✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ५)

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 07/21/2022 - 23:04  ·  लेख
लेख
द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन! या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली. एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16680 वाचन

💬 प्रतिसाद (136)

प्रतिक्रिया

मी तर पी. चिदंबरम ह्यांना

आग्या१९९०
Mon, 07/25/2022 - 14:39 नवीन
मी तर पी. चिदंबरम ह्यांना ह्याबाबतीत मानतो. केंद्राने कितीही चौकश्या मागे लावल्या तरी सरकारच्या चुका दाखवण्यात कुठेही कमी पडत नाहीत. मुख्य म्हणजे त्यांचे मुद्दे खोडून काढायला एकही नेता बीजेपीकडे नसावा ह्याचे आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

लाचार विरोधीपक्ष... ED च्या

सुखी
Mon, 07/25/2022 - 07:30 नवीन
लाचार विरोधीपक्ष... ED च्या भीतीपोटी लपुन बसलेत... जे काम करायला हवं ते पण करेनासे झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

शिवसैनिंकांचा रोष पाहून सुहास

अमरेंद्र बाहुबली
Sun, 07/24/2022 - 20:58 नवीन
शिवसैनिंकांचा रोष पाहून सुहास कांदेंना काढावा लागला पळ. https://mmkmedia.in/शिंदेगटाच्या-आ-कांदेंना/amp/
  • Log in or register to post comments

काळजावर दगड ठेऊन शिंदेंना

अमरेंद्र बाहुबली
Sun, 07/24/2022 - 21:00 नवीन
काळजावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यंमंत्री केलं. - चं. पाटील https://berartimes.com/153380/ भाजपची सत्तेची हाव किती हे ह्या वाक्यातून कळते. शिंदेंना स्वाभिमान असेल तर ते पद सोडायला हवे त्यांनी.
  • Log in or register to post comments

सत्तेत जे नसतात त्यांना ही

सुखी
Mon, 07/25/2022 - 07:24 नवीन
सत्तेत जे नसतात त्यांना ही हाव असतेच... सत्तेत जे असतात त्यांना अजून जास्त हवच असत. केजरवालांना हाव नसती तर पंजाब मध्ये कशाला लढले असते... सध्या हाव नसलेला एकमेव पक्ष काँग्रेस आहे असं एकूण त्यांच्या वागण्यावरून वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

परत तेच

श्रीगुरुजी
Mon, 07/25/2022 - 14:33 नवीन
परत तेच https://www.loksatta.com/mumbai/roads-in-aarey-are-closed-trees-are-being-cut-to-transport-metro-3-coaches-mumbai-print-news-msr-87-3038654/
  • Log in or register to post comments

वृक्ष तोड आणि छाटणी....

मुक्त विहारि
Mon, 07/25/2022 - 17:06 नवीन
ह्यात फरक आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आजचं हे व्यंगचित्रही भयानक

अमरेंद्र बाहुबली
Mon, 07/25/2022 - 14:56 नवीन
आजचं हे व्यंगचित्रही भयानक आवडलंय. https://ibb.co/28h15hc
  • Log in or register to post comments

आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून!

मुक्त विहारि
Mon, 07/25/2022 - 17:03 नवीन
https://www.lokmat.com/nashik/adityas-bridge-was-carried-away-and-shinde-came-running-for-nashik-a601/amp/
  • Log in or register to post comments

काका मागे तुम्हा पुणे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 07/25/2022 - 17:19 नवीन
काका मागे तुम्हा पुणे पालिकेतील भ्रष्टाचाराची लिंक टाकली होती त्यावर राज्य सरतारला दोषी धरले होते, नंतर कुणीतरी मिपाकराने तुम्हाला आठवण करून दिली की पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. नंतर तुम्हावत्या भ्रष्टाचारावर अवाक्षरही काढलं नाही, असं का?, पुढे त्या भ्रष्टांवर कारवाई झाली का? काही अपडेट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे?

मुक्त विहारि
Mon, 07/25/2022 - 19:53 नवीन
स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? काँग्रेस नेत्यांना नोटिसा का पाठवल्या आहेत? https://www.loksatta.com/explained/explained-what-is-the-controversy-over-smriti-irani-daughter-sgy-87-3038898/ स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना नोटिसा बजावल्या आहेत. आपल्या मुलीवर निराधार आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे. जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही आणि आरोप मागे घेतले नाहीत तर दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू करु असा इशारा त्यांनी दिला आहे.
  • Log in or register to post comments

हेया पेक्षा मोदींना सांगून

अमरेंद्र बाहुबली
Mon, 07/25/2022 - 20:02 नवीन
हेया पेक्षा मोदींना सांगून ईडी सोडू अशी धमकी दिली असती तरी चाललं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शपथविधी होऊन २५ दिवस

श्रीगुरुजी
Mon, 07/25/2022 - 21:26 नवीन
शपथविधी होऊन २५ दिवस उलटल्यानंतरसुद्धा मंत्रीमंडळ स्थापन झालेले नाही. मला जरा वेगळीच शंका येतीये. शिंदे गटाची बाजू काहीशी दुर्बळ आहे हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले असावे. अश्या परिस्थितीत शिंदेनी राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवट आणण्याआधी आरे, बुलेट ट्रेन सारखे स्थगित प्रकल्प पुनरूज्जीवित करावे, हव्या असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करून आपल्याला हव्या त्या ठिकाणी त्यांना आणावे, नको असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी, प्रशासनात हवी ती माणसे हव्या त्या जागी आणावी, काही विरोधकांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून द्यावे, विरोधी पक्षात जमेल तेवढी फूट पाडावी या दृष्टीने काम सुरू आहे असं दिसतंय. एकदा हे झालं की राष्ट्रपती राजवट आली तरी चालेल, हा हेतू असावा. म्हणजे थोडक्यात पोल पोझिशनवर येऊन मग राष्ट्रपती राजवट आणावी या दिशेने काम सुरू असावे.
  • Log in or register to post comments

हे असे झाले

अनन्त अवधुत
Mon, 07/25/2022 - 22:01 नवीन
तर भाजपला मोठा फटका पडेल. शिंदे कदाचित स्वगृही परत जातील आणि शिंदेंना भाजपने फसवले असे चित्र उभे केले जाईल. त्यात भाजप सगळी सहानूभुती गमावेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिंदे परत सेनेत जाणार नाहीत

श्रीगुरुजी
Mon, 07/25/2022 - 22:04 नवीन
शिंदे परत सेनेत जाणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात येत असावी. अश्या परिस्थितीत शिंदे गटातील बहुसंख्यांना भाजपत सामावून घेतले जाईल. न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार टिकू शकले नाही हे अधोरेखित केले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

नेपाळ-भारत सीमेजवळ दोन किलो युरेनियम जप्त!

निनाद
Tue, 07/26/2022 - 07:19 नवीन
तस्करांनी बिहारच्या अररिया जिल्ह्यातील सीमावर्ती शहर जोगबानी मार्गे सीमा ओलांडून भारतात जाण्याची योजना आखली होती. नेपाळमधील विराटनगर येथील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या अटक तस्करांच्या ताब्यात दोन किलो युरेनियम आणि इतर वस्तू सापडल्या. सीमा ओलांडून भारतात येण्याच्या उद्देशाने ते काठमांडूहून निघाले. जप्त करण्यात आलेल्या युरेनियमची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. मोरंगचे एसपी शांतीराज कोईराला यांनी नेपाळमधील युरेनियमच्या अटकेची आणि जप्तीची पुष्टी केली. ते म्हणाले की, तस्कर मुक्कामी असलेल्या विराटनगर येथील दोन हॉटेलमधून सुमारे दोन किलो वजनाचे युरेनियम आणि इतर संशयित साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने पुष्टी केली की तस्कर साहित्यासह भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. हा फार मोठा धोका वाटतो. युरेनियमचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जातो.
  1. युरेनियम मुळात यांच्या हाती आलेच कसे?
  2. याचा वापर करून डर्टी बॉम्ब तयार केले गेले तर?
  • Log in or register to post comments

झारखंडमध्ये लव्ह जिहाद

निनाद
Tue, 07/26/2022 - 07:23 नवीन
झारखंडमध्ये लव्ह जिहादची एक नवीन घटना. मो. नईम मियाँ याने सुरुवातीला एका हिंदू महिलेला त्याचा धर्म लपवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरुणीला संदीप सिंग असे नाव भासवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. नईम मियाँ याने महिलेच्या अल्पवयीन बहिणीवरही बलात्कार केला. इतकेच नाही तर आणि हे कृत्य रेकॉर्ड केले आणि आता तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आहे. समाजाने या बाबतीत सावधान राहणे फार आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

फेसबूक वर वचलेली बातमी

विवेकपटाईत
Tue, 07/26/2022 - 10:32 नवीन
फेसबूक वर वचलेली बातमी "मुंबईत २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ६०१ होती. २०१९ मध्ये यात घट होऊन ५ हजार ८४९ झाली. २०२० मध्ये यात आणखी घट होऊन ५ हजार ६३३ मृत्यू नोंदले गेले. जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या काळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. या काळात १७ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून वरील बाब निदर्शनास आली असल्याचे वृत्तात नमूद केले आहे. " केसेस वाढण्याचे कारण काय असावे। माझ्या मते करोना उपचारसाठी वापरलेली चुकिची औषधि। ज्यांच्या हृदयगति वर परिणाम झाला।
  • Log in or register to post comments

काही मुद्दे

जेम्स वांड
Tue, 07/26/2022 - 11:27 नवीन
१. फेसबूक वर वचलेली बातमी - अर्धा उत्साह इथेच मावळतो २. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून वरील बाब निदर्शनास आली असल्याचे वृत्तात नमूद केले आहे. - माहितीच्या अधिकारात ही माहिती कशी अन कुठून मागवता येईल ? ३. केसेस वाढण्याचे कारण काय असावे। माझ्या मते करोना उपचारसाठी वापरलेली चुकिची औषधि। ज्यांच्या हृदयगति वर परिणाम झाला। तुमच्या मताला आधार काय ? दोनचार वैयक्तिक एनेकडोट्स सोडून काही पियर रिव्युड स्टडीज असल्या तर विदा द्यावा ! मुळात तुम्ही सरकारी नोकर आहात ना ? मेडिकल सायन्सला हलक्यात घ्यायला त्याचं किती नॉलेज आहे तुमच्याकडे ? संपादक मंडळ, वरील प्रतिसादाच्या विरुद्ध माझी हरकत आहे, एकतर हे महाशय वैद्यकीय क्षेत्रातील नाहीत किंवा स्वतः वैद्य/ डॉक्टर इत्यादी पण काहीच नाहीत, तरीही दोनचार वैयक्तिक उदाहरणे पाहून खुशाल वैद्यकीय मते देत आहेत, हे वेजबाबदारच नाही तर कोणाच्या जीवावर बेतणारे पण ठरू शकते, तरीही कृपया इथे लक्ष द्यावे ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

+१

कॉमी
Tue, 07/26/2022 - 11:51 नवीन
अनेकवार सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

एकनाथ शिंदे सुध्दा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 07/26/2022 - 10:37 नवीन
एकनाथ शिंदे सुध्दा फडणवींसांप्रमाणे कुचकामी मुख्यमंत्री सिध्द होत आहेत, अनेक प्रशासकीय कामो रखडलीत.
  • Log in or register to post comments

मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण

मुक्त विहारि
Tue, 07/26/2022 - 16:17 नवीन
मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण, 200 जणांचा जमाव आला शाळेवर चालून, 35 जणांविरोधात FIR https://www.tv9marathi.com/national/teacher-beaten-up-for-making-girl-angry-in-class-community-stripped-in-school-fir-against-35-people-au179-766531.html पश्चिम बंगालमधील (W. Bangal)दक्षिण दिनाजपूर येथे हा प्रकार घडला आहे. ही मुलगी अल्पसंख्याक समाजातील होती, असे सांगण्यात येते आहे...... ---------
  • Log in or register to post comments

ह्या प्रकरणातली मुलगी व

डँबिस००७
Tue, 07/26/2022 - 17:14 नवीन
ह्या प्रकरणातली मुलगी व शिक्षीकेला निवस्र करणारे २०० हे शांतीदूत समाजाचे होते. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवुन घ्यायला नकार दिला होता, पण हिंदू समाजाने रस्ता रोको सुरु केल्यावर नाईलाज झाला व तक्रार नोंदवुन घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे असंच चालू राहीलं तर

शाम भागवत
Tue, 07/26/2022 - 18:02 नवीन
हे असंच चालू राहीलं तर पुढच्या निवडणुकात बंगालात भाजपाचा मुख्यमंत्री नक्की. बंगाली लोकांना थोडासा त्रास सहन करायला लागेल पण त्याला इलाज नाही. ध्रृविकरणात असं होतच असतं. आले नियतीच्या मना…..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

बंगाली लोक आगीतून फूफाट्यात

अमरेंद्र बाहुबली
Tue, 07/26/2022 - 18:29 नवीन
बंगाली लोक आगीतून फूफाट्यात जातील मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

लिंक पाठवू शकाल का?

मुक्त विहारि
Tue, 07/26/2022 - 17:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

उद्धव ठाकरेंची खास मुलाखत

प्रसाद_१९८२
Tue, 07/26/2022 - 17:34 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद....

मुक्त विहारि
Tue, 07/26/2022 - 17:39 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

सहमत

यश राज
Tue, 07/26/2022 - 17:30 नवीन
आजच्या मौखिक जत्रेत खालील वाक्य कहर म्हणजे भलतच TRP खेचणारे होते ब्वा " सगळ्यात मोठं टेन्शन होते की डास चावला, मुंगी चावली की खाजवायच कसं??" लयच भारी.. अशी ही खाजवा खाजगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

मध्य॔तरी आमच्या घरी, शास्त्र आणि कला, यांचा वापर होत होता

मुक्त विहारि
Tue, 07/26/2022 - 17:51 नवीन
म्हणजे, स्वयंपाक हे शास्त्र असेल तर, तो पचवणे ही एक कला आहे. केर काढणे हे शास्त्र असेल तर, केरसुणी पकडणे, ही एक कला आहे ... इत्यादी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

@ संपादक मंडळ, महाराष्ट्राचे

अमरेंद्र बाहुबली
Tue, 07/26/2022 - 18:32 नवीन
@ संपादक मंडळ, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री ठाकरो साहेब व श्री राऊत साहेब ह्यांना प्रसाद १९८२ हा आयडी द्वेषातून विदूषक म्हणतोय ना खाली तशी लिंकही दिलीय. कृपया संबंधीत आयडीवर योग्य ता कारवाई करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्

मुक्त विहारि
Tue, 07/26/2022 - 17:35 नवीन
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्र दाखल https://www.esakal.com/desh/farooq-abdullah-chargesheeted-in-money-laundering-case-npk83 आरोप सिद्ध झाला तर, दोषींवर कारवाई व्हायलाच हवी....
  • Log in or register to post comments

राणे आता मुलाखतीत जोरदार

श्रीगुरुजी
Tue, 07/26/2022 - 17:46 नवीन
राणे आता मुलाखतीत जोरदार फटकेबाजी करताहेत.
  • Log in or register to post comments

हा हा हा हा

जेम्स वांड
Tue, 07/26/2022 - 18:32 नवीन
राणे कुटुंबाला कोकणाबाहेर, विशेषतः सिंधुदुर्गच्या बाहेर व त्यातसुद्धा कुडाळ, कणकवली व मालवण हे २-३ तालुके सोडले तर कोठेही अस्तित्व नाही. एका अर्थाने राणे हा राज्यपातळीवर तर सोडाच, एका जिल्हा पातळीवरचा सुद्धा नेता नाही. राणे कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुंडगिरी, माज, ब्राह्मणविरोधी कारवाया, सत्तेसाठीची वखवख व आक्रमक स्वभाव भाजपला नक्कीच गोत्यात आणेल. कॉस्ट-बेनेफिट विश्लेषण केले तर राणेमुळे होणार्‍या फायद्याच्या तुलनेत होणारे तोटे प्रचंड आहेत.
वरील परिच्छेद हा गुरुजींच्याच एका जुन्या प्रतिसादातील आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुंडगिरी, माज, ब्राह्मणविरोधी कारवाया, सत्तेसाठीची वखवख व आक्रमक स्वभाव वरील सगळे गुण शुचिर्भूत होऊन आता फटकेबाजी झालेत म्हणायचं का गुरुजी ?? २-३ तालुके प्रभाव असणारा नेता अन कुटुंबिय असे आपणच म्हणाले होते असे ही दिसते आहे.... तेव्हा "राणे हा जिल्हा पातळी नेता ही नाही" आता "राणे फटकेबाजी करताहेत बस क्या ?" तुम्ही म्हणे विधानसभेत भाजपला मतदान करणार नाही घोषित केले आहेत ? अरे हो, खफवर लिहायचे राहिले होते आता तो नारायण पासून ते नारायणराव झालेले राणे जी

मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री आहेत न ?

  • Log in or register to post comments

जागतीक आर्थिक मंदीत भारताची स्थिती

डँबिस००७
Tue, 07/26/2022 - 22:04 नवीन
विश्व प्रसिद्ध ब्लुंबर्ग ने येऊ घातलेल्या जागतीक आर्थिक मंदीत जगातील महत्वाच्या देशांची संभाव्य स्थितीवर आपला अहवाल सादर केलेला आहे. ब्लुंबर्गच्या अश्या अहवालाला जगात खुप महत्व दिल जात. ब्लुंबर्गच्या अहवाला प्रमाणे भारताला जागतीक आर्थिक मंदीची झळ बसण्याची शक्यता ०% आहे. भक्कम परकीय वित्तीय गंगाजळी व रीझर्व बँकेच्या कठोर व योग्य नियोजनामुळेच हे शक्य आहे अस ब्लुंबर्गच म्हणण आहे. https://youtu.be/9X_SSPFtPPA
  • Log in or register to post comments

हायला .. मोदींनी ब्लुंबर्ग पण

सुक्या
Tue, 07/26/2022 - 22:30 नवीन
हायला .. मोदींनी ब्लुंबर्ग पण विकत घेतले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा