Skip to main content

चांदणचुरा !

लेखक फिझा यांनी बुधवार, 05/04/2023 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणचुरा ! प्रेम एकदाच होतं आयुष्यात ! त्या नंतर उरते ती फक्त जिवंत राहण्यासाठीची धडपड, बस्स ! भरती ओहोटी ने कोरडे झालेले ते डोळे पुसून घ्यायचे , उसवलेलं पुन्हा विणून घ्यायचं , तू नाहीयेस इथे म्हणून चंद्राची समजूत काढायची , झोंबणाऱ्या गार वार्याला मिठीमध्ये सामावून घ्यायचं , बरंच काही सांडलेले पुन्हा गोळा करून चालत राहायचं ! हूर हूर लावणारी ती रोजची निःसंग संघ्याकाळ एकदा पार पडली, कि मग सारं आलबेलच ! या सगळ्या मध्ये भीती वाटत राहते , हा काळोख ग्रासून घेईल का आपला मिणमिणता दिवा ? धस्स होऊन पुन्हा मागे वळून पाहिलं , तर अजूनही चमकत असतो रेतीमध्ये तुझ्या नि माझ्या स्वप्नांचा तो विखुरलेला चांदण चुरा ! -----//फिझा --
लेखनविषय:

वाचने 3495
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुंदर रचना. सं - दी - प

व्वा, सुंदर ! चित्रदर्शी रचना !!! ❤️ अवांतर : पुर्वी मिपावर "वाऱ्याला" असं र ला य जोडून

ऱ्य

लिहिता यायचं ! पुर्वीचं मिपा राहिलं नाही ! आंजावरचं मराठी लेखन असंच बिघडत चाललं आहे !

In reply to by चौथा कोनाडा

टंकन करताना वाऱ्याला असंच लिहिले होते . पेस्ट करताना ऑटो करेक्ट होऊन बहुतेक वार्याला असं झाला असेल क्षमस्व आणि दखल घेतल्याबद्दल धन्यवाद . मराठी बिघडत चालले नाहीये पण काही technical mistake होऊ शकतात असं दिसत आहे .

आजही वार्या ला वाऱ्या लिहीता येते. यात मिपाचा काय बी दोष नाय.

In reply to by कर्नलतपस्वी

वार्याला .. इंग्रजी r हे अक्षर वापरून लिहिलेय ! वार्‍याला ... इंग्रजी R हे अक्षर वापरून लिहिलेय ! पुर्वी कॅपिटल R हे अक्षर वापरून लिहायचो असं आता काय पद्धत असते ? आंजावर सर्वत्र वाऱ्याला असं न दिसता वार्याला असं का दिसतं ?

मोबाईल वर ऑप्शन आहे मराठी की बोर्ड, डायरेक्ट मराठीतच टंका. सॅम के संग मराठी के रंग &#128512

In reply to by विंजिनेर

प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांच्या एका मुलाखती मध्ये ऐकला होता हा गोड़ शब्द , त्यांचा संदर्भ वेगळा होता तेव्हा , पण मला शब्द भावला खूप ,,,,सो मला हव्या त्या अर्थी मी कवितेमध्ये वापरला .... चांदणचुरा

कविता प्रगल्भ झालीये आता. फार सुंदर कल्पना आणि फार सुंदर मांडणी.