गाभा:
इंटरनेटवरही आंबेडकर उपेक्षितच... मटाची बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3798972.cms येथेटिचकी मारा. आणि आपली मते कळवा.
आज ६ डिसेंबर त्यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम !

प्रतिक्रिया
6 Dec 2008 - 2:42 pm | कलंत्री
महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे.
आंबेडकरांचे महत्व आंतरजालाव्रर पानाची संख्येवरुन नव्हे तर गुणवत्तेवरुन ठरेल. माझ्या मते ती अबाधित आहे.
6 Dec 2008 - 4:24 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे.
आंबेडकरांच्या स्मृतींना प्रणाम.
प्रकाश घाटपांडे
7 Dec 2008 - 1:47 pm | विकि
महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे.हे तुमचे वाक्य सर्व काही सांगुन जाते.
6 Dec 2008 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे.
सहमत आहे ! आंबेडकरांच्या स्मृतींना प्रणाम.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
6 Dec 2008 - 7:22 pm | वेताळ
सहमत.
बाबासाहेबाच्या स्मृतीना प्रणाम
वेताळ
6 Dec 2008 - 7:45 pm | विकास
सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन!
म.टा. मधील बातमी वाचून स्वतः बाबासाहेबांना पण हसावे का रडावे असा प्रश्न पडला असता. महात्मा गांधी म्हणले की फक्त महात्मा गांधीच नाही तर त्यांच्या नावाने असलेल्या सर्व गोष्टी संकलीत होऊन त्या शोधात येतात. छत्रपती शिवाजी म्हणले की टर्मिनस पासून विमानतळापर्यंत सर्व येते.
हे असले काही तरी वृत्तपत्रीय संशोधन म्हणत करणे याला काय अर्थ आहे? आणि त्यावरून सनसनाटी मथळे देत नकळत सामाजीक विषमता आहे असे म्हणत दरी निर्माण करणे तर अनैतिक आहे. या पत्रकारास खरेच संशोधन करायचे असेल तर त्याने किती चांगल्या वेबसाईट्स आहेत, त्यावरील अभ्यासपूर्ण काय आहे वगैरे शोधून मग लिहावे. थोडा प्रयत्न फक्त www.ambedkar.org बाबत सांगताना केला आहे. आणि त्याबद्दल पत्रकारास धन्यवाद! कारण कालच मी ती आंबेडकरांची अधिकृत साईट असे गृहीत धरून पहात होतो...
महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे.
हे कलंत्रीसाहेबांचे वाक्य एकदम मान्य!
6 Dec 2008 - 8:02 pm | भास्कर केन्डे
बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
महापुरुषांना आपण त्यांच्या अनुयायापर्यंतच सिमीत ठेवतो म्हणून असे घडत असावे.
एकदम पटले. महापुरुषांच्या अनुयायांना सुद्धा केवळ हेच हवे का असा प्रश्न कित्येकदा पडतो. आमचे बाबासाहेब, आमचे बाबासाहेब असा रिपब्लिकन कडबोळ्यांचा घोष असो वा आमचे गांधी, आमचे गांधी हा काँग्रेसी जनांचा नाद हे मुळात चूकच आहेत. महापुरुष हे सगळ्या देशाचे असतात व सगळी जनता त्यांना आपले मानत असते.
आपला,
(बाबासाहेबांच्या स्मृतीसमोर नतमस्तक) भास्कर
आम्ही येथे वसतो.