शनिवारी कट्याला यायचे हं, किंबहुना आलेच पाहिजे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
15 Sep 2022 - 11:45 pm
गाभा: 

तमाम आकाशगंगातील उपस्थित मिपाकर, डुआयडी, संपादक, लेखक, वाचक, प्रतिसादक यांना लेखणीचे स्मरण करून आवाहन करण्यात येत आहे की, मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. या भेटीस सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

न येऊन कसे चालेल? किंबहूना सदस्यी एक एक या प्रमाणे तमाम सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. घरचे कार्य आहे असे समजून आपण याल अशी मला खात्री आहे. किंबहूना मला तशी आशा आहे. अन ही आशा काही साधी सुधी नाही. कोरोना काळात आम्ही कट्टे वगैरे न करता घरीच होतो. त्यावेळी प्रचंड काम केले. काम काम अन काम. कामामध्येच राम आहे आमचा. आम्हाला काही त्यासाठी मंदीर वगैरेची गरज नाही. मागे नाशिकला कट्टे झाले, ठाण्याला कट्टे झाले. अगदी साग्रसंगीत, वाजत गाजत केले. तसलाच कट्टा ह्या शनिवारी पाताळेश्वरात आयोजित केला आहे. दसरा मेळ्याव्याला आपण जी उपस्थिती दाखवता तसल्या उपस्थितीची दहा हजारपट उपस्थिती या कट्याला हवी.

काही लोकं बोलतात की ठाण्याला कट्टा ठाणेकरांचा, अमरावतीला अमरावतीकरांचा, शिकॅगोला शिकॅगोकरांचा, पुण्याला पुणेकरांचा, वडगाव शेरीला वडगाव शेरीचा वगैरे. मी माझ्या तमाम मिपाकरांना आवाहन करतो की अशा वल्गना जो करतो त्याची जीभ हासडून ठेवा. किंबहुना अशी शिक्षा द्या की तसे बोलणार्याला कोमट पाणीच काय पण साधी हवादेखील गिळता यायला नको. बरोबर ना?

तर हे असे चालायचे. माणसे आहेत तसे चांगली आहेत पण जे काय आहे ते समोर येऊन बोला. आम्ही त्यांना माफ करू. अन त्यांची तशी इच्छाच असेल तर आम्ही त्या त्या गावांतून पायउतार होऊन कट्ट्याच्या गावाला रहायला जाऊ.

तर मंडळी, कट्याला वाटते आहे की तुम्ही यावे, पण आपल्याला पण वाटले पाहिजे ना की आपणही कट्याला जावे! जायचे तर जायलाचा पाहिजे. न जाऊन कसे चालेल? जायलाच पाहिजे. जाणारे हसत जाऊत, न जाणारे रडत राहूत.

प्रतिक्रिया

ओ तात्या, किती वाजता यायचं आहे तिकडे ॽ एकटे लोकं चालतील काय? छत्री, रेनकोट, नदीला पूर आला तर बारकी बोट सगळं बरोबर ठेवावं लागेल काय?

अनिकेत वैद्य's picture

16 Sep 2022 - 9:38 am | अनिकेत वैद्य

सध्याचा मुसळधार पावसाचा अंदाज बघता, खूप पाऊस असल्यास बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात भेटू शकतो का?
तेथे बुकिंग खिडकीजवळ मोकळी जागा असून सदर ठिकाणी छप्पर असल्याने पावसाचा त्रास होणार नाही.
बालगंधर्व रंगमंदिर हे सार्वजनिक ठिकाण असल्याने तेथे कितीही वेळ गप्पा मारू शकतो.
आवारात सशुल्क पार्किंग उपलब्ध आहे.

आयोजकांनी ह्या सूचनेचा विचार करावा.

पाषाणभेद's picture

16 Sep 2022 - 10:05 am | पाषाणभेद

पाताळेश्वर हे गुहेतील मंदीर आहे. मंदीरात छप्पर व आसरा मिळेलच. बाकी पार्कींग तर सगळीकडेच वनवा आहे.
पाताळेश्वर येथेच सकाळी १० च्या सुमारास (आधीच) पोहोचा. नंतर काय ते ठरवता येईल.

अन बालगंधर्व मध्ये जास्त वेळ अन गृपला थांबू देणार नाही. आपल्यासारखा तेथे थांबण्याचा बरेच जण विचार करत असतील त्यामुळे तेथील कर्मचार्यांना आपल्यासारखा भटक्यांचा अनुभव असेल.

हे आवाहन फेसबुक लाईव्ह करावे, आणि 'अबब मज्जा' वाहिनीवर बारा तासांचा काऊंटर लावावा अशी आपली एक सूचना!

श्री मोदीजींच्या वाढदिवशी मिपाकट्टा हाही अपूर्व योगायोग आहे, येण्याचा प्रयत्न करणार!

उद्या पूर्वार्धात पाऊस अत्यल्प असेल असा हवामान अंदाज आहे.

श्रीरंग_जोशी's picture

17 Sep 2022 - 7:45 am | श्रीरंग_जोशी

अध्यक्ष महोदय, कट्ट्याला खूप सार्‍या शुभेच्छा!!
कट्ट्याचे नियोजन अभ्यासपूर्वक केल्याचे जाणवत आहे.
कट्ट्याचे तपशीलवार वार्तांकन व सिंहावलोकन मिपाच्या पटलावर ठेवले जावे अशी नम्र विनंती सर्व कट्टेकरींना करतो व आपली रजा घेतो.
धन्यवाद, अध्यक्ष महोदय.

बिपीन सुरेश सांगळे's picture

17 Sep 2022 - 8:05 am | बिपीन सुरेश सांगळे

आज आत्ता तरी ऊन दिसत आहे . हि निसर्गाची कृपाच म्हणायची .

पाषाणभेद's picture

17 Sep 2022 - 2:23 pm | पाषाणभेद

कट्टा नेहमीच्या उत्साहात साजरा झाला आहे. पंधरा मिपाकर मालकांसहीत उपस्थित होते. वृत्तलेखन लवकरच करतो व फोटो टाकतो आहे.

चौथा कोनाडा's picture

17 Sep 2022 - 3:35 pm | चौथा कोनाडा

+१
मस्तच !

तर्कवादी's picture

20 Sep 2022 - 11:13 am | तर्कवादी

मी मिपावर अजून अगदीच नवीन आहे .. ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय .. त्यामुळे या कट्ट्याला यायची हिंमत झाली नाही. माफी असावी
पुढच्या वेळी धीर एकवटून येईन :)

समजू शकतो मी सुद्धा एकदा वाशी च्या कट्ट्याला , जिथे कट्टा होता तिथे जाऊन कट्ट्यामध्ये सहभागी झालो नव्हतो.

पाषाणभेद's picture

20 Sep 2022 - 5:54 pm | पाषाणभेद

तुम्ही आम्ही हाडामासाची माणसेच आहोत. एवढे लाजायचे काय त्यात? किंबहुना, तुम्ही आला असता तर तुमचा बुजरेपणा नक्कीच गेला असता.
पुढच्या कट्यात नक्की सामील व्हा.

धनावडे's picture

20 Sep 2022 - 6:56 pm | धनावडे
धनावडे's picture

20 Sep 2022 - 6:56 pm | धनावडे
धनावडे's picture

20 Sep 2022 - 6:56 pm | धनावडे

होतो मी कट्ट्याला, विसरला वाटत???

पाषाणभेद's picture

21 Sep 2022 - 10:56 pm | पाषाणभेद

तुम्हाला नव्हता तो प्रतिसाद. तर्कवादींना होता.

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2022 - 8:36 am | चौथा कोनाडा

@पाभे, पण प्रतिसाद तर्कवादी ऐवजी धनावडेला पडला, म्हणून गैरसमज झाला असावा.

@ की खूण लक्षात ठेवून प्रतिसादात दिल्यास गोंधळ उडणार नाही.

धनावडे तुम्हाला कट्ट्याला भेटून मस्त वाटलं. वेळे अभावी जास्त बोलता आले नाही!

पाषाणभेद's picture

21 Sep 2022 - 10:57 pm | पाषाणभेद

पूढच्या वेळी या.

तर्कवादी's picture

22 Sep 2022 - 11:34 am | तर्कवादी

एवढे लाजायचे काय त्यात? किंबहुना, तुम्ही आला असता तर तुमचा बुजरेपणा नक्कीच गेला असता.

खरंय तुमचं म्हणणं..

पुढच्या कट्यात नक्की सामील व्हा.

हो. अगदी नक्की.
धन्यवाद