✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

" समजूत "

र — रश्मिन, Mon, 12/13/2021 - 16:37
जरी नाहीस समोर तू, कायम सोबत असतेस तू .. एकांत रात्री ही सरतात सहज, कारण स्वप्नांमध्ये असतेस तू .. माझ्या ध्यानी मनी वसतेस तू, सुंदर विभ्रम करतेस तू .. कल्पांती नेतील प्रेमदूत माझे, मला मोहित करतेस तू ! वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू , आरशातही पाहताना दिसतेस तू .. पण प्राण अडकतो श्वासात, जेव्हा अवचित कधी दिसतेस तू ! अव्यक्त राहूनही जिंकतेस तू, कधीही कशीही आवडतेस तू .. कोरडी पडली होती जीभ सांगताना, "मला खूप आवडतेस तू" ! थोडी गडबडलीस तू, तरीही माफी मागत होतीस तू .. "मला नाही जमणार" सांगताना, मात्र निर्विकार होतीस तू ! खरी आहेस समजदार तू, माझ्या नकळत मला सांभाळतेस तू .. हळुवार जपल्या हळव्या नात्यांचे, नवे आयाम सांभाळतेस तू !

प्रतिक्रिया द्या
1975 वाचन

💬 प्रतिसाद (5)

आवडली

कर्नलतपस्वी
Tue, 12/14/2021 - 08:25 नवीन
छान लिहीलय, काँलेज मधल्या नवतरूणी, नवतरूणी ने लिहीले आहे असं वाटत. कवीतेला वय असतं असे उगाच का वाटतं पण कवीच्या वयाशी काही घेणेदेणे नसतं हे ही कधी कधी पटतं
  • Log in or register to post comments

धन्यवाद कर्नल साहेब ! ई -

रश्मिन
Tue, 12/14/2021 - 13:32 नवीन
धन्यवाद कर्नल साहेब ! ई - सफाई करताना माझा जुना ब्लॉग मिळाला आणि मग ईथे लिहिलं :) बरोब्बर ओळखलंत ! कॉलेजमध्ये असताना लिहिलेली आहे ;-) एकेक ब्लॉग नोंदी वाचताना कळतं की आपण हळहळू कसे परिपक्व होत जातो :) तुमच्या चारोळीशी प्रचंड सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

१०१

कपिलमुनी
Tue, 12/14/2021 - 16:44 नवीन
अशा १०१ जिलब्या घालता येतील स्मरतेस तू झुरतेस तू हसतेस तू रुसतेस तू आठवतेस तू विसरतेस तू झोपतेस तू उठतेस तू
  • Log in or register to post comments

हाहाहा ! :D

रश्मिन
Tue, 12/14/2021 - 21:06 नवीन
त्या अडनिड वयातली जिलबी आत्ता पाडली ! भावनाओं को समझो :P
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/15/2021 - 09:52 नवीन
वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू , आरशातही पाहताना दिसतेस तू .. पण प्राण अडकतो श्वासात, जेव्हा अवचित कधी दिसतेस तू !
वरच्या चार ओळी. वैश्विक सत्य असतं. श्वास अडकणे, घसा कोरडा पडणे, मनातल्या मनात हसणे, कविता पाडणे, वगैरे. हा संसर्ग बेक्कार असतो. प्रेमाचा विषय मला रसिक म्हणून कायमच आवडतो. लिहिते राहा. ''राहील सारा हा पसारा तू गेल्यावर श्वासांचा मग होईल वारा तू गेल्यावर. '' -दिलीप बिरुटे (प्रियकर)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा