Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 03/07/2024 - 08:16
प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात. जुनेरलं नातं... आभाळीची चंद्रकोर शोभते तुझ्या भाळी तुझ्या पैंजण नादाने आनंदाची मांदियाळी चंद्रकोरीचा गारवा सुखावतो डोळा विचार चांदण्याचा मनी घुमतो पारवा चंद्रकोर झाली बिंब उजळल्या दाही दिशा चंचल मन शिंजीर पालवल्या नव्या आशा जसे नभी सुर्य चंद्र दिनरात अशी साथ कधी तार कधी मंद्र ताल,सुरांचे आर्त साथ कधी सरू नये जुनेरल्यां नात्यावर निरोपाची वेळं कधी येवू नये जुनेरले नाते नियतीचा खेळं एक जायं दिगंताला एक फुपाट्यातं जळं

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on गुरुवार, 03/07/2024 - 11:37

Permalink

वाह--मूळ कविते ईतकाच प्रतिसाद मस्त

कर्नल काकांची प्रतिभा बहरत चालली आहे. पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 03/07/2024 - 12:03

In reply to वाह--मूळ कविते ईतकाच प्रतिसाद मस्त by राजेंद्र मेहेंदळे

Permalink

+१ कविता हा आपला प्रांत नाही

+१ कविता हा आपला प्रांत नाही त्यामुळे कविता आधी वाचायचो नाही. पण कर्नल साहेबांमूळे कविता वाचण्याची सवय लागत चाललीय. पुढील कविता लवकर येऊद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sat, 03/09/2024 - 14:02

Permalink

चंद्रकोर आखीव रेखीव सुरेख आहे

चंद्रकोर आखीव रेखीव सुरेख आहे. शिंजीर म्हणजे??
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sat, 03/09/2024 - 15:32

Permalink

शिंजीर....

म्हणजे सनबर्ड, सुर्यपक्षी. अतीशय सुंदर आणा तेव्हढाच चंचल चपळ अगदी मनासारखा. छायाचित्र काढताना छायाचित्रकाराला घाम फुटतो. प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 03/15/2024 - 16:13

In reply to शिंजीर.... by कर्नलतपस्वी

Permalink

अच्छा! नवीन शब्द कळला

अच्छा! नवीन शब्द कळला
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 03/13/2024 - 08:50

Permalink

वा ! उत्तम

सुरेख आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by भागो on Wed, 03/20/2024 - 06:48

Permalink

अमरेंद्र बाहुबली +१

अमरेंद्र बाहुबली +१ कर्नल साहेब फॉर्मात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 03/20/2024 - 12:17

Permalink

वाह.

मूळ कवितेइतकीच ही कविताही आवडली.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3006 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com