✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भोग

अ — अवतार, Tue, 06/27/2023 - 20:48
अंतरीचा ठाव माझ्या अजून मी घेतोच आहे अनंत जन्मांचे हे देणे अजून मी देतोच आहे वृक्ष छाया तापलेल्या धरणीला देतोच आहे पोळलेल्या हृदयावर मी ती छाया घेतोच आहे धीर देऊन भ्यालेल्यांना मीही तरी भितोच आहे अमृताच्या प्याल्यातूनही विष मी पितोच आहे इतरांची मी कीवच करतो परंतु मीही तोच आहे आयुष्याची शाई संपली तरीही मी लिहितोच आहे मरणाची मी वाट पाहतो तरीही मी मरतोच आहे जिंकिले जरी षड्रिपू तरी अजून मी हरतोच आहे खेळापासून सावल्यांच्या मैलन मैल पळतोच आहे सावली जरी माझी पडली परंतु मी जळतोच आहे थकलेल्या पाऊलवाटांवर परत मी फ़िरतोच आहे तरीही त्या अंतरात माझ्या अजून मी शिरतोच आहे पुष्कळ झाले पुरे करा अजून मी विनवतोच आहे परी अंतरीची व्याकुळता अजून अनुभवतोच आहे त्याचे देणे संपत नाही अजून तो देतोच आहे रिक्त हस्ते भोग हे भोगून मी घेतोच आहे

प्रतिक्रिया द्या
1686 वाचन

💬 प्रतिसाद (5)

वेगळा विचार. प्राक्तनाचा

राघव
Wed, 07/12/2023 - 12:23 नवीन
वेगळा विचार. प्राक्तनाचा विचार अंतर्मुख व्हावयास लावतो. अन् त्याची सुरुवात "असं माझ्याच सोबत का?" यानं होते. मांडणी थोडी त्या अनुषंगानं केलीत तर आणिक गहन होईल. पुलेशु.
  • Log in or register to post comments

वाहवा!

चांदणे संदीप
Wed, 07/12/2023 - 13:41 नवीन
काहीतरी मिळाले नाही की जी अपूर्णता येते किंवा अनाकलनीय असे काही आयुष्याबाबत घडतच राहते असा भाव कवितेत सुंदरपणे उतरला आहे. कविता आवडली. मिपावर नियमीत लिहित रहा. सं - दी - प
  • Log in or register to post comments

वा. खूप छान.

चित्रगुप्त
Wed, 07/12/2023 - 18:21 नवीन
वा. खूप छान कविता. वरती संदीप यांनी सांगितल्याप्रमाणे मिपावर नियमीत लिहित रहावे.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Wed, 07/19/2023 - 16:23 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अवतार
Mon, 10/16/2023 - 19:49 नवीन
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा