✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शपथ

म — मी-दिपाली, Tue, 08/15/2023 - 18:43
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥ सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥ एक सूर... द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥ एक सूर... स्पंदनांत ये उचंबळून आज आर्तता विश्व या कुटुंब कल्पनेस देत मूर्तता अंतरी असीम बंधुभाव खोल बिंबवू ॥३॥ एक सूर... वासना विकार मीपणा समूळ तो गळो माणसास माणसातलाच देव आकळो देहमंदिरात हाच मंत्रघोष जागवू ॥४॥ एक सूर... (वृत्त - देवराज) १५.८.२०२३

प्रतिक्रिया द्या
2036 वाचन

💬 प्रतिसाद (6)

सुंदर वृत्तबद्ध...

कर्नलतपस्वी
Tue, 08/15/2023 - 20:16 नवीन
रचना वाचली की विंदाची, "माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी." पण थोडे शब्द बदलून. मला न गमले वृत्त,उपमालंकार कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा समजण्या तुला मझ्या मनी.
  • Log in or register to post comments

विंदांची कवीता....

कर्नलतपस्वी
Tue, 08/15/2023 - 20:17 नवीन
आठवते.
  • Log in or register to post comments

अत्यंत धोकादायकः एक सूर, एक ताल, एक राग आळवू

चित्रगुप्त
Tue, 08/15/2023 - 22:56 नवीन
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू एक सूर, एक ताल, एक राग आळवू --- एक कविकल्पना म्हणून हे साजरे-गोजरे वाटत असले, तरी प्रत्यक्षात उतरवणे बहुविध, संपन्न मानवी संस्कृतीचा घात करणारेच ठरते. एकच देव, एकच पवित्र ग्रंथ, एकच धर्म आणि हे मान्य नसणारांचा संहार .... --- जिहादींचा हाच तर प्रयत्न शतकानुशतके चाललेला आहे. विविधता नष्ट केल्यावर काय होते ते काही देशांतील भयावह परिस्थिती बघून समजते.
  • Log in or register to post comments

भेद मालवू असे अपेक्षित वाटत

गवि
Tue, 08/15/2023 - 23:09 नवीन
भेद मालवू असे अपेक्षित वाटत नसून भेदभाव (उच्च नीच) घालवू असे असावे. कविता निरागस आणि चांगली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अहाहा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/16/2023 - 08:30 नवीन
नितीमत्तेनं राहीलं पाहिजे. भेदाभेद अमंगल आहे आणि भवतालचं टीपणारी कविता. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून एकात्मतेचा विचार सांगणारी कविता आवडली.
सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥ एक सूर...
वाह ! वरील ओळींना पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर!

रंगीला रतन
Fri, 08/18/2023 - 05:27 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा