द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा
आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा.
पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो.
चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत.
धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते.
चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही.
---
रेटिंग : ४.२/५
- चित्रीकरण *****
- अभिनय *****
- दिग्दर्शन ****
- पटकथा ****
- परिणामकारता ****
वर्गीकरण
प्रतिक्रिया
The Mappila community
मोपले
काहीच वर्षापूर्वी आपल्या
विचारवंत
संघी हलकटपणा!@#$%
टिपूच्या काळात तलवारीच्या
डोळे मिटून पाठीमागे जयजयकार !@#$%^&*
पुरोगामी विचार सोडला आणि
ढोल
काय पातळीवरची आधुनिक वैद्यकीय
लव्ह जिहाद
>>>मुख्तार अब्बास नक्वी आणि
हे बघा
कपिलमुनी
२ प्रकारचे लव्ह जिहाद असतात
पण त्या चित्रपटातील मुख्य मुद्दा प्रेमजिहाद ह्याबद्दल तुमचे मत
जबरदस्तीने किंवा फसवून केलेले
न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?
न्याय म्हणजे भविष्यात हे
श्रीगुरुजी
लव्ह जिहादचे अजून एक प्रकरण.
बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती.
The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे,
मुविकाका प्रतिसादाचे शीर्षक वाचून तुमचे मध्यपूर्वेतले
The Kerala Story | True or Fake?