✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !

उ
उनाड यांनी
Fri, 05/12/2023 - 06:12  ·  लेख
लेख
गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा. या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे. महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अ‍ॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला. नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले. स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्‍या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला. या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे. केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36117 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

धन्यवाद.

कॉमी
Fri, 05/12/2023 - 09:03 नवीन
लव जिहाद असतो असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न - १. लव जिहाद म्हणजे काय ? निकष काय आहेत ? (आय ए एस अधिकाऱ्यांचा घटस्फोट झाला तरी लव जिहाद असतो, केवळ मुस्लिम गुन्हेगार असला की इतर काही धार्मिक कारण समोर नसताना लव जिहाद म्हणले जाते, म्हणून प्रश्न विचारणे गरजेचे.) २. ह्या निकषाप्रमाणे किती गुन्हे झाले आहेत ? आकडेवारी हवी, स्वतंत्र उदाहरणे नकोत. हे गुन्हे एकूण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांपैकी किती प्रमाणात आहे ?
  • Log in or register to post comments

धर्मांतर हा मुख्य हेतू आणि

चौकस२१२
Fri, 05/12/2023 - 10:10 नवीन
धर्मांतर हा मुख्य हेतू आणि त्यासाठी वापरल्याजाणारी अनेक शस्त्रानपकी एक शस्त्र म्हणजे लग्न / मैत्री आणि यातून धर्मांतर ... किंवा अगदी खरे प्रेमात पडून लग्नाचे वेळीस मात्र "तू माझाच धर्म स्वीकार हि सक्ती करणे " पण तुम्हाला जर फसवून / अमिश दाखवून केलेले धर्मांतर हे होते हेच मान्य नसेल आणि हिंदूंचे असे धर्मांतर केले जाते हे पण अजिबात मान्य दिसत नाहोये / नसेल तर कशाला वेळ घालव्यायाचा... तुमचा मूळ हेतू हे सर्व अस्वीकर करणायचा आहे हे दिसतंय ... ( कृपया जे काय लिहायचे ना ते उघड प्रतिसादात लिहा ती खरडवही कि काय किंवा व्यनि पाठवू नका गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

१. स्त्रियांना फसवून लग्न

कॉमी
Fri, 05/12/2023 - 10:25 नवीन
१. स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ? २. असे किती वेळा घडले ? विदा काय ? आणि तुम्हाला पण चर्चा न करता तुमचेच पालुपद आळवायचे असेल तर तुमचा प्रतिसाद दुर्लक्षित होईल. त्यामुळे तुम्ही उगाच माझा हेतू काय वैगरे फालतुगिरी न करता तुमचा वेळ वाचवाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

" धर्मांतर करा" "जग पादाक्रांत करा"

चौकस२१२
Fri, 05/12/2023 - 11:29 नवीन
स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ? फसवणूक करून लग्न करणे हे चुकीचेच आहे पण त्याचा वापर धर्मांतरासाठी केला गेला असेल तर त्याला अजून एक कंगोरा येतो... तो तुम्ही दुर्लक्ष करा हवे तर सोयीस्कर रित्या ... इतरांना तो दिसतो म्हणलना ला "लंबे रेसका घोडा आहे ..." " धर्मांतर करा" "जग पादाक्रांत करा" हे जगातील २ अब्राहमीक धर्मांचे ब्रिदवाकायचआहे जणू मग त्यासाठी प्रेम वापरा , धाक वापरा, बाकी संपत्ती वापरा ... टूल किट मध्ये अनेक टूल आहेत आणि जर धर्मानंतर हा हेतू नस्ता तर फ़िलपिन पासून नार्वे पर्यंत इतक्या वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकाच धर्माचे कसे झाले असते? तुम्ही हिंदू बहुसंख्यांक प्रदेशात राहात असावा म्हणून ते जाणवत नसेल, पण एकदा हिंदू अल्पसंख्यांक होऊन बघा मग कळेल " जेहोवा विटनेस" वाले दारावर येऊन अतिशय हुशारीने कसे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात ते ( हे लेकाचे गीतेतील काही गोष्टी सांगून तुम्हाला सांगतील कि बघा येशूला शरण जा ) तुम्हाला झळ लागलेली दिसत नाहीये .. त्यामुळे आकडेवारी आकडेवारी चालू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

Source : trust me bro

कॉमी
Fri, 05/12/2023 - 11:33 नवीन
Source : trust me bro
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

Source ? कसला पाहिजे ?

चौकस२१२
Fri, 05/12/2023 - 11:42 नवीन
Source ? कसला पाहिजे ? "जेहोवा विटनेस" वाले दारावर येऊन अतिशय हुशारीने कसे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात याचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हे हे

उनाड
Fri, 05/12/2023 - 16:11 नवीन
ते तर इस्कॉन वालेही करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

१. स्त्रियांना फसवून लग्न

सुबोध खरे
गुरुवार, 05/18/2023 - 19:31 नवीन
१. स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ? मूळ हेतू. खून आणि सदोष मनुष्यवध यातील मूलभूत फरक जो आहे तोच. पहिल्यात त्या माणसाचा वध करणे हाच मूळ हेतू असतो (murder). तर दुसऱ्यात त्या माणसाला इजा करणे हा हेतू असतो किंवा निष्काळजी पणाने मृत्यू होतो परंतु वध करणे हा हेतू नसतो. (culpable homicide not amounting to murder). हिंदू ख्रिश्चन किंवा अन्यधर्मीय मुलीला फसवून किंवा धाक दाखवून इस्लाम मध्ये धर्मांतरं करणे या हेतूने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी विवाह करणे ( आणि नंतर तिला तलाक देऊन सोडून देणे) अथवा हे आपले आद्य धर्मकर्तव्य आहे असे समजणे आणि त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसणे अथवा उलट अभिमान बाळगणे म्हणजे लव्ह जिहाद. याचे प्रमाण आंतरधर्मीय विवाहात नगण्य आहे परंतु त्यामागचा मूळ हेतू हा अत्यंत जघन्य आहे. त्यामागे स्त्रियांच्या बद्दल कस्पटासमान वागवण्याची मानसिक वृत्ती हि नीच आहे. भारतात रोज अधिकृत आकड्यांप्रमाणे (२०२१) रोज ८६ बलात्कार होतात ( वर्षाला साधारण ३२,०००) पण निर्भया बलात्कार प्रकरण हे एवढं प्रचंड का गाजलं? तर त्यात ज्या निर्घृणतेने त्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर अत्यंत वाईट तर्हेने शारीरिक अत्याचार केला गेला त्यामुळे माणसे संतापाने पेटून उठली. आज लव्ह जिहाद हा विषय परत ऐरणीवर आला कारण ज्या तऱ्हेने या गोष्टी घडत गेल्या आणि पुरोगामी लोकांनी त्या लपवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला यामुळे लोकांच्या मनात संताप आहे. आता उनाड यांच्या पुरोगामी गृहीतकाप्रमाणे हा बलात्कार एक उच्चवर्णीय फँटसी वगैरे नाही होत का? उच्चवर्णीय फॅन्टसी असेल तर त्यात ख्रिश्चन मुलींचा लव्ह जिहाद व्हायला नको https://www.deccanherald.com/national/love-jihad-campaigns-by-religious-heads-trigger-concerns-in-kerala-1102718.html केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्री श्री अच्युतानंदन यांनी २०१० मध्ये हा विषय काढला होता. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kerala-cm-criticised-for-speaking-out-against-love-jihad/articleshow/6221406.cms

वस्तुस्थिती नाकारणे हा अत्यंत वाईट पुरोगामी दळभद्रीपणा आहे.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

ओके

उनाड
गुरुवार, 05/18/2023 - 20:34 नवीन
आपले विधान सिद्ध करण्यासाठी ख्रिस्चन व कम्युनिस्ट लोकांची साक्ष घ्यावी लागते यातच काय ते आले. १ लव्ह जिहाद असे काही नाही असे केम्द्र सरकार ने लिहून दिले होते. २ मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र सरकार ने समिती स्थापन केली, तीन महिन्यात एकही तक्रार आली नाही. महिला बद्दल चा कळवळा बलात्कार्‍याना पेढे भरवले तेव्हाही दिसला असता तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपली जळजळ आणि समर्थन करण्याचा

सुबोध खरे
गुरुवार, 05/18/2023 - 20:41 नवीन
आपली जळजळ आणि समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न समजून येतो आहे आपल्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

यांच्या थापा उघडकीस येऊन

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/18/2023 - 23:19 नवीन
यांच्या थापा उघडकीस येऊन तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच थापा पुढे रेटणे सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धाग्यात लिहिलंय की "लव्ह

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/18/2023 - 23:23 नवीन
धाग्यात लिहिलंय की "लव्ह जिहाद ही एक उच्चवर्णीय फँटसी आहे". आधी या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा माफी मागून दावा मागे घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

लव्ह जिहाद प्रत्यक्षांत सेक्स

साहना
Sat, 05/13/2023 - 01:05 नवीन
लव्ह जिहाद प्रत्यक्षांत सेक्स जिहाद आहे कारण इथे लव्ह चा काहीही संबंध नाही. मुद्देसूद उत्तर खालील प्रकारे आहे आणि माझे वैयक्तीक मत आहे. १. लव जिहाद म्हणजे काय ? निकष काय आहेत ? - पती मुस्लिम आणि पत्नी बिगर मुस्लिम. - सर्वसाधारण स्थितीत ह्यांची जोडी जमणे अशक्य असले पाहिजे. (म्हणजे सेलेब्रिटी, श्रीमंत व्यक्ती इत्यादी ह्यातून बाहेर पडतात कारण धर्म बाहेर लग्न करणे इथे सामान्य बाब असते) - पती काही तरी खोटे बोलून बिगर मुस्लिम मुलीला पटवतो. * खोटे पणाची काही उदाहरणे * आपला धर्म, आर्थिक स्थिती ,शिक्षण लपवणे . * आपली इतर लग्ने किंवा रखेल असेल ती लपवणे. - बिगर मुस्लिम मुलगी मुस्लिम बनते. - ह्यानंतर मुलीला सत्य कळते पण वेळ निघून गेलेली असते. - त्या लग्नातून बाहेर पडण्याची धडपड केली तर इस्लामिक कायदा किंवा हिंसेचा वापर. - कधी कधी लग्न सुद्धा होत नाही पण सेक्स केले जाते (खोटे बोलून). - mms बनवून ब्लॅकमेलिंग केले जाते. २. ह्या निकषाप्रमाणे किती गुन्हे झाले आहेत ? उत्तर प्रदेश मध्ये २०२० मध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण झाला त्यातील निकष माझ्या निकषापेक्षाही जास्त संकुचित होते आणि मागील ३ वर्षात तिथे ५०० केसेस रजिस्टर झाल्याचे कळते. आता उत्तर प्रदेश सारख्या भागांत बहुसंख्य गुन्हे नोंदवले सुद्धा जात नसतील. पण तरी सुद्धा हा आकडा बरोबर आहे असे धरल्यास ५०० केसेस माझ्या मते खूप आहेत. प्रत्यक्ष आकडा खूप मोठा असू शकतो. > हे गुन्हे एकूण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांपैकी किती प्रमाणात आहे ? माझ्या मते हा प्रश्न निरर्थक आहे. विविध प्रकारचे अत्याचार विविध प्रमाणात होत असले तरी सामाजिक मताच्या दृष्टिकोनातून काही गुन्हे जास्त महत्वाचे ठरतात. उदाहरणार्थ देशांत असंख्य बलात्कार झाले असले तरी निर्भया कांड हे सामाजिक मताच्या दृष्टिकोनातून सर्वांत मोठे ठरले. ह्या शिवाय हिंदू जनतेने कॉमन सेन्स वापरणे जास्त गरजेचे. बहुतेक वेळा मोठे शिक्षण घेऊन मत व्यक्त करण्यार्या इरफान हबीब किंवा रोमिला थापर ह्यांच्या पेक्षा आपल्या अशिक्षित आजीचे इतिहासाचे मर्मज्ञान जास्त चांगले असते. इस्लाम धर्मांत स्त्रियांचे स्थान जनावराच्या प्रमाणे आहे. विशेषतः काफ़िरांच्या स्त्रिया ह्या वेश्येप्रमाणे भोगायच्याच असताति हि इस्लामिक मानसिकता आहे. हे माझे मत नसून त्यांचा धर्मच सांगतो. आता आपला शेजारी हा लैगिक लंपट आहे अशी शंका सुद्धा आल्यास आपण आपल्या घरातील बायकामुलांना त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा नाही देणार का ? विषाची परीक्षा घ्यायची तरी कश्याला ? त्यामुळे आकडेवारी काहीही असली तरी आपल्या हिंदू मुलींना सावध करणे हा आपला अधिकार आहेच. आणि समजा लव्ह जिहाद खोटा आहे तर मग कायदा करायला विरोध का ? माझ्या मते कायद्याचे निकष खालील प्रकारे असतील. * प्रौढ व्यक्तींना वाट्टेल त्याच्याशी लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे. * लग्नानंतर धर्मांतर सुद्धा करणे प्रौढ व्यक्तींचा अधिकार आहे. * हे सर्व दोन्ही व्यक्ती स्वखुशीने करत आहेत हे सिद्ध केले पाहिजे. * ह्या दरम्यान कुठल्याही पार्टीने खोटेपणा केला, धर्म लपवला किंवा आपली इतर लग्ने लपवली तर त्यासाठी कठोर शिक्षा असली पाहिजे. --- हिंदू मुली ह्या मूर्ख आहेत असा लव्ह जिहाद चा अर्थ होत नाही. फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती नेहमीच आपल्या समूहांत एकतेने राहतात. माझ्या माहितीतील ग्रूमिंग गॅंग मध्ये फार तर ५ लोक असतील. पण एकता असलेले ५ लोक, एकी नसलेल्या १ लाख लोकांवर भारी पडतात आणि हे फक्त लव्ह जिहाद ला लागू होत नाही तर क्रेडिट कार्ड फ्रॉड, टेली मार्केटिंग फ्रॉड, भुरट्या चोऱ्या इत्यादी अनेक ठिकाणी हाच रुल लागू होतो. इथे कठोर कायदे आणि त्यांची अंबलबजावणी हे महत्वाचे आहे (आपल्या देशांत कठीण आहे) आणि त्याहून महत्वाचे म्हणजे आपल्या लोकांचे प्रबोधन. ह्या शिवाय प्रबोधन हा आमचा अधिकार सुद्धा आहे. लव्ह जिहाद खोटे आहे तरीसुद्धा प्रबोधन करण्यात काय गैर आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

उत्तर प्रदेश

उनाड
Sat, 05/13/2023 - 02:08 नवीन
तिथल्या पोलीस यंत्रणेत असलेला सिस्टीमॅटिक बायस लक्षात घेता या बहुतांश केसेस खोट्या आहेत. मिसकॅरेज झालेल्या मुलीची केस तिथलीच, शिवाय तरुण मुलाने पोलीस स्टेशन मधल्या प्लॅस्टिक नळाला गळफास घेऊन 'आत्महत्या' केलेली केसही तिथलीच. सर्व मुस्लीम क्रूर असतात असे नव्हे, नात्यातील एखादी मुलगी मुस्लिम मुलाशी लग्न करू इच्छीत असेल तर तिला हजारदा विचार करायला सांगेन. पण 'लव्ह जिहाद' अशी फार मोठी कॉन्स्पिरेसी आहे हे मात्र उच्चवर्णीय हिंदुंची फेंटसी वा फोबियाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

* प्रौढ व्यक्तींना वाट्टेल

उनाड
Sat, 05/13/2023 - 03:16 नवीन
* प्रौढ व्यक्तींना वाट्टेल त्याच्याशी लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे. * लग्नानंतर धर्मांतर सुद्धा करणे प्रौढ व्यक्तींचा अधिकार आहे. * हे सर्व दोन्ही व्यक्ती स्वखुशीने करत आहेत हे सिद्ध केले पाहिजे. * ह्या दरम्यान कुठल्याही पार्टीने खोटेपणा केला, धर्म लपवला किंवा आपली इतर लग्ने लपवली तर त्यासाठी कठोर शिक्षा असली पाहिजे. https://www.bbc.com/hindi/india-65511298?xtor=AL-73-%5Bpartner%5D-%5Bbbc.news.twitter%5D-%5Bheadline%5D-%5Bhindi%5D-%5Bbizdev%5D-%5Bisapi%5D&at_campaign_type=owned&at_link_id=F6122E90-EC84-11ED-8C83-00FDD772BE90&at_link_type=web_link&at_campaign=Social_Flow&at_link_origin=BBCHindi&at_ptr_name=twitter&at_format=link&at_bbc_team=editorial&at_medium=social हे सर्व पाळूनही रिकामटेकडे विहिंप वाले सोडत नाहीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

जो पर्यंत माझ्या घरी आग

विवेकपटाईत
Fri, 05/12/2023 - 09:57 नवीन
जो पर्यंत माझ्या घरी आग लागणार नाही मी सत्य स्वीकार करणार नाही. झोपून राहणार.
  • Log in or register to post comments

नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः

चौकस२१२
Fri, 05/12/2023 - 10:14 नवीन
नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. प्रश्न अंतर्धर्मीय प्रेमविवाह करण्याचा नाहीये तर त्यानंतर चे सक्तीचे धर्मांतर हा आहे पण आपण काही हा मुद्दा लक्षात घेण्याचं मनस्थितीत दिसत नाहीत या उदाहरणात मुलगी गरिबी होती मग मदत जर या तरुणाला करयाची तर करडे कि लग्न ,, पण धर्मांतर का ?
  • Log in or register to post comments

प्रेम ला सुद्धा अटी लागू

सुबोध खरे
Fri, 05/12/2023 - 10:40 नवीन
प्रेम ला सुद्धा अटी लागू असतात हे माहिती नव्हतं का? धर्म बदलणार असलीस तरच माझं प्रेम आहे नाही तर नाही. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments

एक रामबाण (!) उपाय

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 11:31 नवीन
Group A, Indic religions: हिंदू, शीख, बौद्ध, जैन Group B, Non indic religions: इस्लाम, ख्रिश्चानिटी, जुडाइजम व इतर Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. मग लव्ह जिहादच काय, इतर सर्व जिहादाचाही नायनाट होईल. इस्लामी देशात मुसलमानाने धर्म सोडला तर तडकाफडकी देहांताची शिक्षा असते. 'पाकिस्तानी मुसलमान धर्म बदलून हिंदू/ शीख/ जैन झाला' अशी बातमी आजतागायत कुणी वाचलेली नाही. जोपर्यंत हे धर्मांध इस्लामी देश समूळ सेक्युलर होत नाहीत, तोपर्यत हिंदूंना सेक्युलरिझमचे डोस पाजणे बंद करा.
  • Log in or register to post comments

लव जिहाद तर लव जिहाद. पण जर

कानडाऊ योगेशु
Fri, 05/12/2023 - 11:47 नवीन
लव जिहाद तर लव जिहाद. पण जर हिंदू स्त्री शी मुसलमानाने प्रेमाने विवाह केला आहे तर त्याला पुढे अनेक विवाह करता येणार नाही असा बदल जरी त्यांच्या बाजुच्या कायद्यात करता आला तर पुष्कळ आहे. तो झाकीर नाईक तर स्त्री व पुरुष गाडीची दोन चाके असतात. लग्नानंतर दोन्ही चाके एकाच प्रकारची असणे गरजेचे असते. त्यामुळे स्त्रीचे धर्मांतरण आवश्यक ठरते असे तारे तोडत असतो. त्यातही मुसल्मानाचे चाक म्हणजे गाडीचे प्रॉपर चाक व हिंदू स्त्री म्हणजे सायकलचे चाक अशी मुद्दामुन अ‍ॅनॉलॉजी लावतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

Group Aमधून B मधे धर्म

आग्या१९९०
Fri, 05/12/2023 - 12:45 नवीन
Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. मग लव्ह जिहादच काय, इतर सर्व जिहादाचाही नायनाट होईल. ग्रुप B मधून A मधे धर्म परिवर्तन करण्यासही कायद्याने बंदी असावी का? एखादयाला आपल्या धर्मातील तत्वे पसंत नसतील आणि दुसरा धर्म स्वीकारण्याची ईच्छा असेल तर कायाद्याने अडवता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

सध्या नाही

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 12:51 नवीन
तसा कायदा भारतात नसल्यामुळे सध्या अडवता येणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

काहीही

उनाड
Fri, 05/12/2023 - 16:00 नवीन
हिंदु पारसी व जुडाईझम मध्ये इन कमिंग अशक्य आहे. एखाद्या मुस्लिमाने हिंदू धर्म स्वीकारलाच तर त्याला कोणती जात देणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

राहू द्या

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 17:34 नवीन
तुम्ही उगा नसता लोड घेऊ नका. हिंदू समाज काय ते बघून घेईल. तुम्ही तुमच्या या बांगा अधोगामी धर्मीयांसमोर जाऊन द्या. कुराण, अपॉस्टसी, ब्लास्फेमी, चार लग्ने, हलाला वगैरे विषयांवर. जगलावाचलात तर तुमचे थरारक अनुभव मिपावर लिहा, वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

१) एखाद्या अमुस्लिमाने

श्रीगुरुजी
Fri, 05/12/2023 - 20:08 नवीन
१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल? २) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का? ३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का? ४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

१) एखाद्या अमुस्लिमाने

उनाड
Fri, 05/12/2023 - 21:01 नवीन
१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल? तो आपला पंथ निवडू शकतो, इन फॅक्त, शिया सुन्नी होऊ शकतात व उलटही होऊ शकते. २) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का? हो. ३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ? ४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या उत्तरांवरून हे स्पष्ट

श्रीगुरुजी
Fri, 05/12/2023 - 21:07 नवीन
या उत्तरांवरून हे स्पष्ट झालंय की इस्लामविषयी आपल्याला कणभरही माहिती नाही. तस्मात् लव्ह जिहादविषयी कोठून ज्ञान मिळणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

मुळात हे प्रश्न गैरलागू आहेत.

उनाड
Fri, 05/12/2023 - 21:21 नवीन
मुळात हे प्रश्न गैरलागू आहेत. इस्लाम हा तुमचा आदर्श आहे का? त्याची का उठाठेव ? बरं ते जाऊ द्या, सोपा प्रश्न, एका दलिताने कंटाळून मुस्लिम व्हायचा निर्णय घेतला, ते शक्य आहे ? ख्रिस्चन व्ह्यायचा निर्णय घेतला, शक्य आहे ? ब्राह्मण व्ह्यायचा निर्णय घेतला, शक्य आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दलित धर्म बदलून मुस्लिम किंवा

श्रीगुरुजी
Fri, 05/12/2023 - 21:49 नवीन
दलित धर्म बदलून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दलित मुलीने ब्राह्मणाशी लग्न केले तर ती ब्राह्मण बनते. परंतु भारतीय घटना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला जात बदलू देत नाही. पण एखाद्या हिजराने सुन्नी व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? एखाद्या अहमदीने कुरेशी आडनाव घेणे शक्य आहे का? एखाद्या अहिंदूने धर्म बदलून हिजरा किंवा अहमदी बनणे शक्य नाही किंवा एखादा अहिंदू मॉर्मन किंवा असिरिअन ख्रिश्चन बनणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

सुन्नी म्हणजे पहिल्या चारी

कॉमी
Fri, 05/12/2023 - 22:21 नवीन
सुन्नी म्हणजे पहिल्या चारी खलिफांना मानणारे इतकेच तर आहे ना ? शिया म्हणजे हसन हा पहिला इमाम आहे आणि आधीचे तीन खलिफा मान्य नाहीत. मग शिया सुन्नी होण्यास किंवा सुन्नी शिया होण्यास काय अडचण आहे ? बाकी दावे माहीत नाहीत पण मॉर्मन लोक घरोघरी जाऊन बुक ऑफ मॉर्मन वाटत असतात. त्यामुळे मॉर्मन होता येत नाही हे पण खरे नसावे. (ह्यावर बुक ऑफ मॉर्मन म्हणून एक उत्तम संगीतिका आहे मॉर्मन प्रचारकांची थट्टा करणारी म्हणून माहितीये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१) एखाद्या अमुस्लिमाने

उनाड
Fri, 05/12/2023 - 21:01 नवीन
१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल? तो आपला पंथ निवडू शकतो, इन फॅक्त, शिया सुन्नी होऊ शकतात व उलटही होऊ शकते. २) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का? हो. ३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ? ४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

Group Aमधून B मधे धर्म

तर्कवादी
Tue, 05/16/2023 - 23:57 नवीन
Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी.
हे घटनाबाह्य ठरेल. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला हवा तो धर्म आचरण्याची मुभा दिली आहे. फक्त सक्तीचे वा प्रलोभन दाखवून केले गेलेले धर्मांतर नसावे.
इस्लामी देशात मुसलमानाने धर्म सोडला तर तडकाफडकी देहांताची शिक्षा असते. 'पाकिस्तानी मुसलमान धर्म बदलून हिंदू/ शीख/ जैन झाला' अशी बातमी आजतागायत कुणी वाचलेली नाही.
पाकिस्तानचा आदर्श समोर ठेवून भारताची राज्यघटना पुनश्च लिहावी असे आपणास वाटते काय ? अवांतर : अझरबैजान हे मुस्लिम बहूल (९७% लोकसंख्या) असलेले राष्ट्र घटनात्मक पातळीवर धर्मनिरपेक्ष आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

र्म परिवर्तन करण्यास

चौकस२१२
Fri, 05/12/2023 - 11:50 नवीन
र्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. अरारारारा आता बघा मेणबत्ती घेऊन मोर्चा काढणारे कसे तुमच्या मागे लागतील .. पहिला फलक असेल " आकडेवारी द्या असे किती हिंदू शीख जैन धर्मांतरित झाले: दुसरी पाटी असेल: "मूलभूत हक्कांची पायमल्ली... " आणि अर्थातच पुढील घोषणा " घर वापसी चालते तर धर्मांतर का नाही - घर्वप्सी हे गेलेल्याने परत येणे असे आहे ,, नसलेल्याला येन केन प्रक्रारे धर्म बदलायला लावणे असे नाही ,, हे अर्थातच हे पुरोगामी विसरतात "
  • Log in or register to post comments

इलाज नाही. दुर्लक्ष करावे.

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 12:02 नवीन
अशा मेणबत्ती महाभागांकडे दुर्लक्ष करावे. इस्लामी धोक्यावर उपाययोजना हा आपला कळीचा मुद्दा नजरेआड होऊ देता कामाचे नाही. तिथे मेणबत्तीचा वापर निराळ्या प्रकारे करावा लागला तर डगमगू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

धर्मांतरावर बंदी आणा वैगरे

कॉमी
Fri, 05/12/2023 - 12:08 नवीन
धर्मांतरावर बंदी आणा वैगरे सगळ्या fantasy आहेत. असल्या fantasy मध्ये रमायचे असेल तर रमत रहा. हिंदूंना बॉक्स मध्ये ठेऊन इतर विश्वासोबत संपर्क तोडून द्यावा अशी मागणी झाली धर्मांतर रोखण्यासाठी तरी आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे जेहोवा विटनेस पण नाही आणि धर्मांतर करवून का होईना खायला देणारे मिशनरी पण नाही. सगळा प्रॉब्लेमच संपला.
  • Log in or register to post comments

बरं

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 12:12 नवीन
हे कडक धर्मांतरविरोधी नियम इस्लाममध्ये का आहेत आणि मुसलमान समाजात त्यांना सर्वमान्यता का आहे यावर जरा टिप्पणी करा पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

इस्लाम फारच आदर्शवत दिसतो

कॉमी
Fri, 05/12/2023 - 12:15 नवीन
इस्लाम फारच आदर्शवत दिसतो तुम्हाला. इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे. तुम्हाला त्या धर्माचे अनुकरण करायचे आहे, मला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

:-)

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 12:20 नवीन
आम्हाला इस्लामचे अनुकरण नव्हे तर कायमचा बंदोबस्त करायचा आहे. आता या पाहू सोबत :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

अहो पण

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 12:26 नवीन
जर तुमच्या मते इस्लाम धर्म अधोगामी का काय तो असेल, तर हिंदूंच्या मानगुटीवर का बसताय? हे सगळे ज्ञान वाटायला जामा मशिदीत जा की. हातीपायी धड परत आलात तर तुम्हाला ताबडतोब एक दहीमिसळपाव पार्टी माझ्यातर्फे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

तुम्ही पण सुप्रीम कोर्टासमोर

कॉमी
Fri, 05/12/2023 - 16:25 नवीन
तुम्ही पण सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला बसा धर्मपरिवर्तन बंदी कायद्यासाठी. दोघे एकत्र जाऊ नंतर दहीमिसल खायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

धन्यवाद

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 17:38 नवीन
न मागता सल्ला देणारे तुमच्यासारखे परोपकारी विरळाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

नाही नाही, विरळ नाही, तुमचा

कॉमी
Fri, 05/12/2023 - 17:49 नवीन
नाही नाही, विरळ नाही, तुमचा सल्ला आधी वर आहे, तुमचे अनुकरण केले बस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला

सुबोध खरे
Sat, 05/13/2023 - 10:33 नवीन
सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला बसा धर्मपरिवर्तन बंदी कायद्यासाठी त्याबद्दल न्यायालय किंवा सरकार काहीच करणार नाही परंतु शांतताप्रेमी एखादे वेळेस "सर तन से जुदा" करतील. आणि जामा मशिदीत शुक्रवारी तसे केलेत तर नक्कीच "सर तन से जुदा" करतील बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला

श्रीगुरुजी
Fri, 05/12/2023 - 13:04 नवीन
इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे. + ७८६ म्हणून तर या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोरपंथात कोणालाही जाण्यास बंदी असावी, या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथानुयायांचे फाजिल लाड करण्यास बंदी असावी आणि या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथातून कोणास सुटका हवी असेल तर त्यांना पाठिंबा व मदत द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

आणि हो

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 12:18 नवीन
एकेकाळी राम मंदिर, कलम 370चा अंत, भाजपला पूर्ण बहुमत, काँग्रेस- शिवसेना युती, त्रिपुरा- बंगालमधून कम्युनिस्टांची हकालपट्टी वगैरेसुद्धा fantasyच होत्या हे विसरू नका :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

फालतू चा टी आर पी वाढतोय

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 05/12/2023 - 12:21 नवीन
अशा धाग्याना अनुल्लेखाने मारावे. शेजारी आग लागली म्हणुन गंमत बघणार असाल तर ती आग आपल्या घरादाराचा कधी घास घेईल समजणार नाही ईतके लक्षात घेतले पाहीजे.
  • Log in or register to post comments

हेच तर चुकते हिंदूंचे

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 12:33 नवीन
चोरून घुसणाऱ्या अशा वैचारिक रोहिंग्या जिहादींना प्रत्येक चोरखिंडीत गाठून उघडे पाडले पाहिजे. मोकळे रान देणे बरोबर नाही. ही चर्चा अनेकजण वाचत असतात. तातडीने प्रतिवाद झाला नाही तर समाज गैरसमज करून घेतो आणि जागोजागी छुपे पाकिस्तान उगवतात. हा शेकडो वर्षांचा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

धर्मांध कट्टर

चौथा कोनाडा
Fri, 05/12/2023 - 12:49 नवीन
1919 साली जगातील धर्मांध कट्टर मुसलमानांनी तुर्कस्थानातील जागतिक इस्लामी खलिफाच्या समर्थनार्थ 'खिलाफत' नावाचे आंदोलन आरंभिले. खिलाफत आंदोलनाचे ध्येय होते इस्लामी राज्याचे रक्षण आणि निर्मिती. अश्या या आंदोलनाला गांधींनी पाठिंबा दिला आणि काँग्रेसला ही द्यायला लावला, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलं की खिलाफत ही आफत आहे. भारतीय जनतेची हिंदुसमाजाची दुर्दशा होऊ नये, देशाचे तुकडे पडू नयेत, जातिभेद जातिद्वेष नष्ट आहेत, जन्मावर आधारित उच्चनीचता नष्ट होऊन समाजात समानता यावी यासाठी समाजचिंतक सावरकरांनी सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी लिहिली एकुण ३८ भाग आहेत.
  • Log in or register to post comments

त्यांच्या पत्नीने लिहिलेले

आग्या१९९०
Fri, 05/12/2023 - 13:07 नवीन
त्यांच्या पत्नीने लिहिलेले पुस्तक लवकरच प्रदर्शित होत आहे. आता भारतरत्न मिळणे फार दूर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

आता भारतरत्न मिळणे फार दूर

चौथा कोनाडा
Fri, 05/12/2023 - 17:36 नवीन
आता भारतरत्न मिळणे फार दूर नाही.
ग्रेट न्युज !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा