मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग
4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर
नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे. केवळ मानसिक आरोग्याचे समस्याग्रस्त नाही तर आपण सर्व. विशेष समस्याग्रस्त (जसे ऑटीझम, मेंटल रिटार्डेड किंवा डाऊन्स सिंड्रोम असलेल्या व्यक्ती) ह्यांच्यापासून अगदी युवा विद्यार्थी आणि प्रत्येकासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. ह्या सायकल प्रवासामध्ये हा विषय व्यापक समाजापुढे ठेवला जाईल. मानसिक रोग, मानसिक समस्या आणि मानसिक विकलांगता असलेल्यांच्या समस्या ह्याबद्दल जागरूकता असणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर अशा व्यक्तींना आवश्यक ती मदत दिली जाऊ शकते. सर्वसामान्य लोक- शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्व ह्यांच्यासोबत संवादातून ह्या सायकल प्रवासात ह्याबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा विषय सर्वांचा आहे. सायकलिस्ट सामाजिक संस्था, समूह व लोकांसोबत बोलेल व स्थानिक पातळीवरील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तो साधी- सिंगल गेअर एसएलआर सायकल वापरेल. त्यामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे की, प्रत्येक जण स्वत:ची क्षमता वापरून उपलब्ध साधनाद्वारे अशी गोष्ट करू शकतो.
मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सायकलिंग
मानसिक भलायकेची जागृताय करपा खातीर सायकल चलोवप
ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಜಾಗೃತಿಗಾಗಿ ಸೈಕ್ಲಿಂಗ್
మానసిక ఆరోగ్య అవగాహన కోసం సైక్లింగ్
हा रूट का?
कारण मुख्य प्रवाहात नसलेल्यांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. सुरुवातीला सायकलिस्टने मुंबईमधील संस्थांसह राईड सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु महाराष्ट्रातील शहरांमध्ये ह्याबद्दल थोडी तरी जागरूकता आहे. त्यामुळे सर्वाधिक वंचित व दूर राहिलेला प्रदेश का न घ्यावा असा विचार केला. त्यासह ह्यातील मुख्य मॅसेज कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाणे, आपल्या मानलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाणे आणि अपरिचिताबद्दल संवेदनशील होणे हा आहे. त्यामुळे हा सायकल प्रवास कोंकणातील कुडाळमध्ये सुरू होईल व नंतर गोवा, कर्नाटक, तेलंगणा व पुन: महाराष्ट्राच्या दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा त्यात समावेश असेल.
जर आपल्याला कुडाळ- गोवा- बेळगावी- बागलकोट- कोल्हार- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर ह्या रूटवर काम करणारी संस्था माहिती असेल किंवा आपले कोणी परिचित ह्या रूटवर असतील तर हा मॅसेज त्यांच्यासोबत शेअर करू शकता. ह्या प्रवासाची सुरुवात २४ सप्टेंबरला होईल आणि तो साधारण १४ ऑक्टोबरला नागपूरला संपेल.
सायकलिस्टविषयी
निरंजन वेलणकर, ३७ ह्याने लदाख़ आणि स्पीतिसह अनेक सोलो सायकल मोहिमा केल्या आहेत. त्याने महाराष्ट्रामध्ये आरोग्य व एचआयव्हीबद्दल जागरूकतेसाठी आणि योग व ध्यानाच्या प्रसारासाठीही सायकल प्रवास केले आहेत. त्याचा ब्लॉग- http://niranjan-vichar.blogspot.com/2022/09/solo-cycling-for-mental-health-awareness.html 09422108376 niranjanwelankar@gmail.com
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सायकलिंग अवघड आहे.
जुन्या सायकल
दीड वर्षांपूर्वी ७, ५००
स्तुत्य उपक्रम
सर्वांना धन्यवाद!
अपडेट
अपडेट
अपडेट