✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सरडा चेला तर नेता गुरू

व
विवेकपटाईत यांनी
Wed, 09/18/2024 - 17:25  ·  लेख
लेख
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो. सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले. सरड्याने माणसाला विचारले तू माझ्या सारखा रंग बदलून दाखवू शकतो. तो माणूस म्हणाला त्यात काय विशेष आहे. मी या खुर्ची वर बसल्या-बसल्या रंग बदलू शकतो. तू फक्त माझ्या टोपी कडे बघ. सरड्याने त्या माणसाच्या टोपी कडे बघितले. क्षणातच त्या टोपीचा रंग हिरवा झाला, दुसऱ्या क्षणी लाल, नंतर निळा, पांढरा आणि भगवा झाला. अखेर पुन्हा टोपीचा रंग काळा झाला. त्या माणसाची रंग बदलण्याची कला पाहून सरडा आश्चर्यचकित झाला. सरडा त्याला म्हणाला आजगायत मी कोणत्या ही माणसाला रंग बदलताना पाहिले नाही. आपण खरोखर कोण आहात? तो माणूस म्हणाला मी सदा सत्तेच्या खुर्चीत विराजमान राहतो. त्यासाठी ही टोपीचा रंग बदलण्याची कला आत्मसात केली आहे. त्या माणसाची चरण वंदना करत सरडा म्हणाला गुरुदेव तुम्ही ही कला मला शिकवणार का?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
1412 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

AI मदत घेऊन व्हिडिओ बनविला

विवेकपटाईत
Wed, 09/18/2024 - 17:32 नवीन
AI मदत घेऊन व्हिडिओ बनविला त्याची लिंक https://youtu.be/arcx3pO9i0s?si=UHQcUZo0dC-yhpLB
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा