शनिवारी कट्याला यायचे हं, किंबहुना आलेच पाहिजे
तमाम आकाशगंगातील उपस्थित मिपाकर, डुआयडी, संपादक, लेखक, वाचक, प्रतिसादक यांना लेखणीचे स्मरण करून आवाहन करण्यात येत आहे की, मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. या भेटीस सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.
न येऊन कसे चालेल? किंबहूना सदस्यी एक एक या प्रमाणे तमाम सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. घरचे कार्य आहे असे समजून आपण याल अशी मला खात्री आहे. किंबहूना मला तशी आशा आहे. अन ही आशा काही साधी सुधी नाही. कोरोना काळात आम्ही कट्टे वगैरे न करता घरीच होतो. त्यावेळी प्रचंड काम केले. काम काम अन काम. कामामध्येच राम आहे आमचा. आम्हाला काही त्यासाठी मंदीर वगैरेची गरज नाही. मागे नाशिकला कट्टे झाले, ठाण्याला कट्टे झाले. अगदी साग्रसंगीत, वाजत गाजत केले. तसलाच कट्टा ह्या शनिवारी पाताळेश्वरात आयोजित केला आहे. दसरा मेळ्याव्याला आपण जी उपस्थिती दाखवता तसल्या उपस्थितीची दहा हजारपट उपस्थिती या कट्याला हवी.
काही लोकं बोलतात की ठाण्याला कट्टा ठाणेकरांचा, अमरावतीला अमरावतीकरांचा, शिकॅगोला शिकॅगोकरांचा, पुण्याला पुणेकरांचा, वडगाव शेरीला वडगाव शेरीचा वगैरे. मी माझ्या तमाम मिपाकरांना आवाहन करतो की अशा वल्गना जो करतो त्याची जीभ हासडून ठेवा. किंबहुना अशी शिक्षा द्या की तसे बोलणार्याला कोमट पाणीच काय पण साधी हवादेखील गिळता यायला नको. बरोबर ना?
तर हे असे चालायचे. माणसे आहेत तसे चांगली आहेत पण जे काय आहे ते समोर येऊन बोला. आम्ही त्यांना माफ करू. अन त्यांची तशी इच्छाच असेल तर आम्ही त्या त्या गावांतून पायउतार होऊन कट्ट्याच्या गावाला रहायला जाऊ.
तर मंडळी, कट्याला वाटते आहे की तुम्ही यावे, पण आपल्याला पण वाटले पाहिजे ना की आपणही कट्याला जावे! जायचे तर जायलाचा पाहिजे. न जाऊन कसे चालेल? जायलाच पाहिजे. जाणारे हसत जाऊत, न जाणारे रडत राहूत.
ओ तात्या, किती वाजता यायचं
पुण्यात मुसळधार पाऊस
पाताळेश्वर हे गुहेतील मंदीर
हे आवाहन फेसबुक लाईव्ह करावे,
अध्यक्ष महोदय
आज आत्ता तरी ऊन दिसत आहे . हि
कट्टा नेहमीच्या उत्साहात
In reply to कट्टा नेहमीच्या उत्साहात by पाषाणभेद
+१, मस्तच !
पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला
पुढच्या वेळी नक्की
In reply to पुढच्या वेळी नक्की by तर्कवादी
समजू शकतो मी सुद्धा एकदा वाशी
In reply to समजू शकतो मी सुद्धा एकदा वाशी by धनावडे
तुम्ही आम्ही हाडामासाची
In reply to तुम्ही आम्ही हाडामासाची by पाषाणभेद
होतो मी कट्ट्याला, विसरला
In reply to तुम्ही आम्ही हाडामासाची by पाषाणभेद
होतो मी कट्ट्याला, विसरला
In reply to तुम्ही आम्ही हाडामासाची by पाषाणभेद
होतो मी कट्ट्याला, विसरला
In reply to होतो मी कट्ट्याला, विसरला by धनावडे
तुम्हाला नव्हता तो प्रतिसाद.
In reply to तुम्हाला नव्हता तो प्रतिसाद. by पाषाणभेद
@पाभे, पण प्रतिसाद तर्कवादी
In reply to तुम्ही आम्ही हाडामासाची by पाषाणभेद
पूढच्या वेळी या.
In reply to तुम्ही आम्ही हाडामासाची by पाषाणभेद
एवढे लाजायचे काय त्यात?