✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अलक (अति लघु कथा)

म
मालविका यांनी
Fri, 10/01/2021 - 08:42  ·  लेख
लेख
अलक 1 त्यांच्या शाळेची ट्रिप कोकणात समुद्र किनारी जाऊन आली होती. सगळ्या जणी एकदम खुश होत्या. समुद्र कसा वाटला त्याच वर्णन त्या बाईंना सांगत होत्या. समुद्रावरून वाहणारा तो खारटसर वारा, त्याचा चिकट असा स्पर्श, पायाखालची मऊ मऊ वाळू, पावलांना हळुवारपणे पाण्याने भिजवणार्या लाटा सगळं मोहवून टाकणारं होतं. अगदी पाण्याला हात लावून, त्याची चव घेऊन त्यांनी समुद्र अनुभवला. एकामागून एक येणाऱ्या लाटा संपतच नव्हत्या. नुसतीच पावलं भिजली होती, अजून थोडी पुढे जायची इच्छा होती पण मॅडम ची परवानगी नव्हती. त्या सगळ्या जणी उत्साहाने समुद्राचं वर्णन करत होत्या. अंध शाळेतल्या त्या मुलींनी नुसत्या स्पर्शाच्या अनुभवाने उभा केलेला समुद्र बाईंच्या डोळ्यात पाण्याच्या रूपाने उभा राहिला. अलक 2 ऑफिसतर्फे सगळे 2 दिवसांच्या कोकण ट्रिप वर आले होते. तो नि ती ही त्यात होतेच. समद्रावर आल्यावर इतर सगळे डुंबायला गेले. ती मात्र किनाऱ्यावर चालत होती. मऊ वाळूचा स्पर्श सुखद होता. मावळतीचा वारा आणि लाटांचा आवाज एकमेकांना साथ देत होता. इतरांपासून जरा लांब एका दगडावर जाऊन बसली ती. समुद्रात बुडणाऱ्या सूर्याकडे एकटक बघण्यात इतकी गुंतली की तो शेजारी येऊन बसला कधी ते जाणवलं देखील नाही. त्याने हलकेच तिचा हात हातात घेऊन तिला भानावर आणलं. आधी ती ओशाळली आणि त्याच्या हातात हात बघून तर चक्क लाजली. त्यालाही ते जाणवलं. इतके दिवस मनात असलेलं आज समुद्राच्या साक्षीने ओठावर आलं आणि नवीन नात्याची सुरवात झाली. अलक 3 वयाची साठी पार केलेला त्यांचा शाळेचा ग्रुप आज 30 वर्षांनंतर परत त्याच किनाऱ्यावर आला होता. शाळेच्या सुखद आठवणी काढून सगळे गप्पा मारत होते. बहुतेक सर्व गृहस्थाश्रमीच्या जबाबदाऱ्यातून मोकळे झाले होते. ती दोघ पण अर्थात तिथे होती. पण एकमेकांकडे चोरून बघणं, एकमेकांची काळजी करण, मदत करणं इतरांच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच किनाऱ्यावर मावळत्या सूर्याच्या आणि मित्र मैत्रिणींच्या साक्षीने त्याने परत तिला प्रपोज केलं. यावेळी मात्र तिला अडवायला कोणीही नव्हतं. आई वडिलांच्या इच्छेखातर 30 वर्षपूर्वी दूर केलेला तो आज तिला परत आपला साथीदार म्हणून मिळाला होता. आयुष्यच्या या टप्प्यावर खरंच साथीची गरज होती. आता हा समुद्र उर्वरित आयुष्यभर तिची साथ देणार होता. कारण त्याच नाव सागर होतं आणि त्याच घर समुद्र किनारी होत. -धनश्रीनिवास
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8796 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

अलक आवडल्या

श्रीरंग_जोशी
Fri, 10/01/2021 - 09:36 नवीन
तीनही अलक आवडल्या. दुसर्‍या अन तिसर्‍या कथेतला संबंध वाचक म्हणून जाणवला.
  • Log in or register to post comments

तीनही कथा अतिशय सुंदर

गॉडजिला
Fri, 10/01/2021 - 09:47 नवीन
सुटसुटीत आणि नेमका भाव व चित्रण उभे करणाऱ्या आहेत. मस्त. विशेषतः तिसरी कथा क्लिशे वाटत होती तोच आयुष्यच्या या टप्प्यावर खरंच साथीची गरज होती हे वाचले अन् भाव बदलून गेला...
  • Log in or register to post comments

वा मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/01/2021 - 09:50 नवीन
तिनही गोष्टी आवडल्या पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

स्पर्श

कर्नलतपस्वी
Fri, 10/01/2021 - 11:26 नवीन
पहिली कथा न सांगताच खुप काही सांगून गेली. लहानपणी शाळेत जाताना बस मधे दिव्यदृष्टीची दिव्यांग मुले असायची त्यातील काही मीत्र पण झाले. सागरातल्या ओडंक्याप्रमाणे वेगळे पण झाले पण त्यांच्यामुळे जीवना कडे बघायचा दृष्टिकोन सुधारला. दिव्यदृष्टी अशा करता आम्ही बस मधे चढलो की न पहाता त्यानां कळायचे.
  • Log in or register to post comments

तिन्ही अलक आवडल्या

सौंदाळा
Fri, 10/01/2021 - 12:29 नवीन
तिन्ही अलक आवडल्या पण पहिली सगळ्यात जास्त.
  • Log in or register to post comments

तिन्ही गोष्टी आवडल्या

श्वेता व्यास
Fri, 10/01/2021 - 12:33 नवीन
तिन्ही गोष्टी आवडल्या
  • Log in or register to post comments

छान!

लई भारी
Fri, 10/01/2021 - 12:47 नवीन
तिन्ही कथा आवडल्या!
  • Log in or register to post comments

तिन्ही आवडले.

विवेकपटाईत
Fri, 10/01/2021 - 13:42 नवीन
तिन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

छान

सरिता बांदेकर
Fri, 10/01/2021 - 14:23 नवीन
छान आहेत तिन्ही कथा.
  • Log in or register to post comments

छान

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/01/2021 - 15:32 नवीन
छान
  • Log in or register to post comments

तीनही कथा .....

चौथा कोनाडा
Fri, 10/01/2021 - 17:07 नवीन
तीनही कथा अतिशय सुंदर !

💖

  • Log in or register to post comments

आशय आणि शैली, दोन्ही आवडले.

वामन देशमुख
Fri, 10/01/2021 - 19:55 नवीन
आशय आणि शैली, दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर!

Nitin Palkar
Fri, 10/01/2021 - 20:03 नवीन
तिन्ही अलक सुंदर. पहिली अधिक आवडली.
  • Log in or register to post comments

तीनही कथा आवडल्या

बबन ताम्बे
Fri, 10/01/2021 - 22:19 नवीन
खूप छान कथा. तीनही कथा खूप आवडल्या.
  • Log in or register to post comments

छान लिहीलेय.

अभिजीत अवलिया
Sat, 10/02/2021 - 05:28 नवीन
छान लिहीलेय.
  • Log in or register to post comments

पहिली कथा खास आवडली. बाकीच्या

राघव
Sat, 10/02/2021 - 07:13 नवीन
पहिली कथा खास आवडली. बाकीच्या दोनसुद्धा खूप छान.
  • Log in or register to post comments

तिन्ही कथा छान आहेत पण पहिली जास्त आवडली

जगप्रवासी
Sat, 10/02/2021 - 10:08 नवीन
तिन्ही कथा छान आहेत पण पहिली जास्त आवडली
  • Log in or register to post comments

सहमत...

सतिश गावडे
Sat, 10/02/2021 - 10:41 नवीन
समुद्राचा (किनाऱ्यावरील आणि किनाऱ्यापासून थोडासा) सहवास हर्षदायी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

छान आहेत तिन्ही कथा.

रुपी
Sun, 10/03/2021 - 10:24 नवीन
छान आहेत तिन्ही कथा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मालविका
Wed, 10/06/2021 - 13:24 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

छान कथा.

प्रसाद_१९८२
Wed, 10/06/2021 - 16:54 नवीन
छान कथा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा