✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

...अजून सहाच महिने राहिलेत; शरीर-समृद्धी-संकल्प पूर्ण करा

क
कांदा लिंबू यांनी
Mon, 07/01/2024 - 12:58  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो. खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे. आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात. मीही २०२४ नवीन वर्षांचे काही संकल्प केले होते. त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे - -: पोटाचा घेर किमान तीन इंचांनी कमी करणे :- अर्थात हे एक उद्दिष्ट म्हणजे इतर अनेक लहानसहान उद्दिष्टे, नियोजन, अंमलबजावणी इत्यादींचा समुच्चय होता-आहे. मी सध्या ४६ वर्षीय शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा, निरोगी, तरुण पुरुष आहे. श्रीकृपेने अजूनतरी तरी रक्तदाब, मधुमेह आदी विकारांचे निदान झालेले नाहीय. पण समवयीन इतर अनेकांसारखंच मलाही (विशेषतः लॉकडाउननंतर) पोट सुटलंय. आणि मग वर संगीतल्याप्रमाणे नवीन वर्षाचा एक संकल्प म्हणून मी पोट कमी करणे, चेहऱ्यावर तकाकी आणणे, जिम मारून बाइसेप्स्, ट्राइसेप्स्, फोरआर्म्स्, शोल्डर्स्, काव्ज्, ऍब्स्, थाइज् वगैरे बनविणे, पातळ टीशर्ट् घालून बुलेटवर बाहेर निघालो तर इतरांनी वळून पाहायला हवं असं दिसणे वगैरे बाबी ठरविल्या. अर्थात त्या आधीही अनेकदा ठरविल्या होत्या! सुरुवातीला खूप उत्साह होता पण हळूहळू तो उत्साह थंड पडत गेला. अर्थात अधून मधून थोडी थोडी धुगधुगी येत राहते. पण त्यात काही सातत्य नाहीय; इच्छा अजूनही मेली नाहीय हे नक्की. सुदैवाने "अरे, चाळीशी उलटली की अनेक पुरुष उतारवयाचे नियोजन करायला लागतात. तू शेहेचाळीशी येऊनही अजून बॉडी बनवून इतरांना(!) दाखविण्याचे किमान टार्गेट तरी ठेवतो आहेस हे काही कमी आहे का? तू प्रयत्न करत राहा." अशी प्रेरणा मला अर्धांगिनीकडून वेळोवेळी मिळते. पण म्हणतात ना, प्रेरणा ही आंघोळ करण्यासारखी असते, रोजची रोज लागते. ती कुठेतरी कमी पडतेय. आता २०२४ वर्षाचे पहिले सहा महिने उलटलेत; अजून सहा महिने राहिलेत. "शरीर समृद्धी" हा माझा एक संकल्प खूप काही मार्गी लागलेला नाहीय. कदाचित माझ्यासारखे तुम्हीही एक शरीर-समृद्धीप्रेमी मिपाकर असाल. काही ना काही कारणांमुळे तुमचेही शरीर समृद्धीचे उद्दिष्ट अपेक्षित रीतीने पूर्ण होत असेल-नसेल. काहीजण आपले फिजिक् मस्त मेंटेन् करत असतील, काही जण त्यांचा हेवा करत असतील तर अजून इतर काहीजण त्यांच्याकडे "हे शोभते का या वयात" असे म्हणून दुर्लक्षही करत असतील. कुणाला "आपण चांगले दिसावे" ही प्रेरणा असेल तर अजून कुणाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल. पण प्रत्येकाकडे इथे लिहिण्यासारखे (आणि ते इतरांना उपयोगी पडण्यासारखे) नक्कीच काहीतरी असेल! चला तर मग, आपले शारीरिक समृद्धीचे प्रयत्न, नियोजन, अनुभव, यश-अपयश, सल्लामसलत, व्यायाम, कसरत, जिम, योग, प्राणायाम, ध्यान वगैरे इथे लिहुयात. सर्वांनाच फायदा होईल. मीही प्रतिसादांतून लिहीन. विषयानुरूप चर्चा व्हावी, थोडेफार अवांतर-सवांतर वगैरे चालेल पण अगदी पातळी सोडून नको ही अपेक्षा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13263 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

माहिती बद्दल धन्यवाद

मुक्त विहारि
Wed, 07/03/2024 - 22:41 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

आळस हा एक मोठा शत्रू आहे. आपण

शाम भागवत
गुरुवार, 07/04/2024 - 04:37 नवीन
आळस हा एक मोठा शत्रू आहे. आपण संकल्प करतो व आपल्या हातून हे होईल ना? असा विकल्प हा आळस आपल्याच मनांत जन्माला घालतो, ह्या आळसाला हळूहळूच मारायला लागतं. आपल्याला नक्की जमेल अशी कोणतीही छोटीशी गोष्ट करण्याचा संकल्प करायचा व तो प्राणपणाने जपायचा. सहा महिने जमलं तर मग आणखीन एका संकल्पाची जोड द्यायची व ती प्राणपणने जपायची. काही वर्षांनी आपण जी गोष्ट ठरवतो ती करतोच असा विश्वास आपल्यालाच नव्हे तर इतरांनाही वाटायला लागतो. हे सगळं मी आईकडून शिकलो._/\_ पण अजूनही माझ्यात सुधारणेला वाव आहेच. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा