✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चांदणचुरा !

फ — फिझा, Wed, 04/05/2023 - 04:26
चांदणचुरा ! प्रेम एकदाच होतं आयुष्यात ! त्या नंतर उरते ती फक्त जिवंत राहण्यासाठीची धडपड, बस्स ! भरती ओहोटी ने कोरडे झालेले ते डोळे पुसून घ्यायचे , उसवलेलं पुन्हा विणून घ्यायचं , तू नाहीयेस इथे म्हणून चंद्राची समजूत काढायची , झोंबणाऱ्या गार वार्याला मिठीमध्ये सामावून घ्यायचं , बरंच काही सांडलेले पुन्हा गोळा करून चालत राहायचं ! हूर हूर लावणारी ती रोजची निःसंग संघ्याकाळ एकदा पार पडली, कि मग सारं आलबेलच ! या सगळ्या मध्ये भीती वाटत राहते , हा काळोख ग्रासून घेईल का आपला मिणमिणता दिवा ? धस्स होऊन पुन्हा मागे वळून पाहिलं , तर अजूनही चमकत असतो रेतीमध्ये तुझ्या नि माझ्या स्वप्नांचा तो विखुरलेला चांदण चुरा ! -----//फिझा --

प्रतिक्रिया द्या
3443 वाचन

💬 प्रतिसाद (12)

सुरेख

चांदणे संदीप
Wed, 04/05/2023 - 16:10 नवीन
सुंदर रचना. सं - दी - प
  • Log in or register to post comments

चित्रदर्शी

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/06/2023 - 13:20 नवीन
व्वा, सुंदर ! चित्रदर्शी रचना !!! ❤️ अवांतर : पुर्वी मिपावर "वाऱ्याला" असं र ला य जोडून

ऱ्य

लिहिता यायचं ! पुर्वीचं मिपा राहिलं नाही ! आंजावरचं मराठी लेखन असंच बिघडत चाललं आहे !
  • Log in or register to post comments

टंकन करताना वाऱ्याला असंच

फिझा
Wed, 05/10/2023 - 05:02 नवीन
टंकन करताना वाऱ्याला असंच लिहिले होते . पेस्ट करताना ऑटो करेक्ट होऊन बहुतेक वार्याला असं झाला असेल क्षमस्व आणि दखल घेतल्याबद्दल धन्यवाद . मराठी बिघडत चालले नाहीये पण काही technical mistake होऊ शकतात असं दिसत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

चौको भौ...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 04/06/2023 - 13:53 नवीन
आजही वार्या ला वाऱ्या लिहीता येते. यात मिपाचा काय बी दोष नाय.
  • Log in or register to post comments

वार्याला .. इंग्रजी r

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/06/2023 - 17:30 नवीन
वार्याला .. इंग्रजी r हे अक्षर वापरून लिहिलेय ! वार्‍याला ... इंग्रजी R हे अक्षर वापरून लिहिलेय ! पुर्वी कॅपिटल R हे अक्षर वापरून लिहायचो असं आता काय पद्धत असते ? आंजावर सर्वत्र वाऱ्याला असं न दिसता वार्याला असं का दिसतं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

मी मराठी बोर्डावर टंकतो.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 04/06/2023 - 19:36 नवीन
मोबाईल वर ऑप्शन आहे मराठी की बोर्ड, डायरेक्ट मराठीतच टंका. सॅम के संग मराठी के रंग &#128512
  • Log in or register to post comments

बास का कर्नल साहेब ?

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/13/2023 - 13:13 नवीन
बास का कर्नल साहेब ? आम्ही अंकधर आणि मिपाशी एकनिष्ठ आहोत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सुरेख!

Bhakti
गुरुवार, 04/06/2023 - 19:41 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

चांदणचुरा - काय सुंदर शब्द

विंजिनेर
गुरुवार, 04/06/2023 - 23:51 नवीन
चांदणचुरा - काय सुंदर शब्द आहे!
  • Log in or register to post comments

प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर

फिझा
Wed, 05/10/2023 - 05:07 नवीन
प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांच्या एका मुलाखती मध्ये ऐकला होता हा गोड़ शब्द , त्यांचा संदर्भ वेगळा होता तेव्हा , पण मला शब्द भावला खूप ,,,,सो मला हव्या त्या अर्थी मी कवितेमध्ये वापरला .... चांदणचुरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

सुरेख कविता!

तुषार काळभोर
Fri, 04/07/2023 - 07:08 नवीन
काव्य आणि शब्द दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

फार सुंदर

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/11/2023 - 19:09 नवीन
कविता प्रगल्भ झालीये आता. फार सुंदर कल्पना आणि फार सुंदर मांडणी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा