✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयुष्य

V — VRINDA MOGHE, Tue, 12/28/2021 - 17:22
डिसेंबर हा आला, चालला जाता हाती काय उरेल ? , तारखा वार ते तसेच असतील, आयुष्यही हे असेच सरेल !! अशीच वर्षे येतील जातील, एकवीस गेले बावीस येईल, आयुष्य असेच वाहत राहील न कळे कुठे मुक्कामी नेईल !! कशास हवे मनावर ओझे, नकोशा चिंतांचे वाहणे, आयुष्य सरण्याआधी आपली पुण्याची ती झोळी भरणे !! आपुल्या न हाती काही, तरीही फुकाचे 'मी' मीपण, आनंद वाटत जगताना , मनात असावे ईश स्मरण !! -वृंदा

प्रतिक्रिया द्या
2094 वाचन

💬 प्रतिसाद (5)

कल्पना चांगल्या आहेत. काही

राघव
Tue, 12/28/2021 - 19:44 नवीन
कल्पना चांगल्या आहेत. काही गोष्टी सुचवाव्याशा - - लयबद्ध आणि मुक्तछंद असा गोंधळ झालेला वाटला: चुभूद्याघ्या. - तुम्ही लयबद्ध लिहू शकाल चांगले. फक्त मीटर थोडे सांभाळून, किंचित शब्दांचा फेरफार करून खूप फरक पडेल. जसे - एक जाऊनी दुसरे येणे.. वर्षे येती.. तशीच जाती.. आयुष्याचा याग मागतो, अनुभवांच्या यज्ञ आहुती! मनांत माझ्या कसले ओझे? चिंतांच्या त्या चिता जाळणे.. आयुष्याच्या सरण्यामाजी, पुण्य मोजूनी झोळी भरणे! अपुल्या हाती नसता काही, फुका कशाचे "मी-माझे" पण.. आनंदाने जगणे व्हावे, मनी रहावे ईश स्मरण !! -- राघव.
  • Log in or register to post comments

खुप छान सुचना. धन्यवाद !

VRINDA MOGHE
गुरुवार, 12/30/2021 - 12:59 नवीन
खुप छान सुचना. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

व्वा राघव

कर्नलतपस्वी
Wed, 12/29/2021 - 10:15 नवीन
तुमघा प्रतीसाद म्हणजे एका सुंदर ललनेला साज शृगांरा़ला करून अधिक सुंदर बनवण्या सारखे आहे. दोन्ही कवीता आवडल्या.
  • Log in or register to post comments

@वृंदा: हिरा शोधला

पाषाणभेद
Wed, 12/29/2021 - 16:32 नवीन
@वृंदा: हिरा शोधला @राघवः पैलू पाडले
  • Log in or register to post comments

धन्यवाद

VRINDA MOGHE
गुरुवार, 12/30/2021 - 13:00 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा