शशक'२०२२ - बुडबुडा
सगळ्या चिंतांनो, त्राग्यांनो, तणावांनो, भित्यांनो..
रोज थोडंथोडं नका छळू.
तुमची युनिटी करा
आडरानात गाठून मुंडी मुरगाळा
विषय संपवा
सुटकेची एकही आशा ठेवू नका
इकडे पहा
मी इथे ह्या बुडबुड्यात आहे
या आणि पहा
जिवंतपणाची कसलीही सळसळ तुम्हाला दिसणार नाही.
हा बुडबुडा आपोआप फुटायची वाट बघत मी पडून
आहे..
मी स्वतःहून तो फोडणार नाही
तेवढी ऊर्जाही माझ्यात नाही
आणि ज्या रस्त्याचा शेवट माहित नाही, त्या रस्त्याने कधी गेलो नाही..
म्हणून तुम्ही सगळे मिळून या
मला उचलून उघड्या जगात फेका
दोन दिवसांच्यावर मी टिकणार नाही
शब्द देतो..!
बाकी कसाही असलो तरी, मी शब्दाला जागणारा
माणूसाय..!
कारण शब्दांशिवाय दुसरं काही आलंच नाही मला..
+१
-१
In reply to -१ by चांदणे संदीप
कविता नाहीये / नसावी
In reply to कविता नाहीये / नसावी by ज्ञानोबाचे पैजार
प्रतिसादाशी सहमत
:(
शशक