Skip to main content

चक्रीवादळ

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 13/06/2023 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष आमे तैयार छे, गुजरात दक्ष पाकीस्तानातून भारतात, बेकायदेशीर! नाही विजा, आहे ना सोबत गडगडाट, तेजाळ लखलखाट विजा!! कडेकडेनेच निघून जा, हा विनंती अर्ज पीकपाणी नुकसान नको फिटलं नाही कर्ज. करु नको विस्थापीत, नको उडवू घराचे पत्रे, हवामान महासंचालक, कशी वाचवावी लक्तरे?
लेखनविषय:

वाचने 782
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

इथे पुण्यात एवढे जोरात वारे वाहातायत किनारपट्टीवर काय परिस्थिती असेल.