Skip to main content

शशक'२०२२ - बुडबुडा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या चिंतांनो, त्राग्यांनो, तणावांनो, भित्यांनो.. रोज थोडंथोडं नका छळू. तुमची युनिटी करा आडरानात गाठून मुंडी मुरगाळा विषय संपवा सुटकेची एकही आशा ठेवू नका इकडे पहा मी इथे ह्या बुडबुड्यात आहे या आणि पहा जिवंतपणाची कसलीही सळसळ तुम्हाला दिसणार नाही. हा बुडबुडा आपोआप फुटायची वाट बघत मी पडून आहे.. मी स्वतःहून तो फोडणार नाही तेवढी ऊर्जाही माझ्यात नाही आणि ज्या रस्त्याचा शेवट माहित नाही, त्या रस्त्याने कधी गेलो नाही.. म्हणून तुम्ही सगळे मिळून या मला उचलून उघड्या जगात फेका दोन दिवसांच्यावर मी टिकणार नाही शब्द देतो..! बाकी कसाही असलो तरी, मी शब्दाला जागणारा माणूसाय..! कारण शब्दांशिवाय दुसरं काही आलंच नाही मला..

वाचने 4005
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

-१ शतशब्द'कथा' स्पर्धेत कवितेचं प्रयोजन कळालं नाही. मुक्तक ठीक. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

मुक्तकच वाटतय... "हे स्वर्गस्थ शक्तींनो" च्या चालीत म्हणुन बघा मज्जा येते, लै भारी वाटतं, कदाचित एकपात्री कथा म्हणता येईल पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

"हे स्वर्गस्थ शक्तींनो" च्या चालीत म्हणुन बघा मज्जा येते, लै भारी वाटतं, >> अगदी !!

माझ काही चुकले का? प्रत्येक महान नाटकात अशी गद्य/पद्य आहेत. श. श. क. शत शब्द कथा-कविता. मला अत्यंत आवडले.