कतला फ्राय

पांथस्थ's picture
पांथस्थ in पाककृती
25 Dec 2008 - 10:22 am

साहित्यः

* तुमच्या आवडत्या माश्याच्या तुकड्या (नेहेमीप्रमाणे उभ्या कापा अथवा बंगाली पध्दतीने कापुन - मी कतला वापरला आहे)
* हळद
* मीठ
* मोहरिचे तेल

कृती:

१. माश्याच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळुन ठेवावे (~ ५-१० मिनीटे)

२. पसरट (आणि शक्यतो नचिकटणार्‍या) भांड्यात मोहरिचे तेल गरम करावे

३. तेल बर्‍यापैकी गरम झाल्यावर त्यात माश्यांच्या तुकड्या दोन्ही बाजुने हलक्या सोनेरी होउपर्यंत फ्राय करुन घ्याव्या.

शक्यतो जेवायला बसायच्या जरा आधी फ्राय करा आणि गरमा गरमच ताटात वाढा!

(मत्स्यप्रेमी*) पांथस्थ

(* - खायचे आणि पाळायचे - दोन्ही प्रकारच्या माश्यांचा शौकिन)

प्रतिक्रिया

तिखट किंवा मसाला काहीच दिसत नाही म्हणुन विचारले.
वेताळ

पांथस्थ's picture

25 Dec 2008 - 12:30 pm | पांथस्थ

वापरायला हरकत नाहि. तांदुळाची पिठी, रवा, मसाला, आलं-लसुण हेही वापरता येउ शकतं.

पण कधी कधी हे सगळ न वापरता मासा फ्राय केला तर मुळ चवीची मजा घेता येते.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2008 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृती आवडली. पण पीस कडक झाला पाहिजे तसा होतो का ?

पांथस्थ's picture

25 Dec 2008 - 1:07 pm | पांथस्थ

नुसता मासा फ्राय करतांना तेव्हढा कडक करु नये नाहितर तो वातड होतो. वरुन तांदुळाचं पिठ किंवा रवा लावला असल्यास वरवरचा पापुद्रा मस्त कडक होतो आणि मासा पण वातड होत नाहि.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2008 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तांदळाच्या पीठाने वरचा भाग कडक होतो, पण मधल्या भागाचा बर्‍याचदा लगदा होतो. (कीचनची तक्रार आहे)
रव्याने जरा पीस दम धरतो असे वाटते.

-दिलीप बिरुटे
( फीश फ्रायचा चाहता )

पाककृती आवडली...
---वल्लरी

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 1:06 pm | विसोबा खेचर

मेल्या पांथस्था, तुझ्या ह्या कतला फ्रायने आमचा मात्र कत्लं केला आहे! :)

आपला,
(उर्दू) तात्या.

आशिष सुर्वे's picture

22 Jul 2010 - 10:25 pm | आशिष सुर्वे

खूब भालो!
तुमी खाबार खेय नियेश्चो?
======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 10:30 pm | आमोद शिंदे

बापरे! पहिला फोटोच काय डेंजर आहे. (अर्धी भूक तिथेच मेली ;-) )माझ्या सारख्या नवशिक्या मासेखाऊला हे जमणे अवघड आहे.