तकातील प्रस्तावनेतील वाक्य. सर्वात छान वाक्य अभिमानाने ऊर भरून आणणारे व थोरले माधवराव पेशव्यावरचे छोटटयाशा आयुष्यात खूप कर्तुत्व गाजवणारा राजा !!." २) याच राजाने स्वामी कादमबरीत म्हटलेले वाखम ""आम्हाला सत्तेचा लोभ नाही केवळ धोरल्या महाराजाचे ( छत्रपती शिवाजी महाराजाचे ) विश्वस्त म्हणून आम्ही राज्यकारभार बघतोय.. ३) ज्ञानेश्वराचे प्रसिद्ध पसायदान मधील शेवट सर्वे सन्तु निरामय:सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चिद दु:खम् आप्नुयात जो जे वान्छिल तो ते लाभो प्राणीजात| व लताबाईन्चया आवाजात व सगीतकार ह्रुदनाथाचया चालीवर ते अप्रतिमपणे आपलया मनात या बुद्धीमान भावन्डानी रुजवलेय.. ज्ञानेश्वर माऊ ली थोर व थोर ही मनगेशकर भावन्डे !
  • Log in or register to post comments

मराठी भाषेतले नाही

अनन्त अवधुत
Mon, 05/05/2025 - 00:23 नवीन
पण ज्याशिवाय मराठी बाण्याची अपूर्ण आहे ते
बचेंगे तो और भी लडेंगे
  • Log in or register to post comments

माझ्या आवडीच्या दोन ओळी

सौन्दर्य
Mon, 05/05/2025 - 09:49 नवीन
"हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे "
  • Log in or register to post comments

काय म्हटलंय यापेक्षा...

किल्लेदार
Mon, 05/05/2025 - 17:04 नवीन
"काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय याला जगात जास्त महत्त्व आहे !!!" याहून मोठे सत्यवचन कुठले असेल ?
  • Log in or register to post comments

"आता माझी सटकली."

कंजूस
Wed, 05/07/2025 - 16:27 नवीन
"आता माझी सटकली." "अरे, तुझी केव्हा सटकत नाही?"
  • Log in or register to post comments

"श्री चामुंडराये करवियले,

असंका
गुरुवार, 05/08/2025 - 03:30 नवीन
"श्री चामुंडराये करवियले, गंगाजे सुत्ताले करवियले"
  • Log in or register to post comments

जेवलीस का ?

कपिलमुनी
गुरुवार, 05/08/2025 - 20:40 नवीन
जेवलीस का ?
  • Log in or register to post comments

हे झालेलं आहे. पर्यायी टाका !

चौथा कोनाडा
गुरुवार, 05/15/2025 - 20:28 नवीन
हे झालेलं आहे. पर्यायी टाका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

*मराठीत सांगितलेलं कळत नाय...

Bhakti
गुरुवार, 05/08/2025 - 21:29 नवीन
*मराठीत सांगितलेलं कळत नाय... इंग्लिशमधून सांगू....?? *एं काय बघतो‌ रे..
  • Log in or register to post comments

*गेला उडत..

Bhakti
गुरुवार, 05/08/2025 - 21:34 नवीन
*गेला उडत.. *गेली उडत.. *राहिले ते मावळे उडाले ते कावळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

१T A३० का?

वामन देशमुख
Fri, 05/09/2025 - 17:17 नवीन
१T A३० का?
  • Log in or register to post comments

आलिया भोगासी असावे सदर विरुद्ध The Readiness is all

मारवा
Mon, 05/12/2025 - 17:21 नवीन
Shakespeare च्या the readiness is all चे प्रचंड कौतुक होते.अनेक ठिकाणीं त्याचा वापर केला जातो. याच्या मागे त्याच्या प्रतिभे बरोबर साहेबाच्या साम्राज्याचा त्यांच्या शक्तिशाली प्रभावाचा ही हात आहेच. नाहीतर अगदी exact सारखा अर्थ असलेल तुकाराम.महाराजांचा आलिया भोगासी असावे सादर ही readiness is all जो एकीकडे दैववादी आणि दुसरीकडे पलायनवाद सोडून जीवनाला भिडण्याचे समर्थन करतो त्यापेक्षा अजून चांगलं आणि शेक्सपिअर हून जून असलेल आलिया भोगासी असावे सादर यात काय फरक आहे ?
  • Log in or register to post comments

सुखाचा मार्ग

सुमेरिअन
गुरुवार, 05/15/2025 - 07:38 नवीन
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
  • Log in or register to post comments

अत्यंत रोचक विषय

सस्नेह
गुरुवार, 05/15/2025 - 18:47 नवीन
अन् मस्त धागा ! याला ' मराठीची लेणी' हे नाव साजून दिसेल. आवडीची लेणी मायंदाळ आहेत. आठवतील तितकी देतेय.. १. वर्षत सकळमंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूतां चळां कल्पतरुंचे आरव चेतनाचिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांच्छन मार्तंड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु २. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.. ३. मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी.. शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा... आणखी आठवेल तसे अपडेटवीन... स्नेहा
  • Log in or register to post comments

नवी सकाळ, नवी उमेद,

चौथा कोनाडा
गुरुवार, 05/15/2025 - 20:33 नवीन
नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद.. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वपुंचे हे वाक्य आवडते

श्वेता२४
Mon, 05/19/2025 - 15:49 नवीन
सुखाच्या क्षणांची माळ केली हट्टीपणानं,, पण... धाग्याच्या शेवटी गाठ विसरली.....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा