Skip to main content

जोकशाही

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 05/05/2023 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री सामान्यांच्या हाती वाणसामानाची जंत्री भाडोत्री बँडवाले अन् भाड्याचे वाजंत्री आकड्यांची कुतरओढ लोक'शाई'ची जोकतंत्री लोकल ला अजून लटकतात ट्रॅफीकमधे अजून अटकतात तरुण नोकरीसाठी भटकतात शेतमाल दलाल अंग झटकतात ह्याची वटवट की त्याची खटपट सिहासन चित्रपट कि राष्ट्रपती लागवट हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री जनतेला पडत नाही फरक. त्यांना रोजचाच झालाय समस्यांचा नरक !!
लेखनविषय:

वाचने 945
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

नक्राश्रूंचा पुर आफवांचा धुर मिडियाची चांदी युट्युबरची मांदियाळी हाय काय नाय काय......