Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बंगालच्या वाघिणी

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 12/14/2008 - 01:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28667 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला Mon, 12/15/2008 - 15:54 नवीन

++१

>>>>ह्या वाघिणींना आमचा मानाचा मुजरा. सर्वसाक्षी ह्यांचे मनःपुर्वक आभार ! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 12/15/2008 - 17:13 नवीन

ह्या दोन

ह्या दोन वाघिणीना माझा मानाचा मुजरा. सर्वसाक्षीजी ही माहिती आधी नव्हती. इथे दिल्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. अवांतर : स्वांतंत्र्यासाठी आणि स्वकीयांसाठी त्या दोघीनी हे धाडस केले. त्यांची तुलना इथे चर्चेत फालतु लोकांशी होत आहे हे पाहुन मन कळवळल. :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
च
चेतन Mon, 12/15/2008 - 17:37 नवीन

धन्यवाद

माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद ह्या दोन वाघिणीना माझाही मानाचा मुजरा. अवांतरः कोणी गांधींवर टिप्पणी केली म्हणुन त्याविरोधात क्रांतिकार्‍यांवर टिप्पणी करणे गांधिवादात बसते का?
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Tue, 12/16/2008 - 02:08 नवीन

कोटी कोटी प्रणाम

येथे कर माझे दोन्ही जुळती!! धाडसी, पराक्रमी व मातृभक्त वाघिनींना कोटी कोटी प्रणाम! साक्षीसाहेब, पुन्हा एकदा समयोचित विषयावर हृदयस्पर्षि लेखन करुन या विरांगणांची माहिती दिल्याबद्दल आभार! आपला, (अनेक पराक्रमी स्त्री-पुरुषांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत याची जाण असणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 12/17/2008 - 22:23 नवीन

सर्वसाक्षीजी.

अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे.
या कथेला / प्रसंगाला काहीतरी संदर्भ असेलच. कोणत्यातरी पुस्तकातून अथवा वर्तमानपत्रातून हे लिहिले गेले असेल अशी माझी खात्री आहे. अशा पद्धतीच्या घटनांचे पुस्तक छापले गेले पाहिजे. प्रचार / प्रसार नाही आणि वरुन लोकांना बघा क्रांतिकारकांची काहीच माहिती नाही असेही सांगायचे. कोठेतरी हे थांबायला हवे. क्रांतिकारकाचे यश-अपयश आणि त्यांच्या मर्यादा याही स्पष्ट झाल्या पाहिजे. कृपया हे आवाहन स्विकारावे.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि गुरुवार, 12/18/2008 - 14:33 नवीन

हि चर्चा

हि चर्चा आणि त्यावरिल प्रतिसाद मी आजच वाचलेत. सर्वसाक्षि, ह्या थोर क्रांतिकारांना आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठि शतशः धन्यवाद. काहि मंडळिंनि घेतलेल्या आक्षेपांना माझ्यापरिने उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय. १) क्रांतिकारकांनि महसुल लुटला त्या विषयि आक्षेप. ह्यात क्रांतिकारकांनि काय चुक केले ते मला अजुन निटसे कळले नाहि. मुळात हा महसुल जरि लोकांच्या पक्षि सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाइतुन गोळा झाला असला तरिहि तो त्यांच्यासाठि वापरला जाणार होता का? हा इथे कळिचा मुद्दा आहे. अर्थातच हा सगळा पैसा राणिसरकारांच्या हिंदुस्थानावरिल अक्षय सत्तेसाठि वापरला जाणार होता. गोरगरिब जनतेचि कुठलिहि भलाइ ब्रिटिशांना अपेक्षित नव्हति. अश्या परिस्थितित हा पैसा वापरण्याऐवजि, जनतेकडुन (म्हणजे सुलतानिमुळे अर्धपोटि रहाणार्‍यांकडुन) वर्गणि मागुन शस्त्रास्त्र गोळा करण्याचा तर्क काहि पटला नाहि. वेळ आलि तेन्व्हा सामान्यातल्या सामान्य महिलांनि आपले दागिने सुभाषबाबुंना (सुभाषचंद्र बोस) काढुन दिले होते युध्दखर्चासाठि हे वेगळे सांगायचि गरज नाहि. तात्पर्य इतकेच कि सशस्त्र क्रांतिकारकांना किंवा एकंदरच स्वातंत्र्ययोध्यांना जनतेचा पाठिंबा होता. २) १४ वर्षांच्या मुलिंचे ब्रेनवॉशिंग आणि त्यांचा करुन घेतलेला वापर. (त्या अनुषंगाने त्यांचि तालिबान्यांशि केलि गेलेलि तुलना). रशियन सैन्याला हुसकावुन लावणार्‍या मुजाहिदिनि सैनिकांचे सरासरि वय १४-१६ वर्षे होते हि वस्तुस्थिति आहे (कारण त्यावरच्या वयाचे फारसे लोक शिल्लकच नव्हते). परकिय आक्रमकांविरुध्द लढलेल्या ह्या मुजाहिदिनांना तेथिल जनतेने स्वातंत्र्ययोध्देच मानले. ह्या मुजाहिदिनांपैकि एक गट आपल्या धर्मांध महत्वाकांक्षेपायि आज सगळिकडे दहशतवादि पाठवतोय तेच तालिबान इथल्या उल्लेखात अपेक्षित आहेत अस मी गृहित धरते. तर मुख्य फरक असा कि क्रांतिकारकांच उद्दिष्ट हे भारताला परकिय सत्तेच्या जोखडातुन मुक्त करुन येथिल गोर्-गरिब जनतेच्या भल्यासाठि दक्ष असणार सरकार स्थापन करण्याच होत. कुठल्याहि धर्माला टार्गेट करुन त्यांच वर्चस्व प्रस्थापित करण किंवा इतरांच शिरकाण करण हे नव्हत. ज्या धर्मांध तालिबानि वृत्तिशि तुम्हि त्यांचि तुलना करताय त्यांनि खुद्द त्यांच्याच देशातल्या जनतेवर अत्याचार केलेत उदा. स्त्रीयांना गोषात रहाण्याचि, शिक्षण न घेण्याचि सक्ति, पुरुषांना इस्लामविरोधि गोष्टि न करण्याचि सक्ति उदा. दाढि करण, इस्लामाला मंजुर नसलेला पोषाख न करण, टिव्हि न बघण इत्यादि, अन्य धर्मियांन्नि फक्त विशिष्ट रंगाचे कपडे घालण अशि बरिच उदाहरणे देता येतिल. दुसरा मुद्दा चौदा वर्षाच्या कोवळ्या वयाचा. मुळात त्या काळाचा विचार करताना आजच्या काळातिल परिंमाण वापरण योग्य ठरणार नाहि. त्या काळि चौदा हे तितकस अजाण वय नव्हत. मुलिंचि लग्न करताना त्यांच वय किमान चौदा वर्ष असाव असा आगरकर इत्यादि सुधारकांचा आग्रह होता (त्या ७/८ वर्षांच्या अजाण बालिका असु नयेत हा मुद्दा होता). हे चुक कि बरोबर हा मुद्दा कृपया उपस्थित करु नका मला फक्त त्या काळातिल वस्तुस्थितिकडे लक्ष वेधायच आहे. अस असताना ह्या शिक्षण घेणार्‍या (म्हणजे तुलनेने स्वतंत्र विचार करु शकण्याचि क्षमता असणार्‍या) किशोरिंचे ब्रेन वॉशिंग केले गेले अस म्हणण त्यांच्यावर अन्याय करण वाटत. शिवाय ह्या मुलिंचे क्रांतिकारंकात रुपांतर करणार्‍या निवासि संस्था कुठेहि अस्तित्वात नव्हत्या, इतरवेळि हि सगळि मंडळि आपआपल्या घरात चारचौघांसारखि रहात, त्यामुळे प्रचारकांच्या प्रभावापुढे प्रश्नचिन्ह उभे रहाते. परपुरुषांपुढे वावरण (बोलण वगैरे सोडा) म्हणजे अब्रहमण्यम समजल्या जाणाच्या त्या काळात ह्या मुलिंनि हे धाडस करण्याचि तयारि दर्शवण हिच मुळि माझ्यामते एक क्रांतिकारि घटना आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा