स्वप्न
मी पाहिलं त्याला तेव्हा
ते गुडघ्यात डोकं घालून
मुसमुसत बसलं होतं
निद्रेच्या किनार्यावर
हळूवार उचलून
गोंजारलं मी त्याला
खुलवलं, खेळवलं
पहाटफुलांच्या रंगानी सजवलं...
ओहोटीच्या अमाप ओढीनं
वाहून जाताना केविलवाणं
माझ्या दुबळ्या हाताकडे
पाहात राहिलं
आता मीच बसलो आहे
गुडघ्यात डोकं घालून
जीवनाच्या किनार्यावर
तुझी वाट पाहात...
-रिचर्ड न्युनिस
(रिचर्ड न्युनिस हे मूळचे मुंबईजवळील वसई येथील, पण गेली तेहतीस वर्षे ते कामधंद्यानिमित्ताने परदेशी आहेत. सध्या वास्तव्य ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे. मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून कॉमर्स पदवीधर झाल्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवली आणि पुढे इंग्लंडमधील ब्रॅडफर्ड युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स (एम.बी.ए.) केले. नोकरीनिमित्त त्यांचा जगभर प्रवास झाला आहे. त्यांना वाचनाची आणि लिखाणाची आवड आहे. त्यांनी अनेक कथा, कविता आणि एकांकिका लिहिल्या आहेत.)
वाचने
6509
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे भारी
आभारी आहे!
In reply to अरे भारी by ज्ञानोबाचे पैजार
सदस्यकाळ
हो, लास्ट लोकलला लोंबकळत
In reply to सदस्यकाळ by पाषाणभेद
:)
In reply to हो, लास्ट लोकलला लोंबकळत by Richard Nunes
आभारी!
In reply to :) by तुषार काळभोर
छान आहे कविता.
आभारी!
In reply to छान आहे कविता. by प्राची अश्विनी
ओहोटीच्या अमाप ओढीनं
आभारी
In reply to ओहोटीच्या अमाप ओढीनं by चौथा कोनाडा
मस्त
आभारी!
In reply to मस्त by गुल्लू दादा