शिवशाहीर.....
.
काळ: असाच साधारण नव्वदीच्या आसपासचा.
वय: असंच आडनिडं वडलांचा हात धरुन बाजारात फिरायचं.
अक्कल: अशीच पाठ्यपुस्तकात अन घरात मिळायची तितकी.
छंदः असाच गणिते टाळून घोड्यावरचे शिवाजीमहाराज काढायचा.
आईवडील: असेच मध्यमवर्गीय चारचौघांसारखे. पोराचं अन त्याच्या छंदाचं कौतुक असणारे.
परिस्थिती: तीही अशीच. जशी ह्या सर्व गोष्टीत असते तशी.
.
झालं असं की गावात एका बँकेच्या व्याख्यानमालेत तीन दिवस एक व्याख्यान चालणार होतं. बँक परिवाराची म्हणजे आपलीच. आमंत्रण होतंच पण घरटी दोन प्रवेश फक्त. मग चौघांच्या कुंटुंबात असं ठरलं की पहिल्यांदा आईसोबत मी जाईन. दुसरे दिवशी वडील माझ्या भावाला घेऊन जातील. पोरं गप ऐकतील असा विषय असल्याशिवाय आईवडील कुठे घेऊन जाणार नाहीत ह्याची अगदी खात्रीच आम्हा भावंडांना.
आईसोबत संध्याकाळी व्याख्यानास पोहोचलो. व्याख्यान म्हणजे काय हेही कदाचित तेंव्हा माहीत नसावे. समोरच्या स्टेजवर मोठा पडदा लावलेला. रोज पाहून ओळखीचा झालेला बँकेच्या चिन्हातील हंस तेथे बँकेच्या नावासहित झळकत होता. खाली शिवचरित्रावर व्याख्यान आणि व्याख्याते म्हणून शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे असे नाव. प्रेक्षकांच्या आगमनाच्या गर्दी आणी गडबडीत स्टेजवर ओळख समारंभ पार पडत होता. इकडे तिकडे बघत असताना स्टेजवर नजर गेली तर साक्षात महाराज अवतरल्याप्रमाणे भास झाला. मोठे दरदरीत नाक. त्याच ओळखीच्या दाढी आणि मिशा. झब्बा आणि सुरवार. एका डौलदार मंदीलाची कमतरता होती पण संवत साल शके वंशावळ्या बिरुदे अन स्थानमाहात्म्य गर्जणारा तो कडाडता आवाज नुसते स्टेजकडे पाहात बसवत होता. पन्ह्याळ्याच्या त्या रोमहर्षक लढाईचं वर्णन नुसत्या भारदस्त आवाजात शाहीरी बाण्यात साकार होत होतं. प्रत्यक्ष साक्षात शिवाजीमहाराज रिकिबीत आपला चढावाचा पाय ठेवून घोड्यावर बसताना दिसत होते. एका टाचेच्या इशार्यावर चौखूर उधळणारं ते मावळ्यांचं अश्वपथक राजांच्या मागे ज्या श्रध्देने दौडत होत त्याच श्रध्देने सारा श्रोतृवर्ग शिवशाहीरांच्या मागून त्या मंतरलेल्या काळाची अन देवतुल्य राजाची कहाणी मन लावून ऐकत होतं. व्याख्यानाचा त्या दिवसाचा भाग संपत आला. शिवशाहीरांनी कहाणी, माणसे अन घटनेचे मर्म सांगत इतिहासकारांच्या नोंदींचा उल्लेख सांगितला. शाहीर अन भाटांनी पिढ्यानपिढ्या जोपासलेल्या कवनांचाचे ॠण मानत एक खंत व्यक्त केली. आपल्याकडे दस्तावेजीकरण करताना अक्षरात लिहिले गेलं, मुखोद्गत केले गेले तो इतिहास चित्रात मात्र फार कमी दिसतो. इतक्या रोमहर्षक घटनांची मांदीयाळी आहे की एकेका घटनेवर प्रदेशात एकेक चित्रपट निघाला असता. एकेक प्रसंगावर चित्रे रेखाटली गेली असती. शिवचरीत्र रेखाटणार्या कलायोगी दीनानाथ दलालांचे त्यांनी उदाहरण दिले. आजच्या व्याख्यानातून स्फूर्ती घेणारा एक जरी कलावंत निघाला तरी ते ह्या चित्रदर्शी व्याख्यानाचे यश मानता येईल असे नमूद करुन व्याख्यानाची त्या दिवसाची सांगता झाली.
अगदी टिपिकल कुटुम्बाप्रमाणे घरी चर्चा व्याख्यानाची झाली. वडील अचानक म्हणाले. " का रे. काढतो का तू चित्र त्या प्रसंगाचे?" डोक्यात तर तेच घोळत होते. चित्रकलेचे पाचवी च्या मुलाला असते तितकीच उमज मलाही होती पण वडिलांच्या कौतुकामुळे चार रंग आणी कागद नेहमी जास्त असायचे इतर मुलांपेक्षा. मलाही कळले नाही किती वेळ लागला ते चित्र काढून रंगवायला पण प्रसंग डोळ्यासमोरच दिसत होता आणि चित्र तयार झाले. दुसर्या दिवशी व्याख्यानास वडील आणि भाऊ जाणार होते पण संध्याकाळी उशीराच वडीलांनी सांगितले. "चल आपल्याला जायचंय सुलाखे वाड्यात" बार्शीतले ते एक व्यापारी आणि नगरशेठ. व्याख्यानमालेचे ते पुरस्कर्ते आणि बँकेचे संचालक. त्यांच्याच घरी शिवशाहीरांचा मुक्काम होता. वडील त्याच बँकेत असलेने परिचय होताच. वाडा जुन्या पध्दतीचा. जोते, ओसरी असणारा. झोपाळ्यावर बसलेले शिवशाहीर बघताच मी अंग चोरुन वडिलांच्या मागे लपू लागलो. त्यांनी जवळ बोलावले. लहान मुलांनाही अहोजाहो करणारा तो मार्दवी स्वर, या बाळराजे हे कधीही न ऐकलेले संबोधन ऐकून का कोण जाणे रडायलाच येऊ लागले. वडिलांनी पुढे जाऊन त्यांना ते चित्र दाखवले. चित्राची सगळी कहाणी ऐकवली. शिवशाहीरांनी जवळ बोलावले अन इतक्या मायेन डोक्यावर हात फिरवला अन काय बोलले ते माझ्या कळण्याच्या पलिकडचे होते. घरी परत आलो ते एका धुंदीत. वडील काय सांगत होते उद्याच्या कार्यक्रमाचे तेही लक्षात आले नाही.
दुसरे दिवशी व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प होते. वडिलांसोबत पुन्हा माझेच वर्णी लागली. कार्यक्रम सुरु होण्याआधीच शिवशाहीरांनी स्वतःजवळ ठेवलेले ते मी काढलेले चित्र लोकांना दाखवले. नंतरची काही मिनिटे नुसते अधांतरी वाटत होते. लहानसहान चित्रकला स्पर्धात मिळवलेली बक्षीसे स्वीकारणे मला माहीत होते पण हे काहीतरी नवे होते. मला आवडीचे आणि आनंद मिळवणारे काही केल्यानंतर होणारे कौतुक नवीन होते. आज आठवले की जाणवते काढलेले चित्र साधेच होते पण कौतुक करणारा माणूस अफाट होता. तमाम महाराष्ट्राला शिवचरित्राची गोडी लावून महाराजांवर, त्यांच्या गडकिल्ल्यावर अन इतिहासावर अफाट प्रेम करायला शिकवणारा शाहीर अफाट होता.
.
.
आमचं वय वाढत गेलं, बालाचे किशोर अन किशोरांचे तरुण होऊन कशाचीही प्रौढी मिरवायचा काळ सुध्दा आला पण त्या काळात लागलेली ती गोडी अन झालेले ते कौतुक आठवताना जाणवते की इतके दिवस, इतकी वर्षे एखादा कुणी कुणाच्या प्रेमात कसा अखंड बुडू शकतो. एका वेड्या शिवप्रेमीकडून कौतुक झालेली ती कला अंगी राहिली पण पोटार्थी झाली. चार तुकड्याच्या मोहात त्या कलेला कसेही वळवले. करीयर अन पैसा करत करत आज शिवशाहीरांची बातमी वाचतो तेंव्हा त्या भारावलेल्या वयात रेखाटलेल्या चार रेषा अन त्या कौतुकाच्या वर्षावात भिजलेले चार थेंब आयुष्याचा दागिना का वाटतात आम्हाला? कसे कुणी आयुष्यभर तेच करु शकतो?
.
.
शिवशाहीर, तुमच्या चार शब्दांचं इतकं वाटतंय आम्हा भणंगाना. तुम्ही तर साक्षात शिवरंगी रंगवलं आक्खं आयुष्य. मानाचा मुजरा तुम्हाला.
चित्रसौजन्य: मंदार जगताप्/फ्लिकर
चित्रसौजन्य: मंदार जगताप्/फ्लिकरवर्गीकरण
प्रतिक्रिया
अभ्या.. इज ब्याक
+11
तुम्ही तर साक्षात शिवरंगी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
नशीबवान आहात ...
भावपुर्ण श्रद्धांजली!!!
शिवशाहीरांना प्रत्यक्ष कधीच
साक्षात खरोखरीच्या थोर "जाणत्या राजाने"
झोपाळ्यावर बसलेले शिवशाहीर बघताच मी अंग चोरुन वडिलांच्या मागे लपू लागलो. त्यांनी जवळ बोलावले. लहान मुलांनाही अहोजाहो करणारा तो मार्दवी स्वर, या बाळराजे हे कधीही न ऐकलेले संबोधन ऐकून का कोण जाणे रडायलाच येऊ लागले. वडिलांनी पुढे जाऊन त्यांना ते चित्र दाखवले. चित्राची सगळी कहाणी ऐकवली. शिवशाहीरांनी जवळ बोलावले अन इतक्या मायेन डोक्यावर हात फिरवला अन काय बोलले ते माझ्या कळण्याच्या पलिकडचे होते. घरी परत आलो ते एका धुंदीत. वडील काय सांगत होते उद्याच्या कार्यक्रमाचे तेही लक्षात आले नाही.दुसरे दिवशी व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प होते. वडिलांसोबत पुन्हा माझेच वर्णी लागली. कार्यक्रम सुरु होण्याआधीच शिवशाहीरांनी स्वतःजवळ ठेवलेले ते मी काढलेले चित्र लोकांना दाखवले. नंतरची काही मिनिटे नुसते अधांतरी वाटत होते. लहानसहान चित्रकला स्पर्धात मिळवलेली बक्षीसे स्वीकारणे मला माहीत होते पण हे काहीतरी नवे होते. मला आवडीचे आणि आनंद मिळवणारे काही केल्यानंतर होणारे कौतुक नवीन होते.💖
साक्षात खरोखरीच्या थोर "जाणत्या राजाने" कौतुक करावे केवढी मोठी गोष्ट ! आयुष्यभर जपून कोंदणात जडवावा असा अमुल्य ठेवा ! शिवशाहिरांबद्दल काय बोलणार. असा शिवशाहिर पुन्हा न होणे ! शिवशाहिरांना भावपूर्ण श्रध्दांजली (अर्कचित्र जबरीच आहे, +१ आवडलेशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
सुंदर आठवण
असा शाहीर पुन्हा नाही. अखेरचा
मनोगत आवडले.
भावपूर्ण श्रद्धांजली
आठवण आवडली.
सुंदर आठवण!
सुंदर आठवण!
सुंदर आठवण!
मस्तच आठवण!
मस्तच आठवण!
मस्तच आठवण!
सुंदर लेख आणि आठवण!
जाणता राजा
मानपत्राचं वाचन केलं होतं.
असा श्रेष्ठ शाहीर
वाहवा. खूप सुंदर लिहीले आहे.
सुंदर आठवणी . .
दंडवत
दुरुस्ती
वाह!
धिक्कार महाराष्ट्रातील नतद्रष्टनाचा
जाऊ द्या....
@चौकस२१२,
ते स्वतः ह्याच्या पलीकडे होते
अशा गोष्टी मनावर घ्यायच्या
अभ्या..
समयोचित मनोगत
+1
विझलो आज जरी मी.......
विझलो आज जरी मी.......
विझलो आज जरी मी.......
विझलो आज जरी मी,.......
व्वा !!!
विझलो आज जरी मी,.......
विझलो आज जरी मी,
असे व्यक्ती आपल्या आयुष्यात
मदनबाण.....
अभ्या
एक मित्र मोठा चित्रकार आहे .
सुंदर आठवणी.