ट-२० विश्वचषक अंतिम सामना
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. २०२२ मधे उपांत्य फेरीत इग्लंडविरुद्ध झालेल्या एकतर्फी पराभवाची भारताने परतफेड केली. आता शनिवारी भारताची गाठ दक्षिण आफ्रिका संघाशी पडेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा बर्याच अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तब्बल २० संघांचा सहभाग, अमेरीकेत झालेले साखळी सामन्यांचे आयोजन, तिकडची बॉलिंग फ्रेंडली पिचेस, सामन्यांची महागडी तिकिटे वगैरे. अमेरीकेतल्या लोकांशी बोलणे झाले तेव्हा त्यांना या विश्वकरंडकाबद्दल माहिती नव्हते. अमेरीकेने पाकीस्तानला धूळ चारली आणि नंतर सुपर एटमधे प्रवेश केला तेव्हा माध्यमातून थोडीफार चर्चा झाली. अमेरीकन्स फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल आवडीने बघतात, अमेरीकेतच त्याच्या स्पर्धा भरवून त्याला विश्वकरंडकासारखे प्रोजेक्ट करतात. अमेरीकेत क्रिकेटचा प्रवास येत्या काही वर्षात कसा होतो हे बघणे रोचक असेल. भारतीय, पाकिस्तानी, ब्रिटीश, साऊथ आफ्रिकन, कॅरेबियन लोक अमेरीकेत आहेत आणि वाढत चालले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या प्रसारावर आणि अर्थातच अमेरीकेतील मोठ्या अर्थकारणावर आयसीसीचा डोळा आहेच.
भारतासाठी संघ म्हणून आतापर्यंतची स्पर्धा छानच गेली. भारतीय संघ कधीच दडपणाखाली वाटला नाही. सर्व गोलंदाज जबरदस्त फॉर्ममधे आहेत. मात्र विराट कोहली, शिवम दुबेचा खराब फॉर्म, क्षेत्ररक्शकांनी सोडलेले सोप्पे झेल ही थोडी चिंतेची गोष्ट आहे. आफ्रिका संघ आयसीसी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच आला आहे. संघ सर्व आघाड्यांवर पूर्ण बहारात आहे. त्यामुळे भारताला सर्वोत्तम खेळ करायला लागेल. रोहीत आणि विराटची कदाचित शेवटची विश्वकरंडक स्पर्धा असेल त्यामुळे ते पूर्ण झोकून प्रयत्न करतीलच.
दोन्ही चांगले संघ अंतिम सामन्यात आले आहेत मात्र भारताचे पारडे तुलनेने किंचित जड आहे असे वाटत आहे. उद्या सामना बघायला मज्जा येणार आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाहाहा. :)
ASHES हरल्याच्या चर्चा
मनोरंजक प्रतिसाद....
मुद्दा नसला की वैयक्तिक
अगदी अगदी....